देशी नट्यांचे परदेशी पती
हिंदी चित्रपटसृष्टीतील फारच थोड्या अभिनेत्रींनी विदेशी पती पसंत केले. त्या अभिनेत्रींपैकी काही ह्या :
- प्रियंका चोपडा : हिने १ डिसेबार २०१८ रोजी आपला मित्र निक जोन्सशी लग्न केले.
- प्रीती झिंटा : या नटीने 'कल होना हो', 'वीर झारा' आणि 'दिल चाहता है' सारख्या सुपरहिट सिनेमात काम केले. तिने २०१६ साली जीन गुडइनफ नावाच्या अमेरिकन व्यावसायिकाशी गुपचुप लग्न करून चित्रपट संन्यास घेतला.
- माधुरी दीक्षित : चित्रपटसृष्टीत आघाडीवर असतानाच माधुरीने इंग्लंडला जाऊन १९९९ साली डाॅ. श्रीराम माधव नेने या वैद्यकीय प्रॅक्टिशनरशी लग्न केले. तिला दोन मुले आहेत. टी.व्हीवरील नृत्य स्पर्धांंची ती अनेकदा परीक्षक असते.
- राजेश खन्नाची सुमारे २० चित्रपटांत नायिका असलेल्या मुमताज हिने युगांडातील व्यावसायिक मयूर मधवानीशी लग्न केले.
- राधिका आपटे : ह्या मराठमोळ्या नटीने इंग्लंडमधील संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी २०१३ साली लग्न केले. २००५ साली हिंदी चित्रपट 'वाह लाइफ हो तो ऐसी'मध्ये राधिकाने पहिली छोटीशी भूमिका केली. तिने हिंदी व्यतिरिक्त मराठी, तेलुगू, मलयालम आणि बंगाली भाषांतील चित्रपटांतही कामे केली आहेत. 'पॅडमॅन' हा तिचा गाजलेला चित्रपट. लंडनला प्रचलित प्रकारचे नृत्य शिकायला गेली असताना राधिकाला बेनेडिक्ट भेटला.
- 'नो एंट्री' चित्रपटामुळे प्रसिद्धीस आलेली सेलिना जेटली (Celina Jaitly). २००१ साली ती मिस इंडिया झाली आणि त्याच वर्षीच्या विश्वसुंदरी स्पर्धेत तिचा चौथा क्रमांक आला. या दोन स्पर्धांखेरीज सेलिनाने मिस मार्गो खूबसूरत त्वचा पुरस्कार, इंडिया टाइम्स सर्फर्स चाॅईस पुरस्कार आणि MTVचे मोस्ट वाँटेड ॲवाॅर्ड मिळवले. २००३ साली सेलिना जेटलीने जानशीन नावाच्या हिंदी थरारपटातून सिनेसृष्टीत प्रवेश केला.
सेलिना जेव्हा दुबईला भारतीय फॅशन ब्रँड स्टोअर उघडण्यासाठी गेली होती, तेव्हा तिला अनेक हाॅटेलांचे मालक असलेले व्यापारी पीटर हाॅग भेटले. पहिल्याच भेटीत दोघांचे प्रेम जमले. या जोडप्याला २०१२ साली एकदा आणि २०१७ साली दुसऱ्यांदा जुळे झाले. पहिल्या जुळ्यांची नावे विराज आणि विन्स्टन. दुसरेही दोन मुलगे आहेत. संसारात गुंतल्यामुळे सेलिना २०१० सालानंतर चित्रपटांत कामे करू शकली नाही. पण तोपर्यंत तिचे २० हिंदी चित्रपट झाले होते.
हिंदी पुरुष अभिनेत्यांच्या विदेशी पत्नी[संपादन]
- शशी कपूरची पत्नी जेनिफर केंडल : . जेनिफर केंडल (जन्म : २८ फेब्रुवारी १९३३; - ७ डिसेंबर १९८४) या शशी कपूर यांच्या पत्नी. या विदेशी होत्या. जेव्हा शशी कपूरचे आपले वडील पृथ्वीराज कपूर यांच्या नाटकांत कलकत्त्याच्या नाट्यगृहात रंगमंचावर अभिनय करीत असत, त्यावेळी जेनिफर पहिल्या ओळीत बसून रोज त्यांचे नाटक पहात असे. शशी कपूरला ही मुलगी आवडली आणि त्याने आपला चुलत भाऊ सुभिराज याच्याकरवी तिला मागणी घातली. त्यानंतर त्या दोघाची थिएटरबाहेर भेट झाली. या पहिल्या भेटीत शशी कपूर खूप घाबरलेले होते, पण जेनिफर नाॅर्मल होती. त्यानंतर जेनिफर आपल्या मित्रमंडळीसह शशी कपूरची नाटके पाहाण्यास येऊ लागली. आणि अशा प्रकारे तिची आणि शशी कपूरची मैत्री वाढली.
मोठ्या हाॅटेलमध्ये जाऊन खाणे शशीच्या खिशाला परवडण्यासारखे नव्हते, म्हणून त्याने जेनिफरला आपला भाऊ शम्मी कपूरच्या घरी बोलावले. शम्मी कपूरच्या पत्नी गीता बालीने जेनिफरला पहिल्या भेटीत पसंत केले. शम्मीने वडील पृथ्वीराज कपूर यांची, शशी कपूरचे विदेशी मुलीशी लग्न करण्यासाठी मोठ्या मिनतवारीने परवानगी मिळवली. १९५८ साली मुंबईत दोघांचे लग्न झाले. त्यानंतर त्या दोघांनी २६ वर्षे प्रेमभरा संसार केला.
शशी कपूर यांच्या पत्नी जेनिफर यांचे १९८४ साली कर्करोगाने निधन झाले. त्या दोघांना कुणाल, करण हे मुलगे आणि संजना कपूर ही मुलगी आहे.