धनवंती नागदा
धनवंती नागदा - (जन्म - ११ जानेवारी १९३४, मृत्यू - १ ऑगस्ट २०२३)[१] चित्रकार, शिक्षिका, लेखिका, अनुवादक
जीवन व कार्य
[संपादन]पूर्वाई आणि विसांजी नागदा यांचे धनवंती हे दुसरे अपत्य. कुसुम हे पहिले अपत्य. वडील विसांजी हे जैन धर्माचे अभ्यासक होते. पत्नी व दोन्ही मुलींना घेऊन ते १९३५ साली श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्या दर्शनास प्रथम आले होते.
१९४३ साली धनवंती या श्री अरविंद आश्रमात वास्तव्यास आल्या. १९४३ साली श्रीमाताजींनी जेव्हा श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन ची स्थापना केली तेव्हा त्याच्या पहिल्या बॅचमध्ये कुसुम व धनवंती या भगिनी शिक्षण घेऊ लागल्या.
शिक्षण चालू असतानाच, १९५४ साली त्या श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन येथे अध्यापनाचे काम करू लागल्या. नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना फ्रेंच (शिक्षणाचे माध्यम) शिकविण्याचे काम धनवंती यांच्यावर सोपविण्यात आले. १९५५ पासून त्या गणित, कला, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांचे अध्यापनदेखील करू लागल्या. १९६३ सालपर्यंत त्या अध्यापन करत होत्या.[१] त्यांनी चित्रकलेचे धडे गिरवायला सुरुवात केली. आश्रमातील चित्रकार जयंतीलाल पारेख आणि कृष्णलाल भट्ट यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. [२] पोर्ट्रेट पेंटिंग्ज हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता.
१९५८ साली धनवंती आपल्या आईवडील आणि भाऊ प्रवीण याच्या सहित आश्रमवासी झाल्या. १९६४ साली धनवंती श्री. अभय सिंग नहार यांच्याबरोबर आश्रमाच्या अटेलियर (वर्कशॉप) विभागात काम करू लागल्या. १९६४ ते १९७७ या कालावधीत त्यांनी या विभागात काम केले.[१]
धनवंती त्यांच्या पेंटिंग्जच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने ब्राझील येथे गेल्या. तेथील ३ महिन्यांच्या वास्तव्यात त्यांनी श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्या कार्यावर आधारित व्याख्याने दिली. पेंटिंग्जच्या कार्यशाळा घेतल्या.
१९८५ मध्ये धनवंती यांनी काढलेल्या चित्रांवर आधारित भरतकाम उत्पादनाचा विभाग सुरू केला. सुमारे एक दशक हा विभाग कार्यरत राहिला.
गुजराथी कवी आणि आश्रमवासी असणाऱ्या सुंदरम यांच्या काव्याचा इंग्रजी अनुवाद धनवंती यांनी केला. गुजरात साहित्य अकादमीतर्फे २००१ साली 'सिलेक्टेड पोएम्स ऑफ सुंदरम' या नावाने तो कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आला.
प्रकाशित लेखन
[संपादन]- मेडिटेशन इन कलर- (१९७८) [१]
- तपस्या - हिम्नस इन कलर (२००८) [३]
- सिलेक्टेड पोएम्स ऑफ सुंदरम (२००१) अनुवादक - धनवंती [१]
पूरक
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ a b c d e "Dhanavanti Nagda: In Memoriam by Anurag Banerjee – Overman Foundation" (इंग्रजी भाषेत). 2024-09-03. 2025-03-01 रोजी पाहिले.
- ^ auromaa (2023-08-02). "My Pilgrimage | Dhanavanti Nagda". AuroMaa (इंग्रजी भाषेत). 2025-03-01 रोजी पाहिले.
- ^ "Dhanavanti - painter, teacher, disciple". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-03-01 रोजी पाहिले.