दैवज्ञ हितवर्धक समाज
दैवज्ञ हितवर्धक समाजही दैवज्ञ ब्राह्मण समाजाची त्यांच्या ज्ञातीच्या हितासाठी स्थापन केलेली एक फार जुनी संस्था आहे.
स्थापना
[संपादन]फार काळापासून दैवज्ञ समाजातील लोक मुंबई येथील गिरगावात एकवटलेले होते. नंतर माटुंगा, परळ, दादर, माहीम, वांद्रे ह्या परिसरात दैवज्ञ समाजातील लोक राहावयास आले. दादर माटुंगा भागात त्यांच्या हितासाठी एक संस्था स्थापण्याचे ठरवून दिनांक ६ जुलै १९२९ रोजी हरी महादेव वैद्य ह्यांच्या पेढीवर सभा होऊन दैवज्ञ हितवर्धक समाज, दादर ही संस्था स्थापन करण्यात आली.
संस्थेची वास्तू
[संपादन]संस्थेची वास्तू उभी करण्यासाठी सभासदांकडून भरपूर प्रमाणात आर्थिक पाठिंबा मिळाला आणि संस्थेच्या सभेत ठराव मंजूर करून इमारत फंड समिती स्थापन करण्यात आली. महापालिकेकडून कोहिनूर मिलच्या मागे असलेला ६४० चौ.मी.क्षेत्रफळ असलेला भूखंड प्राप्त करून त्यावर दहा वर्षे मेहनत घेऊन दिनांक ५ ऑगस्ट १९४६ रोजी विजयादशमी मुहूर्तावर पायाभरणी करण्यात आली. इसवी सन १९५० मध्ये इमारत उभी राहिली. इमारत फंडाला शंकर हरी वैद्य ह्यांनी दिलेल्या देणगीबद्दल इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सभागृहाला हरी महादेव वैद्य सभागृह नाव देण्यात आले.
सामाजिक हिताचे कार्य
[संपादन]संस्थेचे पहिल्या वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक, खेळविषयक अनेक उपक्रम हाती घेतले. दरवर्षी संस्था खालील उपक्रम राबवित असते.
- नामदारजगन्नाथ तथा नाना शंकरशेट पुण्यस्मरण.
- विद्यार्थी गुणगौरव
- निबंध, वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा
- क्रीडा स्पर्धा
- संस्था वर्धापनदिन
- गरजू ज्ञातीबांधवांना शैक्षणिक मदत
- वधू वर मेळावा
- दैवज्ञ सुंदर-सुंदरी स्पर्धा
- व्यापारी पेठ
- मौजीबंधन
- व्याख्यान माला
- राष्ट्रीय सण
- महिलांसाठी हळदीकुंकू
- भजन
- कोजागिरी पौर्णिमा
हे सगळे कार्यक्रम पूर्वी मे.हरी महादेव वैद्य ह्यांच्या पेढीवर होत असत.ज्ञातीबांधवांना जागा कमी पडू लागल्यावर हे कार्यक्रम राजा शिवाजी विद्यालय, भारत विद्या मंदिर, धुरू सभागृह,छबिलदास शाळेत आयोजित केले जाऊ लागले.
अमृतमहोत्सव
[संपादन]संस्थेचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम शिवाजी मंदिरनाट्यगृह येथे आयोजित केला गेला.
संस्थेची वाटचाल
[संपादन]संस्थेला ९६ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि संस्थेची यशस्वी वाटचाल चालू आहे. संस्थेच्या वाटचालीत ज्ञातीतील खालील माणसांचे योगदान आहे.
- कमलाकर वेदक
- शंकर हरी वैद्य
- अनंत हरचेकर
- शंकर मुसलोंडकर
- दामोदर हरचेकर
- वासुदेव भुर्के
- अनंत भुर्के
- काशिनाथ पाटणकर
- अनंत पावसकर
- विष्णू वेदक
- का.त्रि.पोतदार
- भाई वैद्य
- भाई मालंडकर
- श्रीधर मालंडकर
- नाना शिरोडकर
- सुरेंद्र भुर्के
- अनंत नारकर
- राम भडेकर
- सुभाष वैद्य
- प्रदीप वैद्य
- सुर्यकांत कल्याणकर
- शशिकांत पावसकर
- एकनाथ धामापुरकर
- विजय धारगळकर
- मनोहर पालशेतकर
- जगन्नाथ पेडणेकर
ह्यावर्षी वास्तूचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. [१]
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ↑ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, सोमवार,७ जुलै २०२५