देवदर्शन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

परंपरा इतिहास[संपादन]

  1. मंदिरात पवित्र मनाने व देहाने जायचे आहे. स्नान करून स्वच्छ साधा पोशाख घालतात. पारंपरिक वेशभूषा घालून जातात. सहसा पारंपरिक वेशभूषा केली जाते. पुरूष साधा कुडता आणि धोतर नेसून जातात. स्त्रिया साडी (शक्यतो नऊवारी साडी) नेसून जातात. मुले व मुली साधा पारंपरिक पोषाख करतात. मंदिरात जमीनीवर बसतात, त्या अनुकुल पोशाख असतो.

साष्टांग नमस्कार[संपादन]

  • अष्टांग - हात (२) , छाती (१) , कपाळ (१) , गुडघे (२) , पाय (२) जमीनीला स्पर्श करतात.

पंचांग प्रणाम[संपादन]

स्त्रिया पंचांग नमस्कार घालतात. अष्टांगे नव्हेत तर स्त्रियांची पंचागे जमीनीला स्पर्श करतात. गुडघ्यावर वाकून जमीनीला डोके लावून स्त्रिया प्रणाम करतात. हात (२) , डोके (१) , पाय (२) जमीनीला स्पर्श करतात तोच पंचांग प्रणाम.

देवपूजा[संपादन]

  1. भक्तांची मंदिरातील देवपूजा विविध प्रकारची असू शकते. भक्त मंदिरात एका कोपऱ्यात बसून देवमूर्तिकडे डोळे भरून पहात, अर्थाचे अनुसंधान राखून स्तोत्र म्हणतात, मंत्र म्हणतात. ध्यान करतात. पूजेनंतर स्तोत्र पठण, मंत्रपठन, ध्यान, जप करतात.

फुले, फळे, हार[संपादन]

  1. विष्णुमंदिर असेल तर तुळशी,शंकराचे मंदिर असेल तर बिल्वदले, गणपतीचे मंदिर असेल तर दुर्वा, शमीपत्रे वाहतात.

हेही पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]