दौलतराव शिंदे
दौलतराव शिंदे (१७७९ - २१ मार्च, १८२७) हे मध्य भारतातील ग्वाल्हेर संस्थानाचे राजे होते. हे १७९४ पासून १८२७ मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत सत्तेवर होते. त्यांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्यात वर्चस्वासाठी संघर्ष आणि विस्तारत असलेल्या ईस्ट इंडिया कंपनीशी अनेक युद्धे झाली. दुसऱ्या आणि तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धात दौलतरावांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बहुतेक भारतीय शासकांनी ब्रिटीश राजवट स्वीकारली असली तरी ग्वाल्हेरने १८३२ पर्यंत आपले स्वातंत्र्य कायम ठेवले आणि १८८६ पर्यंत मुघलांसह इतर शेजारील राज्यांकडून चौथ (कर) वसूल करणे सुरू ठेवले.
युद्धे आणि लढाया
[संपादन]दौलतरावांनी अनेक युद्धे आणि लढायांमध्ये भाग घेतला होता --
शिंदे यांनी तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धात आधी पेशव्यांना पाठिंबा दिला होता परंतु ब्रिटिशांनी त्यांना पेचात पकडल्यावर त्यांनी स्वतःचे राज्य सांभाळून ठेवणे पसंत केले.
दौलतराव हे १२ फेब्रुवारी, १७९४ रोजी वयाच्या १५व्या वर्षी महाराजा महादजी शिंदे यांच्या मृत्यूनंतर सत्तेवर आले. महादजींना वारस नसल्याने त्यांचे मोठे भाऊ तुकोजीराव शिंदे यांचे नातू असलेल्या दौलतरावांची वर्णी लागली. तुकोजीराव पानिपतच्या तिसऱ्या युद्धा आधी ७ जानेवारी, १७६१ रोजी लढाईत मारले गेले होते.
संदर्भ
[संपादन]- हंटर, विल्यम विल्सन, सर, आणि इतर (१९०८). इम्पीरियल गॅझेटियर ऑफ इंडिया, खंड १२. १९०८–१९३१; क्लॅरेंडन प्रेस, ऑक्सफर्ड.
- मार्कोविट्स, क्लॉड (संपादन) (२००४). आधुनिक भारताचा इतिहास: १४८०-१९५० . अँथम प्रेस, लंडन.