द केरळ स्टोरी २
| द केरळ स्टोरी २ गोज बियाँड | |
|---|---|
| दिग्दर्शन | कामाख्या नारायण सिंह |
| निर्मिती | विपुल शाह |
| कथा | विपुल शाह, अमरनाथ झा |
| प्रमुख कलाकार | उल्का गुप्ता, अदिती भाटिया, ऐश्वर्या ओझा, सुमित गहलावत, अर्जन सिंग औजला, युक्तम खोसला, अलका अमीन |
| संगीत | मन्नन शाह |
| ध्वनी | मन्नन शाह आणि राहुल सुहास |
| देश | भारत |
| भाषा | हिंदी |
| प्रदर्शित | २७ फेब्रुवारी २०२६ |
| अवधी | १३० मिनिटे |
| निर्मिती खर्च | २८-३० कोटी[१] |
द केरळ स्टोरी २ गोज बियाँड हा २०२६ चा हिंदी भाषेतील चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन कामाख्या नारायण सिंह यांनी केले असून निर्मिती सनशाइन पिक्चर्सच्या माध्यमातून विपुल अमृतलाल शाह यांची आहे.[२] २०२३ सालच्या द केरळ स्टोरी चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. या चित्रपटात उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा यांच्या भूमिका आहेत.
या चित्रपटाच्या झलक (टीझर आणि ट्रेलर)च्या प्रसारणानंतर काही कायदेशीर आणि राजकीय वादविवाद निर्माण झाले.[३] परंतु सर्व अडथळे पार पाडून हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतभर प्रदर्शित झाला[४] आणि समीक्षकांकडून त्याला संमिश्र पुनरावलोकने मिळाली.[५] याउलट या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७५ लाख, दुसऱ्या दिवशी ४.६५ कोटी, तर तिसऱ्या दिवशी ५ कोटीचा गल्ला जमा करत केवळ तीन दिवसात १० कोटीच्या पुढे कमाई केली. विशेष म्हणजे या चित्रपटाचे एकूण बजेट २८-३० कोटी इतकेच आहे.[१]
कथानक
[संपादन]पहिल्या भागाप्रमाणेच हा चित्रपट लव जिहाद, धर्मांतरण आणि फसवणुकीच्या मुद्द्यावर आधारित आहे. मात्र, यावेळी कथा फक्त केरळपुरती मर्यादित नसून राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळ अशा तीन राज्यांतील तीन हिंदू मुलींच्या संघर्षावर भाष्य करते. यात तीन मुख्य पात्र आहेत, कोची येथील सुरेखा, ग्वालियर मधील नेहा आणि जोधपुर ची दिव्या. या तीन मुलींना विविध तीन मुस्लिम युवक प्रथम प्रेमाच्या जाळ्यात फसवून नंतर धार्मिक बंधने टाकत त्यांचे सामाजिक, शारीरिक आणि मानसिक शोषण केले जाते.
कलाकार
[संपादन]- उल्का गुप्ता - सुरेखाच्या भूमिकेत
- अदिती भाटिया - दिव्याच्या भूमिकेत
- ऐश्वर्या ओझा - नेहाच्या भूमिकेत
- सुमित गहलावत सलीमच्या भूमिकेत
- अर्जन सिंग औजला - फैजानच्या भूमिकेत
- युक्तम खोसला - रशीदच्या भूमिकेत
- अलका अमीन - हफसा बेगमच्या भूमिकेत
संगीत
[संपादन]| द केरळ स्टोरी २ गोज बियाँड | |||
|---|---|---|---|
| साउंडट्रॅक द्वारे मन्नन शाह आणि राहुल सुहास | |||
| प्रदर्शित | १३ फेब्रुवारी २०२६ | ||
| शैली | चित्रपट संगीत | ||
| लांबी | १९ मिनिट आणि ३० सेकंद | ||
| भाषा | हिंदी | ||
| फीत | सनशाईन म्युजिक | ||
| निर्माता | मन्नन शाह | ||
| |||
या चित्रपटाचे संगीत मन्नन शाह आणि राहुल सुहास यांनी दिले आहे.[६]
"साथी रे" हे पहिले गाणे ४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाले. हे गाणे विशाल मिश्रा यांनी गायले आहे.[७]
| गीत संगीत यादी | |||
|---|---|---|---|
| क्र. | शीर्षक | गायक | अवधी |
| १. | "साथी रे" | विशाल मिश्रा | ३:२३ |
| २. | "ओ मायी रे" | श्रेया घोषल | ४:३१ |
| ३. | "शिव शंभू" | मन्नन शाह | ५:१० |
| ४. | "कान्हा" | पलक मुछल, राहुल सुहास | ३:२५ |
| ५. | "थारी जोगन" | शाओनी | २:५१ |
एकूण अवधी: |
१९:३० | ||
प्रदर्शन
[संपादन]१६ फेब्रुवारी २०२६ रोजी UA16+ प्रमाणपत्र मिळाल्यानंतर,[८] हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.[९] तत्पूर्वी केरळ उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर अंतरिम स्थगिती दिली होती.[१०]
२५ फेब्रुवारी २०२६ रोजी, केरळ उच्च न्यायालयाने निर्मात्यांना चित्रपटाच्या सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राला आव्हान देणाऱ्या याचिकांवर निर्णय होईपर्यंत चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचे निर्देश दिले आणि पंधरा दिवसाच्या आत सेन्सॉर बोर्डाला यावर मत मांडण्यास सांगितले.[११] सेन्सॉर बोर्डाने ने चित्रपटाच्या झलक आणि जाहिरातीतील कथित वादग्रस्त भागांचा चित्रपटात उल्लेख नसल्याचे प्रमाणपत्र जारी केल्यावर न्यायालयाने प्रदर्शनाची परवानगी दिली.[१२]
संदर्भ
[संपादन]- 1 2 "वादात अडकलेल्या 'द केरळ स्टोरी २'ची मोठी झेप, वीकेंडला तब्बल इतक्या कोटींची कमाई". दैनिक लोकमत. २०२६-०३-०२ रोजी पाहिले.
- ↑ Praveen, M. P. (2026-02-19). "Keralites roast 'The Kerala Story 2' trailer with 'beef-porotta' jibes on social media". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2026-02-20 रोजी पाहिले.
- ↑ "The Kerala Story 2 release date, cast and plot details revealed as the trailer sparks controversy". The Economic Times. 2026-02-18. ISSN 0013-0389. 2026-02-20 रोजी पाहिले.
- ↑ Pratap, Giti (2026-02-04). "Kerala High Court lifts stay on release of Kerala Story 2 movie". Bar and Bench - Indian Legal news (इंग्रजी भाषेत). 2026-02-27 रोजी पाहिले.
- ↑ "The Kerala Story 2 box office collection day 2: Vipul Amrutlal Shah film surpasses Taapsee's Assi despite mixed reviews". Hindustan Times. 1 March 2026 रोजी पाहिले.
- ↑ "The Kerala Story 2 Goes Beyond (Original Motion Picture Soundtrack)". Apple Music (इंग्रजी भाषेत). 22 February 2026 रोजी पाहिले.
- ↑ "The Kerala Story 2 song Saathi Re: Soulful track talks of love turned into betrayal". India Today (इंग्रजी भाषेत). 4 February 2026.
- ↑ "CBFC | Search Film". Central Board of Film Certification. 26 February 2026 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ↑ Kumar, Shubhi (2026-02-17). "'The Kerala Story 2 - Goes Beyond' Trailer OUT: Release Date, Full Cast, What to Expect, & More". The Sunday Guardian (इंग्रजी भाषेत). 2026-02-20 रोजी पाहिले.
- ↑ "The Kerala Story 2 release stalled? Kerala High Court grants interim stay hours before film was to release". Hindustan Times. 26 February 2026 रोजी पाहिले.
- ↑ "High Court halts The Kerala Story 2: Don't release rights until court decides". India Today. 25 February 2026 रोजी पाहिले.
- ↑ "'The Kerala Story 2': HC stays single judge order halting film release". द हिंदू. 26 February 2026 रोजी पाहिले.