देवानंद सोनटक्के

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.देवानंद सोनटक्के
डॉ. देवानंद सोनटक्के .jpg
डॉ. देवानंद सोनटक्के
जन्म नाव देवानंद गोविंदराव सोनटक्के
जन्म १ ऑक्टो. १९७४
कळमना, ता. वणी जि.यवतमाळ (महाराष्ट्र)
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र समीक्षक, साहित्य संशोधन, लेखक, प्राध्यापक
साहित्य प्रकार समीक्षा
प्रसिद्ध साहित्यकृती सामर्थ्याचा स्वर, समीक्षेचा अंत:स्वर
वडील गोविंदराव
आई सुमनबाई
पत्नी विशाखा
अपत्ये श्रीनिधी, अन्विल
पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार,उत्कृष्ट समीक्षक पुरस्कार, विशेष ग्रंथकार पुरस्कार, तसेच विदर्भ साहित्य संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद, यांच्यासह एकूण ७ पुरस्कार
संकेतस्थळ kbpm_pandharpur.in

डॉ. 'देवानंद गोविंदराव सोनटक्के' (१ ऑक्टो,१९७४) हे मराठीतील तरुण साहित्य समीक्षक आहेत. समीक्षक व अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. द.भि. कुलकर्णी यांचे ते सहा वर्षे लेखनिक होते. तर अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांचे ते विद्यार्थी होते. याच काळात त्यांच्या समीक्षक व्यक्तिमत्त्वाची जडण घडण झाली. त्यांचे दोन समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध असून पदवी शिक्षण घेतानाच त्यांचे लेखन प्रसिद्ध होत होते. आजवर त्याचे महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, लोकसत्ता, तरुण भारत या वृत्तपत्रांखेरीज ललित, पंचधारा, समाजप्रबोधन पत्रिका, अक्षर वाङ्मय, सर्वधारा, पद्मगंधा, आकांक्षा अशा महाराष्ट्रातील मान्यवर नियतकालिकातून सुमारे ४० समीक्षालेख प्रसिद्ध झाले आहेत. नागपूर, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर व उस्मानिया विद्यापीठ इ. विविध विद्यापीठांच्या अभ्यास साधनासाठी व अभ्यास मंडळासाठी त्यांनी काम केले असून या विद्यापीठांच्या विविध चर्चासत्रात शोधनिबंधांचे वाचनही त्यांनी केले आहे.

भारत सरकारच्या चाईल्ड लाईन उपक्रमाच्या माहिती पुस्तिकेचे इंग्रजीतून मराठीत त्यांनी भाषांतरही केले आहे. अनेक कविता संग्रहाच्या प्रस्तावनाही त्यांनी लिहिल्या आहेत. सध्या ते राज्य मराठी विकास संस्था व विकिपिडिया यांच्या कार्यशाळेसाठी विषयतज्ज्ञ म्हणूनही काम पाहतात.

शिक्षण[संपादन]

त्यांचे प्राथमिक शिक्षण कळमना ता. वणी, जि. यवतमाळ येथे, माध्यमिक ते महाविद्यालयीन शिक्षण वणी येथे, तर पदव्युत्तर मराठीचे शिक्षण नागपूर विद्यापीठात झाले.

अध्यापन[संपादन]

देवानंद सोनटक्के हे १९९८पासूनची पुढची १८ वर्षे नागपूर, अमरावती, कोल्हापूर आणि सोलापूर विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रांत येणारी नागपूरची श्री बिंझाणी, श्रीमती बिंझाणी व धरमपेठ ही महाविद्यालये, यवतमाळचे लोकनायक बापुजी अणे महाविद्यालय, हुपरीमधील रयत शिक्षण संस्थेचे चंद्राबाई शांताप्पा शेंडूरे महाविद्यालय, इत्यादींसह अनेक महाविद्यालयांत मराठीचे प्राध्यापक होते. या महाविद्यालयांतून मराठी साहित्य शिकलेले अनेक विद्यार्थी घडले.

समीक्षा[संपादन]

सोनटक्के आस्वादक पण संहितानिष्ठ समीक्षा लिहित असतात. त्यांनी आजवर बा. सी. मर्ढेकर, कुसुमाग्रज, कुसुमावती देशपांडे, भालचंद्र नेमाडे आणि शरश्चंद्र मुक्तिबोध यांच्या साहित्य-सौंदर्यविचारांचा वेध घेतला आहे. तसेच नव्वदोत्तरी मराठी कविता या सर्वधारा, अमरावती, जाने-मार्च, २०१७ या अंकाचे संपादनही केले आहे.

सुरुवात[संपादन]

१९९८ साली नागपूर विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेताना ते डॉ. ख्यातनाम मराठी समीक्षक डॉ. दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी यांचे लेखनिक होते, त्यांच्या सहवासात असतानासोन 'वि. स. खांडेकरांची अमृतवेल' हा पहिला समीक्षालेख लिहिला. तो 'रंगस्वानंद', वणी या दिवाळी अंकांत प्रसिद्ध झाला. याच काळात त्यांनी 'मर्ढेकरांची कविता', 'रणांगण आणि टायटॅनिक' 'ज्ञानेश्वरीतील दोन रूपके'असे समीक्षालेख लिहिले. पुढे विविध नियतकालिकांतून त्यांचे समीक्षालेख प्रसिद्ध होत गेले.

पुढे वयाच्या २७ व्या वर्षी त्यांचा सामर्थ्याचा स्वर हा पहिला समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध झाला. नाटककार महेश एलकुंचवार, द. भि. कुलकर्णी, डॉ. यशवंत मनोहर, विजया राजाध्यक्ष, श्री. पु. भागवत यांनी त्यांच्या समीक्षादृष्टीचे कौतुक केले होते.

समीक्षेची वैशिष्ट्ये[संपादन]

त्यांच्या समीक्षेचा विशेष म्हणजे ते आस्वादातून तत्त्वांचा शोध घेतात. काव्याच्या आशयापासून रुपबंधाचा आंतरिक व विविध ज्ञानशाखाव्दारे वेध घेणे हे त्यांच्या समीक्षेचे वैशिष्ट्य आहे.

संशोधन[संपादन]

प्रा. सोनटक्के यांनी 'घाशीराम कोतवाल : संहिता: आणि प्रयोग' (मास्टर र्ऑफ फाईन आर्ट्‌स), ‘भालचंद्र नेमाडे यांचा साहित्यविचार’ (एम. फिल.), ‘साहित्यविचार आणि भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्या’ (पीएच. डी.), ‘भालचंद्र नेमाडे यांचा साहित्यविचार आणि त्यांच्या कादंबऱ्या : परस्पर सबंध’ (युजीसी लघुशोध प्रबंध) या विषयांवर संशोधन केले असून या शिवाय ‘कुसुमावतींचा कलाविचार’, ‘कुसुमाग्रजांचा साहित्यविचार’, ‘मर्ढेकरांचा सौंदर्यविचार’, मुक्तिबोधांचा साहित्यविचार’ इत्यादी विषयांवर शोधनिबंध लिहिले आहेत. त्यांचे ३० च्या आसपास संशोधनपर लेख प्रकाशित झाले आहेत.  

देवानंद सोनटक्के यांचे प्रकाशित साहित्य[संपादन]

गौरव व पुरस्कार[संपादन]

 • सामर्थ्याचा स्वर, ग्रंथाला नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाचा नवोदित लेखक पुरस्कार, २००१
 • कुसुमावतींचा कलाविचार या शोधनिबंधाला नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाकडून पा.बं. गाडगीळ पुरस्कार, २००५
 • वणीच्या रसिक रचना सांस्कृतिक मंडळाचा वणीवैभव पुरस्कार, २००६ ·       
 • नागपूरला २००८ साली झालेल्या डॉ. द.भि.कुलकर्णी अमृत महोत्सवात 'उदयोन्मुख समीक्षक' म्हणून गौरव
 • एल. वाय. पाटील प्रतिष्ठान हुपरी, जि. कोल्हापूरचा उत्कृष्ट समीक्षक पुरस्कार, २०१०
 • लायन्स क्लब हुपरी, आदर्श शिक्षक पुरस्कार, २०१०
 • महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, अरविंद वामन कुलकर्णी समीक्षा पुरस्कार, २०१३
 • महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, विशेष ग्रंथकार पुरस्कार, २०१७

संकीर्ण[संपादन]

 • कमलाताई होस्पेट आणि रयत शिक्षण संस्था यांच्यासाठी माहितीपट संहिता लेखन
 • महाविद्यालयीन अध्यापन काळात पथ विविध सामाजिक विषयांवर पथनाट्य लेखन, दिग्दर्शन व सादरीकरण
 • महाविद्यालयीन जीवनांत विविध नाटकांतून अभिनय व वक्तृत्व स्पर्धात सहभाग
 • आकाशवाणी नागपूरची आवाजाभिनयाची परीक्षा 'ब' श्रेणीत उत्तीर्ण
 • आकाशवाणीच्या नागपूर व यवतमाळ केंद्रांसाठी अनेक संहितांचे व लघुनाटिकांचे लेखन.

हेही पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]