द सीगल
play by Anton Chekhov | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | नाटक | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
लेखक | |||
मध्ये प्रकाशित |
| ||
वापरलेली भाषा | |||
Number of parts of this work |
| ||
स्थापना |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
![]() |
द सीगल ( रशियन नाव: चायका) हे रशियन नाटककार आंतोन चेखव यांचे १८९५ मध्ये लिहिलेले आणि १८९६ मध्ये पहिल्यांदा नाट्यागृहात आलेले नाटक आहे. द सीगल हे चेखवच्या चार प्रमुख नाटकांपैकी पहिले नाटक मानले जाते. हे चार पात्रांमधील प्रणयात्मक आणि कलात्मक संघर्षांचे नाट्यमय चित्रण करते ज्यात आहे एक प्रसिद्ध मध्यमवयीन कथाकार बोरिस ट्रिगोरिन, कल्पक नीना, लुप्त होत चाललेली अभिनेत्री इरिना अर्काडिना आणि तिचा मुलगा प्रतीकात्मक नाटककार कॉन्स्टँटिन ट्रेप्लेव्ह.[१][२]
चेखवच्या इतर पूर्ण-लांबीच्या नाटकांप्रमाणे, द सीगल हे नाटक विविध, पूर्णपणे विकसित पात्रांच्या समूहावर वसलेले आहे. १९व्या शतकातील मुख्य प्रवाहातील रंगभूमीच्या मेलोड्रामाच्या विपरीत, या नाटकात भयानक कृती (जसे की कॉन्स्टँटिनचे आत्महत्येचे प्रयत्न) रंगमंचावर दाखवल्या जात नाहीत. अनेक वेळा पात्रे थेट बोलण्याऐवजी उपमजकूरात बोलतात.[३] बोरिस ट्रिगोरिन हे पात्र चेखवच्या महान पुरुष भूमिकांपैकी एक मानले जाते.
पहिल्या निर्मितीची सुरुवातीची रात्र एक प्रसिद्ध अपयशी होती. नीनाची भूमिका साकारणारी वेरा कोमिसारझेव्हस्काया प्रेक्षकांच्या विरोधामुळे इतकी घाबरली की ती आपले वाक्य विसरली. चेखव प्रेक्षकांना सोडून गेला आणि शेवटचे दोन भाग त्याने पडद्यामागे घालवले. जेव्हा समर्थकांनी त्यांना लिहिले की हे नाटक नंतर यशस्वी झाले, तेव्हा चेखवनी असे गृहीत धरले की ते फक्त दयाळूपणे असे लिहीत आहेत.[४] १८९८ मध्ये जेव्हा त्या काळातील रशियन रंगभूमीचे प्रणेते कोन्स्तांतिन स्त्नानिस्लावस्की यांनी त्यांच्या मॉस्को आर्ट थिएटरसाठी हे नाटक दिग्दर्शित केले तेव्हा हे नाटक यशस्वी झाले. स्त्नानिस्लावस्कीची निर्मिती "रशियन रंगभूमीच्या इतिहासातील सर्वात महान घटनांपैकी एक आणि जागतिक नाटकाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या नवीन घडामोडींपैकी एक" बनली आहे.[५]
स्त्नानिस्लावस्कीच्या दिग्दर्शनामुळे द सीगल हे नाटक सबटेक्स्टच्या संकल्पनेच्या अतिरेकीपणामुळे एक शोकांतिका म्हणून पाहिला गेला, तर चेखवचा हेतू हे एक विनोदी नाटक असावे असा होता.
कलाकार आणि पात्रे
[संपादन]- इरिना निकोलायव्हना अर्कादिना - एक अभिनेत्री, विवाहित आडनाव ट्रेप्लेवा
- कॉन्स्टँटिन गॅव्ह्रिलोविच ट्रेपलेव्ह - इरिनाचा तरुण मुलगा
- प्योत्र निकोलायेविच सोरिन - इरिनाचा भाऊ, ग्रामीण इस्टेटचा मालक.
- नीना मिखाइलोव्हना झारेचनाया - एक तरुण श्रीमंत जमीनदाराची मुलगी.
- इल्या अफानास्येविच शामरायेव – निवृत्त लेफ्टनंट आणि सोरिनच्या इस्टेटचे व्यवस्थापक
- पोलिना आंद्रेयेव्हना - शामरायेवची पत्नी
- मारिया इलिनिश्ना शमरेयेवा, "माशा" - पोलिना व इल्या यांची मुलगी
- बोरिस अलेक्सेविच ट्रिगोरिन - एक कादंबरीकार
- येव्हगेनी सर्गेयेविच डॉर्न - एक डॉक्टर
- सेमियन सेम्योनोविच मेदवेडेन्को - माशाच्या प्रेमात पडलेला एक शिक्षक.
- याकोव्ह - एक कामगार
- स्वयंपाकी
- दासी
पात्र | वेस्ट एंड पुनरुज्जीवन | वेस्ट एंड पुनरुज्जीवन | पब्लीक रंगमंच | वेस्ट एंड पुनरुज्जीवन | ब्रॉडवे पुनरुज्जीवन | वेस्ट एंड पुनरुज्जीवन | वेस्ट एंड पुनरुज्जीवन |
---|---|---|---|---|---|---|---|
१९३६ | १९९४ | २००१ | २००७ | २००८ | २०२० | २०२५ | |
इरिना | इडिथ इव्हान्स | जुडी डेंच | मेरिल स्ट्रीप | फ्रान्सिस बार्बर | क्रिस्टिन स्कॉट थॉमस | इंदिरा वर्मा | केट ब्लँचेट |
कॉन्स्टँटिन | - | एलन कॉक्स | फिलिप सेमोर हॉफमन | रिचर्ड गोल्डिंग | मॅकेन्झी क्रुक | डॅनियल मॉक्स | कोडी स्मिट-मॅकफी |
प्योत्र सोरिन | फ्रेडरिक लॅयीड | नॉर्मन रॉडवे | क्रिस्टोफर वॉकेन | विल्यम गॉंट | पीटर वाइट | रॉबर्ट ग्लेनिस्टर | जेसन वॉटकिन्स |
नीना | पेगी ॲशक्रॉफ्ट | हेलेन मॅकक्रोरी | नॅटली पोर्टमन | रोमोला गराई | केरी मुलिगन | एमिलिया क्लार्क | एम्मा कोरिन |
इल्या शामरायेव | जॉर्ज डिव्हाईन | रॉबर्ट डेमेगर | जॉन गुडमन | गाय विल्यम्स | ज्युलियन गॅम्बल | जेसन बार्नेट | पॉल हिगिन्स |
पोलिना अँड्रीएव्हना | - | अॅना काल्डर-मार्शल | डेब्रा मोंक | मेलानी जेसॉप | अॅन डाऊड | सारा पॉवेल | प्रियांगा बर्फोर्ड |
"Masha" Shamreyeva | मारिटा हन्ट | रेचल पॉवर | मार्सिया गे हार्डन | मोनिका डोलन | झो कझान | सोफी वू | तान्या रेनॉल्ड्स |
बोरिस ट्रिगोरिन | जॉन गिलगुड | बिल नाय | केविन क्लाइन | गेराल्ड किड | पीटर सार्सगार्ड | टॉम रायस हॅरीस | टॉम बर्क |
येवगेनी डॉर्न | - | एडवर्ड पेथेब्रिज | लॅरी पाइन | जोनाथन हाइड | आर्ट मलिक | गेराल्ड किड | पॉल बझली |
सेमियन मेदवेडेन्को | - | जॉन हॉजकिन्सन | स्टीफन स्पिनेला | बेन मेयजेस | पियर्स क्विग्ली | मिका ओनिक्स जॉन्सन | झाचरी हार्ट |
याकोव्ह | - | जिमी गार्डनर | हेन्री गमर | पीटर हिंटन | क्रिस्टोफर पॅट्रिक नोलन | - | - |
संदर्भ
[संपादन]- ^ Ludman, Mark (8 February 2019). "REVIEW: The Seagull, Satirikon Theatre, Moscow (Stage Russia) ✭✭✭✭✭". British Theatre.com. 26 May 2021 रोजी पाहिले.
- ^ Kirsch, Adam (July 1997). "Chekhov in American". The Atlantic. 8 February 2009 रोजी पाहिले.
- ^ Benedetti 1989, 26.
- ^ Chekhov (1920); Letter to A. F. Koni, 11 November 1896. Available online at Project Gutenberg.
- ^ Rudnitsky 1981, 8.
- संदर्भग्रंथ
- Benedetti, Jean. 1989. Stanislavski: An Introduction. Revised edition. Original edition published in 1982. London: Methuen. आयएसबीएन 0-413-50030-6.
- Rudnitsky, Konstantin. 1981. Meyerhold the Director. Trans. George Petrov. Ed. Sydney Schultze. Revised translation of Rezhisser Meierkhol'd. Moscow: Academy of Sciences, 1969. आयएसबीएन 0-88233-313-5.