द ग्रेट खली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द ग्रेट खली
वैयक्तिक माहिती
जन्मजात नाव दिलीप सिंह राणा
पूर्ण नाव दिलीप सिंह ज्वाला सिंह राणा
टोपणनाव
 • जायंट सिंग
 • द ग्रेट खली
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान ह्युस्टन ,टेक्सास , संयुक्त राज्य अमेरिका
जन्मदिनांक २७ आॅगस्ट १९७२
जन्मस्थान धिराईना , हिमाचल प्रदेश , भारत.
उंची ७ फूट ३ इंच[१]
वजन १५७ कीलो
खेळ
देश भारत
खेळ व्यावसायीक कूस्ती
व्यावसायिक पदार्पण आॅल प्रो रेस्लिंग (२०००)
कामगिरी व किताब
वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी डब्ल्यू . डब्ल्यू .ई. वर्ल्ड हेवीवेट (२००७)

दिलीप सिंह राणा हे भारतीय, व्यवसायिक कुस्ती लढणारे कुस्तीचे खेळाडू आहेत. त्यांना त्यांच्या डब्ल्यु डब्ल्यु ई मधील 'द ग्रेट खली' या नावाने ते जगविख्यात आहेत. २००७ मध्ये डब्ल्यु डब्ल्यु ईत ते वर्ल्ड हेविवेट च्यांपियन झाले होते.[१]

पूर्व जीवन[संपादन]

दिलीप यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. सात भवांडापैकी ते एक होते. त्यांच्या वडिलांचे नाव ज्वाला सिंह , त्यांच्या आईचे नाव तांदी देवी होते. दिलीपचा जन्म हिंदू कुटुंबात झाला. गरिबीच्या परिस्थितीमुळे त्यांना लहानपणीच छोटे मोठे मजदूरी काम करावे लागले. त्यांना गाईगेंटिजम आजार झाला. या मुळे त्यांची उंची खूप वाढली. पुढे एका ठिकाणी सिक्युरिटी गार्ड महणून असताना. त्यांना एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांचा उंचीमुळे पंजाब पोलिसात नोकरी दिली[२].

वयक्तिक जीवन[संपादन]

'ज्वाला सिंह' आणि 'तांदी देवी' हे दिलीप सिंह राणा यांचे आई बाबा आहेत. २७ फेब्रुवारी २००२ला त्यांचा विवाह हरमिंदर यांच्याशी झाला. दिलीप - हर्मींदर यांना एक कन्या आहे. आता दिलीप यांना पूर्ण विश्व ओळखते त्या दिलीपचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला परंतु आपल्या अथक प्रयत्नांनी ते विश्वविख्यात कुस्ती खेळाडू बनले[३]

कुस्तीतील कारकीर्द[संपादन]

 • डब्ल्यू.डब्ल्यू.ई. -

दिलीप सिंह राणाला , द ग्रेट खली हे नाव डब्ल्यू .डब्ल्यू .ई. न दिल खली डब्ल्यू .डब्ल्यू .ई.त अनेक मोठ्ठ्या पेहेलवणान विरुद्ध लढला. जसे ट्रीपल एच , जॉन सिना , केन , बिग शो ई. २००७ मध्ये २० माणसांच्या बेटल रॉयल मॅच मध्ये त्यांनी सर्वांना पछाडत वर्ल्ड हेविवेट चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले. भारतातून डब्ल्यू .डब्ल्यू .ई.त जाणारा दिलीप सिंह राणा हा पहिला पेहेलवान होता[४].

साहित्य[संपादन]

दिलीप सिंह राणा यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तक - १. द म्यान हु बिकेम खली - पेंग्विन प्रकाशन [५]

सिनेमा आणि दूरदर्शन[संपादन]

 • सिनेमा -

दिलीप सिंह राणा यांनी भूमिका निभावलेले सिनेमे आणि त्याच नाव १.द लोंगेस्ट यार्ड २. गेट स्मार्ट - दिलीप ३. हुबा -ऑन द ट्रेल ऑफ मर्सुपिलामी - बोलो / पेटीटे होईक्स ४. मॅकग्रुबर (२०१०)

 • दूरदर्शन -

दिलीप सिंह राणा यांनी पाहुणा कलाकार पाहुणा कलाकार म्हनुन उपस्तीथी दर्शविलेले दूरदर्शन वरील कार्यक्रम आणि सहभाग घेतलेले कार्यक्रम - १.आऊट सोरसड (एन बी सी चॅनल ) यू एस ए. २.पेयर ऑफ किंग्ज (डिस्नी चॅनल ) यू एस ए.[६]

संदर्भ[संपादन]

 1. ^ a b https://www.wwe.com/shows/thebash/2007/matches/408116411
 2. ^ पांडे, क्रिती (२०२०). "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खली ". भारत: Timesnow.com. pp. १.
 3. ^ पांडे, क्रिती (२०२०). "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खली". भारत: टाईम्स नाऊ संकेतस्थळ. pp. १.
 4. ^ दबल्यू डबल्यू ई, डब्ल्यू दब्ल्यू ई वेब टीम , (२० नोव्हेंबर २०२०). "द ग्रेट खली - सूपरस्टार स्टॅट्स". WWE. २० नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link)
 5. ^ https://books.google.co.in/books?id=NtHMAQAACAAJ&redir_esc=y
 6. ^ https://www.wwe.com/superstars/the-great-khali