देव दीनाघरी धावला (नाटक)
देव दीनावरी धावला हे एक १९७० सालातील मराठी संगीत नाटक आहे. नाटककार आणि लेखक बाळकृष्ण हरी कोल्हटकर यांनी याचे लिखाण आणि दिग्दर्शन केले आहे. 'कृष्ण-सुदामाची प्रसिद्ध कथा एक नवीन रूप घेऊन येत आहे' अशी या नाटकाची जाहिरात करण्यात आली होती. महाभारतातील कृष्ण-सुदाम्याच्या गोष्टीला तत्कालीन राजकीय, सामाजिक परिस्थितीचा संदर्भ देऊन या नाटकाचे कथानक लिहिण्यात आले होते.[१]
श्रीकृष्ण व रुक्मिणी हे सुदाम्याची परीक्षा घेण्यासाठी जातात, हा या नाटकाचा मुख्य गाभा आहे. कोल्हटकरांनी या नाटकात नारदाची भूमिका केली होती. उदयराज गोडबोले या गायक नटाने श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. तर जोगळेकर यांनी सुदामा, आशा काळे[२] यांनी रुक्मिणी आणि लता थत्ते यांनी सत्यभामा अशी पात्रे साकारली होती.
कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांनी गायलेली 'उठी उठी गोपाला' ही भूपाळी व 'ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी' ही गाणी याच नाटकातील आहेत. या गाण्यांना वसंत देसाई यांनी संगीत दिले होते.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ "कोल्हटकरांचा कात्रीत सापडलेला 'देव दीनाघरी धावला". weeklysadhana.in. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "मराठी चित्रपटातील वात्सल्यमूर्ती आशा काळे". mymahanagar.com. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "पद्मभूषण पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचे निधन". ईटीव्ही भारत. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.