द हिल स्कूल (पॉट्सटाउन)
Appearance
द हिल स्कूल ही अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील पॉटस्टाउन येथील चार वर्षांचा अभ्यासक्रम असलेली खाजगी, कॉलेज-पूर्व निवासी शाळा आहे. ही शाळा फिलाडेल्फियाच्या वायव्येस सुमारे ३५ मैल (५६ किमी) अंतरावर २०० एकर (८१ हेक्टर) परिसरात पसरलेली आहे.[१] द हिल स्कूल हे 'टेन स्कूल्स ॲडमिशन ऑर्गनायझेशन'चा भाग आहे.
ही शाळा मिडल स्टेट्स असोसिएशन ऑफ कॉलेजेस अँड स्कूल्सच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आयोगाद्वारे मान्यताप्राप्त आहे.[२]
इंग्लिश लेखक जेम्स मिशनर येथे आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीस शिक्षक होते.
निवडक माजी विद्यार्थी
[संपादन]- जेम्स बेकर – अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री आणि व्हाइट हाउस चीफ ऑफ स्टाफ.
- जॉन बॅकस – फोर्ट्रान संगणक भाषेचे जनक आणि ट्युरिंग पुरस्कार विजेते संगणकशास्त्रज्ञ.
- लॉरेन्स रॉकफेलर – अमेरिकन उद्योजक, दानशूर आणि प्रसिद्ध रॉकफेलर घराण्याचे सदस्य.
- डोनाल्ड ट्रम्प जुनियर – अमेरिकन उद्योगपती आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्पचा मोठा मुलगा.
- एरिक ट्रम्प – अमेरिकन उद्योगपती आणि ट्रम्प ऑर्गनायझेशनचा विश्वस्त. डॉनल्ड ट्रम्पचा मुलगा.
संदर्भ आणि नोंद
[संपादन]- ↑ "The Hill School Campus". www.thehill.org. 2017-06-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-22 रोजी पाहिले.
- ↑ Hill School (The) Archived August 14, 2020, at the वेबॅक मशीन., Middle States Association of Colleges and Schools Commission on Elementary and Secondary Schools. Accessed January 7, 2018.