द मदर्स अजेंडा
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
द मदर्स अजेंडा - (श्रीमाताजींबरोबरील संवाद) हा १३ खंडांचा पुस्तक-संच आहे. श्रीमाताजी अतिमानसाच्या अवतरणानंतर शरीराचे रूपांतरण करण्याच्या प्रयत्नांत होत्या. १९५१ ते १९७३ या बावीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी जे प्रयत्न केले त्याच्या तपशिलवार नोंदी या खंडांमध्ये केलेल्या आहेत. सत्प्रेम आणि सुजाता नहार यांच्याबरोबर श्रीमाताजींनी केलेल्या संवादाच्या या नोंदी आहेत. साधारण ६००० पानी हे लिखाण आहे.[१] हे संवाद टेपरेकॉर्डरवर उपलब्ध आहेत. एकंदरच मानवी उत्क्रांतीच्या वाटचालीचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना या नोंदी उपयुक्त ठरतील अशा आहेत. [२]
आधुनिक भौतिकशास्त्राच्या सिद्धांताच्या जवळ जातील अशा प्रकारचे अनुभव यामध्ये नोंदविण्यात आले आहेत. श्रीअरविंद यांच्या तत्त्वज्ञानानुसार मानवानंतर अतिमानव आणि त्यानंतर अतिमानसिक जीव या दोन श्रेणी उत्कांतीमध्ये उदयाला येणार आहेत. त्याच्या पाऊलखुणा या प्रयोगामध्ये पाहायला मिळतात.[२]
१९५४ पासून सत्प्रेम श्रीमाताजींबरोबर होणाऱ्या संवादाचे शब्दांकन करत असत. तेच लिखाण पुढे द मदर्स अजेंडा या नावाने प्रकाशित करण्यात आले. या लिखाणाचे टंकलेखन करण्याची जबाबदारी सुजाता नहार यांच्यावर सोपविण्यात आली. [३]
१९७८ मध्ये सत्प्रेम आणि सुजाता, द मदर्स अजेंडा (श्रीमाताजींबरोबरील संवाद) या १३ खंडांच्या पुस्तक-प्रकल्पावर काम करू लागले.
द मदर्स अजेंडाची मांडणी
[संपादन]द मदर्स अजेंडाची मांडणी खालीलप्रमाणे तेरा खंडामध्ये करण्यात आली आहे. [२]
| खंड क्र. | कालावधी | तपशील | पृष्ठसंख्या
(आवृत्तीनुसार यामध्ये फरक असू शकतो) |
|---|---|---|---|
| ०१ | १९५१-१९६० | या अजेंडाचे संकलक सत्प्रेम यांच्या मानसिक जडणघडणीचा कालखंड आहे. या अजेंडाच्या प्रकल्पाच्या दृष्टीने श्रीमाताजी सत्प्रेम यांची तयारी करून घेत होत्या, असे यातील नोंदींवरून लक्षात येते. | ५४० |
| ०२ | १९६१ | श्रीमाताजींना त्यांच्या शरीराचा अनुभव स्थूल पातळीवर नव्हे, तर उपअणु भौतिकशास्त्राच्या (subatomic physics) पातळीवर येत होता, तो अनुभव येथे नोंदविण्यात आला आहे. | ४६० |
| ०३ | १९६२ | ५४० | |
| ०४ | १९६३ | ४८५ | |
| ०५ | १९६४ | ३५० | |
| ०६ | १९६५ | ३७० | |
| ०७ | १९६६ | ||
| ०८ | १९६७ | ||
| ०९ | १९६८ | ३८० | |
| १० | १९६९ | ५६० | |
| ११ | १९७० | ३२० | |
| १२ | १९७१ | ३९५ | |
| १३ | १९७२-१९७३ | ३९५ |
अभ्यासकांसाठी
[संपादन]श्रीअरविंद व श्रीमाताजी यांनी प्रतिपादित केलेला पूर्णयोग समजावून घेण्यासाठी हे खंड उपयुक्त आहेत.[१] अभ्यासकांना उपयुक्त होतील अशा प्रकारे याची विषय-सूची देखील तयार करण्यात आली आहे. प्रत्यक्ष श्रीमाताजी आणि सत्प्रेम व सुजाता यांच्यातील हे संवाद ऐकण्याची सोय ऑरोविल येथील सावित्री भवन मध्ये उपलब्ध आहे.[४]
संदर्भ
[संपादन]- 1 2 Georges Van Vrekhem (2007). Beyond Man. Delhi: Rupa and Co. ISBN 978-81-291-1142-5.
- 1 2 3 e-Books, Auro (2013-04-23). "The Mother's Agenda. Full English text (ebook)". Auro e-Books (इंग्रजी भाषेत). 2026-01-31 रोजी पाहिले.
- ↑ Satprem (1980). Mother's Agenda - 1967, Vol 08. Paris: Institut de Recherches Evolutives.
- ↑ "House of Mother's Agenda (H.O.M.A) | Auroville". auroville.org. 2025-08-08 रोजी पाहिले.
