देव दिवाळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(देव दिवादीपावली या पानावरून पुनर्निर्देशित)

देव दिवाळी हा सण महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकणात साजरा होतो.

धार्मिक महत्त्व[संपादन]

  • या दिवशी देव-देवतांची दिवाळी असते असे मानले जाते. या दिवशी बळीच्या राज्यातून श्रीविष्णू आपल्या मूळ स्थानी परत आले अशीही समजूत प्रचलित आहे.[१]
  • या दिवशी गंगा नदीत स्नान करणे आणि संध्याकाळी नदीत दीपदान करणे पवित्र आणि पुण्य देणारे मानले जाते.[२]
  • कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी. या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. चातुर्मास्य समाप्तीनंतर लग्नाचे मुहूर्त निघायला लागतात. सुरुवात तुळशीच्या लग्नाने होते. एकादशी ते पौर्णिमा या पाच दिवसांंपैकी कोणत्याही एका दिवशी घरांघरांतून उसाच्या दांडक्यांचे मंडप घालून त्यांत तुळस आणि बाळकृष्ण यांचे विवाह संपन्न होतात.बाळकृष्ण मूर्ती किंवा पूजेतील शाळीग्राम यांच्याशी तुलसीचा विवाह लावला जातो.[३]
कार्तिक पौर्णिमा दीपोत्सव

भारताच्या विविध प्रांतात[संपादन]

'देव दिवाळीला गंगा नदीत सोडलेले दिवे
  • प्राचीन काळी पोर्तुगीजांचे राज्य असलेल्या दीवमध्ये तुळशीची लग्ने सार्वजनिकरीत्या लागतात.
  • गुजरातमध्ये दिवाळीचा उत्सव हा धनत्रयोदशीपासून देव दिवाळीपर्यंत साजरा केला जातो.
  • काशीमध्ये हा सण कार्तिक पौर्णिमेला साजरा होतो. राजे-राजवाड्यांच्या काळात हा उत्सव होत असे. साम्राज्य आणि संस्थाने नाहीशी झाल्यावर ही पद्धती बंद पडली होती परंतु १९८६ सालापासून काशीतील स्थानिक भाविकांनी ही प्रथा पुन्हा सुरू केली.[४] गंगा नदीच्या घाटांवर त्या दिवशी तेलाचे असंख्य दिवे लावले जातात.दीपोत्सव केला जातो.[५]

हे ही पहा[संपादन]

देवदीपावली

दिवाळी

त्रिपुरी पौर्णिमा

संदर्भ[संपादन]

  1. ^ Bairwa, Rajat Gupta, Nishant Singh, Ishita Kirar & Mahesh Kumar. Hospitality & Tourism Management (इंग्रजी भाषेत). Vikas Publishing House. ISBN 9789325982444.
  2. ^ Dwivedi, Dr Bhojraj (2014-10-27). Religious Basis of Hindu Beliefs (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books Pvt Ltd. ISBN 9789351650928.
  3. ^ Gajrani, S. (2004). History,Religion and Culture of India (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 9788182050624.
  4. ^ Shandilya, Rajeshwari (2009-01-01). Bharatiya Parva Evam Tyohar (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9788173156175.
  5. ^ "Dev diwali kartik purnima 2018: आज जलेंगे लाखों दीये और जगमग .. Read more at: navbharattimes.indiatimes.com?p=51024&utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst". २३.११. २०१८. line feed character in |title= at position 64 (सहाय्य); |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)