धनंजय महाराज मोरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धनंजय विश्वासराव मोरे
जन्म जुलै १८, इ.स. १९७४
मांगवाडी ता. रिसोड, जि. वाशीम.
निवासस्थान वारकरी सदन मांगवाडी (मंगलवाडी)
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण

B. A.

D. I. T.

D. J.

(वृत्तपत्रविद्या आणि जनसंपर्क)
प्रशिक्षणसंस्था

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मांगवाडी

भारत माध्यमिक शाळा रिसोड

वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची

यशवंतराव चव्हाण म. मुक्त विद्यापीठ नाशिक
पेशा किर्तनकार
मूळ गाव मांगवाडी ता. रिसोड, जि. वाशीम.
पदवी हुद्दा संत सभा सदस्य
धर्म हिंदू
जोडीदार सौ. सुनिता धनंजय मोरे
अपत्ये 3 मुली
वडील विश्वासराव रामराव मोरे
आई सौ. लक्ष्मीबाई विश्वासराव मोरे
संकेतस्थळ
https://www.dhananjaymaharajmore.com/
धनंजय_महाराज_मोरे.jpg

धनंजय महाराज मोरे' DHANANJAY MAHARAJ MORE

यांचा जन्म १८/०७/१९७४ ला मांगवाडी (मंगलवाडी) ता. रिसोड जिल्हा वाशिम (विदर्भ) येथे वारकरी घराण्यात विश्वासराव रामराव मोरे यांच्या पोटी एकूण ६ भावंडा पैकी ३ ऱ्या नंबर ला झाला. मांगवाडी हे गांव रामायणातील शबरीचे गुरु मातंग /मतंग ऋषी चे ठिकाण म्हणून मानण्यात येते. गावामध्ये हनुमंताचे मंदिर असून तेथे दररोज सकाळी ५ ते ६ काकडा ६:१५ ला आरती व सायंकाळी हरिपाठ म्हटला जातो. दर पंधरा दिवसाला एकादशीचा जागर व सकाळी अन्नदान व्दादशी चे पारणे होते.

अश्या मांगवाडी गावात त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या जन्म गांवी मांगवाडी ([[मंगलवाडी]]) येथे झाले.

शालेय शिक्षण[संपादन]

प्राथमिक १ ली ते ४ थी पर्यंत मांगवाडी ला पुढील माध्यमिक शिक्षण जन्म गांव मांगवाडी (मंगलवाडी) येथून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या भारत माध्यमिक शाळा रिसोड ता. रिसोड जिल्हा वाशीम येथे १९८९ पर्यंत झाले.

श्रीक्षेत्रआळंदी येथे गमन[संपादन]

आणि १९८६ ला श्री वै. सोपानकाका टाले खुडज कर यांच्या गावी खुडज ता. सेनगाव जिल्हा हिंगोली येथे वारकरी शिबीर झाले त्यात १ एक महिना वारकरी संप्रदायाची दिशा समजण्यास वाव मिळाला.

पुढे १९८९ ला श्री वै. सोपानकाका टाले खुडज कर यांच्या सांगण्यावरून कार्तिक महिन्यात आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा यात्रेत वडील विश्वासराव रामराव मोरे यांनी गावचे लोक श्रीराम जाधव साहेब, लक्ष्मण पौळ इत्यादी सोबत आळंदी येथे वारकरी सांप्रदायिक शिक्षणासाठी पाठविले.

आळंदी येथे वै. गुरुवर्य विठ्ठल बाबा देशमुख यांच्या कडे विनामुल्य राहण्याची सोय श्री वै. सोपानकाका टाले खुडजकर यांनी करून दिली.अश्याप्रकारे १९८९ ला आळंदी येथे वारकरी सांप्रदायिक शिक्षण सुरु झाले.

गुरु जवळ असताना अनेक गुरुबंधूंचा सहवास प्राप्त झाला.

आध्यात्मिक शिक्षणाची सुरवात[संपादन]

आळंदी येथे वै. गुरुवर्य विठ्ठल बाबा देशमुख यांच्या कडे १९८९ पासून राहत असताना गुरु गृही अनेक प्रकारची सेवा केली, झाडांना पाणी देणे, धर्मशाळेची झाडझूड करणे, गुरूंचे कपडे धुणे, गुरूंचे अंग दाबने, गुरुसाठी भोजन बनविणे, आलेल्या अतिथींची अन्न पाण्याची व्यवस्था करणे, इत्यादी कामे गुरूगृही करत असताना मृदंगाच्या शिक्षणासाठी वै. गुरुवर्य पांडुरंग महाराज वैद्द यांच्याकडे रितशीर (वर्ग) क्लास लावून मृदंगाचे विधिवत शिक्षण १९९० ते १९९२ पर्यंत केले.

त्या नंतर वारकरी शिक्षण संस्था (जोग महाराज) यांच्या संस्थेत १९९२ प्रवेश परीक्षा १०० पैकी ९७ मार्क घेऊन पास झाले. आणि याप्रमाणे संस्थेचा अभ्यास सुरु झाला.१९९३ ला वारकरी शिक्षण संस्थेचा अमृत महोत्सव आळंदीला फार मोठ्या उत्साहात संपन्न झाला तेथे सुद्धा सक्रीय सेवा केली.

तीर्थयात्रा[संपादन]

आळंदी येथे वै. गुरुवर्य विठ्ठल बाबा देशमुख यांच्या कडे राहत असताना १९९२ ला पहिल्यांदा तीर्थयात्रा करण्याचा योग आला, हिंदू धर्मामध्ये चारधामला अतिशय महत्त्व आहे, बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी, रामेश्वर, असे हे चार धाम वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल बाबा देशमुख यांच्यासोबत अनेकदा करण्याचा योग आला.

कार्य[संपादन]

वारी (आळंदी ते पंढरपूर) दिंडी स्थापना[संपादन]

धनंजय महाराज मोरे यांनी सन २००६ च्या जेष्ठ महिन्यात आळंदी वारी (आळंदी ते पंढरपूर) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात नवीन दिंडी गावकरी मंडळी कहाकर (बु.) जिरे ता. सेनगांव जिल्हा हिंगोली येथील ग्रामस्थांच्या विशेष सहकार्याने दिंडी चालू केली.

मौजे कहाकर (बु.) जिरे येथील ग्रामदैवत कर्णेश्वर भगवंताच्या आशिर्वादाने दिंडीचे पहिले वर्ष फार छान पार पडले. दिंडी मध्ये अनेक लोकांनी भरपूर सहकार्य केले, अगदी कांदा, लसूण,मसाला, सरपण (इंधन/जळतण) भांडी, नवीन तंबू (पाल/राहुटी) टाळ, मृदंग इत्यादी साहित्य कहाकर (बु.) जिरे येथील गांवकरी मंडळी यांनी पुरविली.

या विशेष सहकार्या मध्ये दत्तराव भोणे, सीताराम वानखेडे, बाबुराव पोपळघट, दत्तात्रय आरसोडे, गजानन आरसोडे, लक्ष्मण मानदार, भगवान मानदार, विठ्ठल मानदार, हरिभाऊ पोपळघट, शिवाजी पोपळघट, उद्धव पायघन, उद्धव पोपळघट, दत्तराव नागुलकर, विनायकराव पाटील पोपळघट, विजय पाटील पोपळघट, अरुण पाटील, अशोक पाटील, विठ्ठल शावकार, नारायण शावकार, मधुकर हरीमकर, विठ्ठल मिस्त्री खोंडकर,

वेबसाईट निर्मिती[संपादन]

धनंजय महाराज मोरे यांनी वारकरी संत साहित्य व प्राचीन हिंदू धार्मिक साहित्य इंटरनेट (महाजालावर) शुद्ध स्वरुपात देण्यासाठी स्वतःला वाहून घेतले असून असून त्यासाठी त्यांनी एक वेबसाइट सुरू केली आहे या वेबसाईटवर महाराष्ट्रातील संत आणि प्राचीन ऋषीमुनींनी लिहिलेले संस्कृत ह्या गोष्टी सर्व समाजाला उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी www.dhananjaymaharajmore.com हि वेबसाईट चालू केली आहे वेबसाईटवर सर्व प्रकारचे वारकरी ग्रंथ, आरत्या, स्तवन, मराठी ग्रंथ, उपलब्ध करण्यात येत आहेत हे ग्रंथ वेगवेगळ्या format मध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.  pdf, documents, इत्यादी,

अँन्ड्रॉईड ॲप्लिकेशन निर्मिती[संपादन]

धनंजय महाराज मोरे यांनी वारकरी संत साहित्य व प्राचीन हिंदू धार्मिक साहित्य इंटरनेट (महाजालावर) शुद्ध स्वरुपात देण्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे.

त्यासाठी त्यांनी काही अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर तयार केले आहेत. त्याची यादी. 

कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी खालील रकान्यात येथून डाऊनलोड करा या शब्दावर क्लिक करा.

आणि बघण्यासाठी विस्तार शब्दावर क्लिक करा.

सॉफ्टवेअर तपशील
सॉफ्टवेअर चे नांव प्रकार किमंत तपशील डाऊनलोड
वारकरी भजनी मालिका अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन फ्री वारकरी संतांचे प्रकरणानुसार 1250 अभंग येथून डाऊनलोड करा
वारकरी संत चरित्रे अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन फ्री ३३ वारकरी संतांचे चरित्र असून त्यांची पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. येथून डाऊनलोड करा
संत तुकाराम अभंग गाथा डेमो अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन फ्री या गाथ्यात फक्त अ आणि आ चे अभंग देण्यात आलेले आहेत. येथून डाऊनलोड करा
संत तुकाराम अभंग गाथा संपूर्ण अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन 100 रुपये या गाथ्यात संत तुकाराम म. यांचे ४५८३ अभंग असून सूची च्या माध्यमातून कोणताही अभंग फक्त ५ सेकंदात पाहता येतो. येथून डाऊनलोड करा
९६ कुळी मराठी व वंश गोत्र देवक अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन फ्री मराठा समाजातील ९६ कुळांच्या देवक, कुळदैवत, वंश, गोत्र, या विषयी माहिती आहे. येथून डाऊनलोड करा
AMACHI MANGWADI अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन फ्री मांगवाडी (मंगलवाडी) गावाची फोन नंबर ची यादी व माहिती आहे. येथून डाऊनलोड करा
LONI KHURD GADE अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन फ्री लोणी खुर्द (गाडे) गावाची फोन नंबर ची यादी व माहिती आहे. येथून डाऊनलोड करा
RISOD अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन फ्री रिसोड (वाशिम) गावाची फोन नंबर ची यादी व माहिती आहे. येथून डाऊनलोड करा
अमृतानुभव अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन फ्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा एक महत्वाचा ग्रंथ असून तो ओवी बद्ध आहे. येथून डाऊनलोड करा
शुद्ध वारकरी काकडा भजन अभंग अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन फ्री वारकरी सांप्रदायिक लोक दररोज सकाळी ४ ते ६ वेळेत अनेक वारकरी संतांचे अभंग गावून भगवान पंढरीनाथाची काकड आरती गातात ते अभंग आहेत. येथून डाऊनलोड करा
दृष्टांत संग्रह अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन फ्री अनेक क्षेत्रातील लोकांना व्याखान, भाषण, भारुडकर, किर्तन, प्रवचन, सूत्र संचालन या साठी उपयुक्त. येथून डाऊनलोड करा
ताटीचे अभंग अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन फ्री संत मुक्ताबाईंनी आपल्या वडील बंधू संत ज्ञानेश्वर यांना केलेला अभंगरुपी उपदेश. येथून डाऊनलोड करा
चांगदेवपासष्टी अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन फ्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी १४०० वर्षाच्या महान योगी चांगदेवाला ६५ ओव्यांचा केलेला उपदेश. येथून डाऊनलोड करा
बाळक्रीडा अभंग वारकरी संतांचे अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन फ्री अनेक संतांनी भगवान श्रीकृष्ण यांच्या बालपणाच्या क्रीडा ज्या अभंगात गायिल्या आहेत ते अभंग, खासकरून संत तुकारामांचे बाळक्रीडा अभंग प्रसिद्ध आहेत. येथून डाऊनलोड करा
सार्थ पसायदान अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन फ्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे शेवटी आपले गुरू संत निवृत्तीनाथांकडे ओवी रूपाने मागितलेले दान पसायदान. येथून डाऊनलोड करा
चिरंजीव पद ‍‍‍संत एकनाथ अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन फ्री संत एकनाथांनी साधकाला साधनेत येणाऱ्या धोक्याची सूचना व साधनेतील कर्तव्याचा उपदेश ४२ ओवी रूपाने केला. येथून डाऊनलोड करा
नाटाचे अभंग अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन फ्री येथून डाऊनलोड करा
पंचीकरण संस्कृत‌‌‌ अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन फ्री येथून डाऊनलोड करा
पंचदशी (संस्कृत) अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन फ्री येथून डाऊनलोड करा
संतांच्या पुण्यतिथी अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन फ्री येथून डाऊनलोड करा
सार्थ गीता संस्कृत-हिंदी अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन फ्री येथून डाऊनलोड करा
गीता (संस्कृत-इंग्लिश) अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन फ्री येथून डाऊनलोड करा
सार्थ हनुमान चालीसा अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन फ्री येथून डाऊनलोड करा
अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन येथून डाऊनलोड करा
  1. वारकरी भजनी मालिका येथून डाऊनलोड करा
  2. वारकरी भजनी मालिका अँड्रॉइड aap >> येथून डाऊनलोड करा
  3. AMACHI MANGWADI APP >> येथून डाऊनलोड करा
  4. वारकरी संत चरित्र निर्मिती येथून डाऊनलोड करा
  5. संत तुकाराम अभंग गाथा निर्मिती अँड्रॉइड APP