Jump to content

द रिट्रीट बिल्डिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द रिट्रीट बिल्डिंग

द रिट्रीट बिल्डिंग (The Retreat Building मराठीत प्रत्याहार भवन) हे हिमाचल प्रदेश राज्यातील शिमला येथील भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. राष्ट्रपती उन्हाळ्यात किमान दोन आठवडे इमारतीत राहतात आणि अधिकृत कामकाज करतात. यादरम्यान मुख्य कार्यालय या ठिकाणी स्थलांतरित होते. शिमला शहरापासून १३ किमी अंतरावर मशोबरा डोंगराच्या माथ्यावर ही इमारत आहे. हे शिमला रिज टॉपपासून १००० फूट उंचीवर आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन आणि हैदराबाद, तेलंगणातील राष्ट्रपती निलयम ही राष्ट्रपतींची इतर निवासस्थाने आहेत. राष्ट्रपतींच्या तीन निवासस्थानांपैकी हे सर्वात जुने निवासस्थान आहे. या इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे ती पूर्णपणे लाकडी आहे. येथील भिंती धाजी वॉल कन्स्ट्रक्शन टेक्निकने बनवलेल्या आहेत. हे तंत्र भूकंप प्रतिरोधक घरे बनवण्यासाठी वापरले जाते. हे १८५० मध्ये बांधले गेले. १८९५ मध्ये ब्रिटिश व्हाईसरॉयने या इमारतीवर ताबा मिळवला. स्वातंत्र्यानंतर ही इमारत भारत सरकारच्या ताब्यात देण्यात आली.[१]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Draupadi Murmu: एक नहीं तीन राष्ट्रपति निवास... दिल्ली के बाहर और काफी पुरानी बिल्डिंग,जानें इसकी खूबियां". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2022-08-29 रोजी पाहिले.