Jump to content

द अ‍ॅडव्हेंट (त्रैमासिक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

द अ‍ॅडव्हेंट हे श्रीअरबिंदो आश्रमातर्फे प्रकाशित होणारे त्रैमासिक आहे आणि ते श्रीअरविंद यांच्या क्रांतदर्शी दृष्टिकोनाच्या मांडणीला समर्पित आहे.

इतिहास आणि स्वरूप

[संपादन]

द अ‍ॅडव्हेंटचा पहिला अंक २१ फेब्रुवारी १९४४ रोजी प्रकाशित झाला. सुरुवातीचे अंक मद्रासमध्ये छापले गेले होते, नंतर प्रकाशन पाँडिचेरी येथील श्रीअरविंद आश्रमात हलवण्यात आले. हे मासिक इंग्रजीमध्ये त्रैमासिक स्वरूपात प्रकाशित होते. []

अ‍ॅडव्हेंटमध्ये अनेकदा श्रीअरविंदांचे साहित्य प्रकाशित होत असे. [] द सिंथेसिस ऑफ योगा या ग्रंथाची सहा ते बारा ही प्रकरणे त्यांच्या सुधारित स्वरूपात ऑगस्ट १९४६ ते एप्रिल १९४८ या काळात अनुक्रमे प्रकाशित झाली. सावित्री या महाकाव्याचे काही भाग १९४६ आणि १९४७ मध्ये प्रकाशित झाले. श्रीअरविंदांच्या सुरुवातीच्या लेखनातील (बडोदा काळातील) सहा लेखांची मालिका, १९५३ मध्ये द अ‍ॅडव्हेंटमध्ये प्रकाशित झाली होती. त्यामध्ये उपनिषदांचे तत्वज्ञान आणि उपनिषदांच्या भाषांतरावर एक लेख होता. अनेक सूत्रे आणि नंतरच्या काव्यरचना आणि इंद्राच्या अनेक स्तोत्रांचे भाषांतर देखील यामध्ये प्रकाशित झाले आहे.

संपादक

[संपादन]

नोलिनी कांता गुप्ता हे त्यांच्या मृत्यूपर्यंत द अ‍ॅडव्हेंटचे संपादक होते. त्यांच्या मृत्युनंतर १९८३ मध्ये एम.पी.पंडित यांनी पदभार स्वीकारला. समीर कांतो गुप्ता हे सध्याचे संपादक आहेत.

अन्य नियतकालिके

[संपादन]

पुद्दुचेरीतील श्री अरबिंदो आश्रमाशी संबंधित इतर जर्नल्समध्ये आर्य, श्री अरबिंदो मंदिर ॲन्युअल, श्रीअरबिंदो सर्कल, मदर इंडिया, वर्ल्ड युनियन, कोलॅबोरेशन आणि ऑरोव्हिल टुडे यांचा समावेश आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Integral Yoga Literature - List of Journals". Miraura. 4 June 2016 रोजी पाहिले.
  2. ^ Aurobindo Ghose; Robert A. McDermott (January 2001). The Essential Aurobindo. SteinerBooks. p. 283. ISBN 978-0-9701097-2-9. 4 June 2016 रोजी पाहिले.