Jump to content

धनगर समाज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धनगर ही एक जमात किंवा कुळ असून, या समाजाचे लोक भारतातील महाराष्ट्र, गोवा, उत्तर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आढळतात. उत्तर महाराष्ट्रात (खानदेश परिसर) आणि भारताच्या पश्चिम घाटातील जंगलाच्छादित डोंगराळ प्रदेशांमध्ये त्यांना गवळी धनगर असे म्हणले जाते.[१][२][३][४] महाराष्ट्रात गवळींच्या अनेक वेगवेगळ्या जाती आहेत, त्यापैकी धनगर गवळी ही एक जात आहे.[५][६][७]

,

धनगर वेशभूषा संस्कृती आणि परंपरा

धनगर जमात ही आदिम जमात असून जंगलात, रानावनात, डोंगर-दऱ्या-खोऱ्यात शेळी-मेंढीपालन तसेच शेती करणे ही त्यांची प्रमुख कामे होती. चाऱ्याच्या शोधात ही जमात अविरत भटकंती करत अखंड भारतभर पसरली आहे. मेंढी ही माऊली असून तिचे पालनपोषण करणे आणि त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून उदरनिर्वाह करणे हे या धनगर जमातीचे पुर्वापारपासून चालत आलेले एक रहाटगाडगे आहे. भुतलावरील लाजरा बुजरा समाज म्हणून धनगर जमातीला ओळखले जाते. गावगाड्यात, गावगाड्यातील राजकारणात, लोकांत न मिसळता परिणामी शेळ्या-मेंढ्यांच्या उदरनिर्वाहासाठी गावापासून दूर वस्ती करून राहणे पसंत करणारी ही आदिम भटकी जमात आहे. पावसाळा ऋतू संपल्यावर चाऱ्याची कमतरता निर्माण झाल्यावर चाऱ्याच्या शोधात ही जमात आपल्या मेंढ्यांचे कळप घेऊन, गट करून, कुटुंब कबिला (बिऱ्हाड) सोबत घेऊन जिकडे चारा मिळेल तिकडे, काटेकुटे तुडवत, रानावनातून, डोंगर-दऱ्यातून मार्ग काढत दूरपर्यंत शेकडो किलोमीटर अंतर पायदळी तुडवून भटकंती करतात आणि मृग नक्षत्रात पाऊस पडल्यावर पुन्हा आपापले कळप घेऊन मूळ गावी परततात. पूर्वी भटकंती करण्याठी इतरत्र गेलेली ही जमात जिथे सोयिस्कर वाटेल तिकडेच स्थायिक होई परंतु त्यांच्याबद्दल सरकार दप्तरी कोणतीही नोंद राहत नव्हती. जिकडे स्थायिक होत तिथे चाऱ्याची उपलब्धता कमी झाली की पुन्हा तेथून आपले बिऱ्हाड घेऊन उदरनिर्वाहासाठी दुसऱ्या गावाला पायपीट करत जात आणि जिकडे शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्याची उपलब्धता असेल तिकडे स्थायिक होत.

इतिहास

[संपादन]

अहिल्याबाई होळकर (३१ मे, १७२५ - १३ ऑगस्ट, १७९५, राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स. १७९५) या भारतातील, माळव्याच्या तत्त्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदा तीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हारराव होळकर यांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले होते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी (मल्हारपीठ) खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते. मल्हारराव होळकर पुण्यास जाताना चोंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्याबाईंना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले. अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, यवढच नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखंल प्रसिंध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, वाराणसी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. अहिल्यादेवींना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती.

इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट" असे म्हणले आहे.[१] थोडक्यात अहिल्यादेवी यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी एकत्रित केली आहे. त्याने म्हणले आहे की, ज्या वेळेस जगातील सर्वात महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल त्या वेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्व प्रथम लिहिला जाईल.[ संदर्भ हवा ]

संस्कृती

[संपादन]
धनगर वेशभूषा संस्कृती आणि परंपरा

धनगर समाजातील लोक हे हातात कुऱ्हाड, पाठीवर घोंगड, हातात कड, कोल्हापुरी चपला वापरतात. जय मल्हार यळकोट यळकोट जय मल्हार, बिरोबाच्या नावानं चांगभलं हे समाजाचे ब्रीदवाक्य आहे. धनगर समाजामध्ये हा सगळ्या धनगरांच्या देवळात भंडारा उधळला जातो. ही लोक धनगरी ओवी गातात व गजी नृत्य केले जाते.[८]

प्रसिद्ध व्यक्ती

[संपादन]
  1. अण्णासाहेब डांगे, माजी मंत्री
  2. गणपतराव देशमुख, विश्वविक्रमी आमदार
  3. राम शिंदे, सभापती-विधानपरीषद
  4. गोपीचंद पडळकर
  5. शिवाजीराव शेंडगे

धनगर लोकजीवन व साहित्य

[संपादन]
  1. दैवताराधना व पौराणिक कथा : या ओव्यांमध्ये मुख्य कुलदैवत बिरोबा (बिरुदेव) तसेच खंडोबा, धुळोबा, शिंग्रुबा, मायाक्का, कामाबाई यांसारख्या देवतांचा महिमा गायला जातो. तसेच रामायण, महाभारत आणि पुराणकथांचा समावेश असतो.
  2. इतिहास व समाजजीवन : धनगरांचा गौरवशाली इतिहास, लोकजीवनातील सुख-दुःख, संस्कार, चालीरीती आणि उपदेशपर तत्त्वे या मौखिक साहित्यातून मांडली जातात.

गजा नृत्य/ गजीनृत्य (Gajanrutya) : पावसाळ्यात धनगरवाड्यांवर रात्रीच्या वेळी गोलाकार फेर धरून ढोलच्या गजरात हे मौखिक गीत व नृत्य सादर केले जाते. त्यामध्ये ढोल/कैताळाच्या तालावर सुसंवाद साधत नृत्यातून हातांच्या/ हातातील रूमालांच्या इशाऱ्यातून पौराणिक कथांचे सादरीकरण केले जाते.

सुंबरान (Sumbaran): हे धनगर समाजाचे हजारो वर्षांपासूनचे अत्यंत महत्त्वाचे मौखिक वाङ्मय आहे. 'सुंबरान मांडणे' म्हणजे देवाचा व कुलदैवतांचा धावा करणे होय. यात पद्यरूप (गाणे) आणि गद्यरूप (कथा/सपादनी) असे दोन भाग असतात. हे ढोल, झांज आणि पावा या वाद्यांच्या तालावर गायले जाते.

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ Malhotra, K. C. (March 1982). "Ecology of a pastoral caste: Gavli Dhangars of peninsular India" (PDF). Human Ecology. 10 (1): 107–143. doi:10.1007/BF01531107. S2CID 154253698.
  2. ↑ "Govt gives another push to get ST tag for Dhangar-Gouly". The Times of India. 2020-09-09. 2020-09-09 रोजी पाहिले – Associated Press द्वारे.
  3. ↑ Malhotra, K. C. (Dec 2001). "Patterns of Variation in a Caste-Cluster of Dhangars of Maharashtra, India". Collegium Antropologicum. 25 (2): 425–42. PMID 11811272. 2025-12-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2026-09-20 रोजी पाहिले.
  4. ↑ Shashi (2011), p. 47.
  5. ↑ Rao (1979), p. 129.
  6. ↑ Enthoven (1990), p. 368.
  7. ↑ Feldhaus (1989), p. 101.
  8. ↑ -, श्री.दिपक संभाजी माने; -, प्रा.डॉ. विजय विष्णू पाडळकर (2024-04-30). "धनगर समाज : प्रथा आणि परंपरा". International Journal For Multidisciplinary Research. 6 (2). doi:10.36948/ijfmr.2024.v06i02.19090. ISSN 2582-2160.CS1 maint: numeric names: authors list (link)