देऊळ बंद २
| देऊळ बंद २ | |
|---|---|
| दिग्दर्शन | प्रवीण तरडे |
| निर्मिती | वटवृक्ष एण्टरटेन्मेंट |
| कथा | प्रवीण तरडे |
| पटकथा | प्रवीण तरडे |
| प्रमुख कलाकार |
|
| संगीत | तन्मय भिडे आणि ऋतुराज साठे |
| पार्श्वगायन | श्रेया घोषाल, उर्मिला धनगर, आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, चंदन कांबळे आणि ऋतुराज साठे |
| देश | भारत |
| भाषा | मराठी |
| प्रदर्शित | २१ मे २०२६ |
| अवधी | १८२ मिनिटे |
|
| |
देऊळ बंद २ : आता परीक्षा देवाची हा एक मराठी चित्रपट असून २१ मे २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी हे स्वामी समर्थांच्या भूमिकेत तर स्नेहल तरडे या शेतकरी महिलेच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाची निर्मिती कैलास वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यावंशी यांनी वटवृक्ष एण्टरटेन्मेंट बॅनर खाली सांभाळली.[१][२]
या चित्रपटाचा मुख्य हेतू शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालणे हा असून, या चित्रपटाची कमाई शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी देण्यात येणार असल्याची घोषणा दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केली. आत्महत्या केल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नसून, वर्तमान परिस्थितीनुसार शेतीत आणि शेतकऱ्यांत बदल करण्याची गरज आहे, असा संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून दिला गेला आहे. या चित्रपटात स्वामी समर्थ शेतकरी महिलेसोबत शेतात, दऱ्याखोऱ्यांमध्ये, एसटीने प्रवास करत तिचे समुपदेशन करताना दिसत आहेत.[३]
कथानक
[संपादन]तुकाराम (मंगेश देसाई) हा एक गरीब शेतकरी आहे, जो स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त आहे. मात्र परिस्थितीमुळे तो हतबल होतो आणि हताश होऊन देवळाला कुलूप लावून निघून जातो. तुकारामची पत्नी संगीता (स्नेहल तरडे) ही अत्यंत खंबीर पण परिस्थितीमुळे नास्तिक बनलेली महिला आहे. आपल्या कुटुंबाला आणि शेतकऱ्यांना होणारा त्रास पाहून ती थेट देवाच्या (स्वामी समर्थांच्या) अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करते.
पात्र
[संपादन]- मोहन जोशी - श्री स्वामी समर्थ (महाराजांच्या भूमिकेत)
- स्नेहल तरडे - संगीता (महिला शेतकऱ्याच्या मुख्य भूमिकेत)
- मंगेश देसाई - तुकाराम, (एक गरीब शेतकरी आणि संगीताचा नवरा)
- प्रवीण तरडे - सदूशेठ
- प्रसाद ओक - दत्तगुरु
- महेश मांजरेकर - विशेष/पाहुणा कलाकार
- ओम भुतकर - सद्गुरू शंकर महाराज
- अतुल कुदळे -
- रमेश परदेशी - पिट्याभाई
- संस्कृती बालगुडे -
- सविता मालपेकर -
- देवेंद्र गायकवाड -
- जगन्नाथ निवंगुणे -
- सुनील अभ्यंकर -
- मुकुंद वसुले -
- अतुल कुडले -
- अनिरुद्ध दिंडोरकर -
- ऋषिकेश वांबुरकर - रफिक
- अमित नगरकर - श्री कृष्ण (गेस्ट अपीयरेंस)
प्रदर्शन
[संपादन]हा चित्रपट २१ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे गुरुवारी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी ५:३० वाजता प्रदर्शन करण्यात आले. सकाळची वेळ असून देखील अग्रिम आरक्षणाद्वारे चित्रपट हाऊसफुल्ल झाला.[४][५]
प्रतिसाद
[संपादन]या चित्रपटाला समीक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला, विशेषतः स्नेहल तरडे आणि मोहन जोशी यांच्या अभिनयाचे कौतुक झाले.
द टाइम्स ऑफ इंडिया च्या मिहीर भणगे यांनी चित्रपटाला ५ पैकी ३ स्टार दिले, त्यांनी चित्रपटाचा अभिनय आणि श्रद्धा, नास्तिकता व शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मांडणीचे कौतुक केले आणि लिहिले की, "स्नेहल तरडे आणि मोहन जोशी यांच्या पात्रांमधील नास्तिक विरुद्ध देव यांच्यातील संघर्षाने प्रेक्षकांना चित्रपटातील काही सर्वोत्तम क्षण दिले आहेत."[६] सकाळ च्या संतोष भिंगार्डे यांनी चित्रपटाला ५ पैकी ३.५ स्टार दिले. त्यांनी तरडे यांचे दिग्दर्शन, लेखन आणि अभिनय तसेच दोन्ही मुख्य कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक करत याला "भक्ती आणि श्रद्धेचा उत्तम संगम." असे म्हटले आहे.[७] महाराष्ट्र टाइम्सच्या प्रसाद पवार यांनीही चित्रपटाला ५ पैकी ३.५ स्टार दिले आणि लिहिले की, "तरडे यांनी शेतकऱ्याशी संबंधित प्रत्येक पैलू अचूकपणे मांडला आहे."[८] पुढारीच्या अनुपमा गुंडे यांनी चित्रपटाला ३ स्टार दिले आणि याचे वर्णन "श्रद्धाळू आणि नास्तिकांच्या वर्तुळात बळीराजाच्या सद्यस्थितीवर केलेले एक ज्वलंत आणि सडेतोड भाष्य, जे व्यवस्था आणि बळीराजाच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहे," असे केले आहे.[९] 'मुव्ही टॉकीज'च्या समीर अहिरे यांनी चित्रपटाला ५ पैकी २.५ स्टार दिले आणि लिहिले की, "जरी ते पारंपारिक अर्थाने दर्जेदार सिनेमा म्हणून पात्र ठरत नसले, तरी ते प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी ठरते."[१०]
गल्ला
[संपादन]या चित्रपटाने चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यापूर्वीच 'बुक माय शो' वर २५,००० हून अधिक अग्रिम आरक्षण (ॲडव्हान्स बुकिंग) तिकीट विक्रीचा टप्पा ओलांडला.[११] प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी, चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर १,१७५ शो मधून ₹२.९१ कोटींची कमाई केली, जी मराठी चित्रपटाच्या इतिहासातील आठवी सर्वात मोठी ओपनिंग ठरली.[१२][१३] ही दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम ओपनिंग ठरली असून, त्यांनी आपलाच मागील चित्रपट धर्मवीर (२०२२), ज्याने ₹२.०५ कोटी निव्वळ कमाई केली होती, मागे टाकले.[१४] पहिल्या चार दिवसात, चित्रपटाने ₹१५.७५ कोटी निव्वळ कमाई केली, जी अंदाजे ₹१८.५८ कोटी ग्रॉस इतकी होते.[१५][१६] रविवारी, पुणे शहरात ३६६ शोमध्ये ७९.८% तर मुंबईमध्ये ५४० शोमध्ये ७१.८% ऑक्युपन्सी नोंदवण्यात आली, पुण्यातील सकाळचे शो ७३% सह सुरू होऊन संध्याकाळपर्यंत ८७% पर्यंत पोहोचले होते.[१७][१८] यासह हा चित्रपट रितेश देशमुख यांचा राजा शिवाजी (२०२६) नंतर मराठी चित्रपटाचा दुसरा सर्वोत्तम ओपनिंग वीकेंड ठरला.[१९][२०] पहिल्या आठवड्याच्या अखेरीस, चित्रपटाने ₹३०.२० कोटींची कमाई केली, जी राजा शिवाजी (₹५७.७० कोटी) नंतर मराठी चित्रपटसृष्टीतील दुसरी सर्वात मोठी पहिली आठवड्याची कमाई ठरली.[२१] अवघ्या सात दिवसांत, देऊळ बंद २ ने धर्मवीर च्या एकूण आजीवन कमाईचा आकडा पार केला आणि हा तरडे यांचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.[२२] दुसऱ्या शुक्रवारी, चित्रपटाने ₹३.५० कोटींची कमाई केली, ज्यामुळे भारतातील दोन आठवड्यांची एकूण ग्रॉस कमाई ₹३९ कोटी झाली.[२३] दहाव्या दिवशी, चित्रपटाने १,०७४ शोमधून ₹१.९७ कोटींची कमाई केली, ज्यामुळे भारतातील निव्वळ कमाई ₹३५.२७ कोटी आणि एकूण ग्रॉस कमाई ₹४१.४७ कोटी झाली.[२४] तोपर्यंत हा चित्रपट कट्यार काळजात घुसली (२०१५), लय भारी (२०१४) आणि पावनखिंड (२०२२) च्या आजीवन कमाईला मागे टाकून भारतातील सहावा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला होता.[२५][२६]
अकरा दिवसांच्या अखेरीस, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची एकूण निव्वळ कमाई ₹४४.०५ कोटी आणि ग्रॉस कमाई ₹५१.९७ कोटी झाली होती.[२७] त्याच्या दुसऱ्या वीकेंडची ₹१४.२५ कोटींची कमाई बाईपण भारी देवा (२०२३) ला मागे टाकून मराठी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतची सर्वात मोठी दुसरी वीकेंड कमाई ठरली, ज्याचा आधीचा विक्रम ₹१३.५० कोटींचा होता.[२८][२९][३०] चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात ₹२२.४ कोटी आणि तिसऱ्या आठवड्यात ₹११.१५ कोटींची कमाई केली.[२१] तेविसाव्या दिवशी, देऊळ बंद २ ने ₹१.२७ कोटींची कमाई केली. एकूण ₹६५.०२ कोटींच्या निव्वळ कमाईसह, चित्रपटाने ५५०% ROI (गुंतवणुकीवर परतावा) मिळवला असून, तो २०२६ मधील दुसरा सर्वाधिक नफा मिळवणारा मराठी चित्रपट ठरला आहे, ज्याच्या पुढे ५८३.७५% ROI सह क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट आहे.[२१]
संदर्भ
[संपादन]- ↑ "शेतकरी महिला घेणार स्वामींची परीक्षा, 'देऊळ बंद २'चा टीझर प्रदर्शित". दैनिक लोकमत. २१ मे २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "तर माझं देऊळ कायमचं बंद' देऊळ बंद सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज". साम टीव्ही. २१ मे २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "आता परीक्षा देवाची! प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद २' प्रदर्शित, पहिल्या दिवशीच हाऊसफुलची पाटी". साम टीव्ही. २१ मे २०२६ रोजी पाहिले.
- ↑ Naik, Payal (2026-04-03). "प्रतीक्षा संपली! यंदा स्वामी शुक्रवारी नाही गुरुवारीच येणार .. प्रविण तरडेंच्या 'देऊळ बंद २'ची रिलीज डेट समोर; कोण साकारणार मुख्य भूमिका?". Marathi News Esakal. 2026-06-01 रोजी पाहिले.
- ↑ "10 वर्षांनी पुन्हा 'देऊळ बंद', आता देवाची परीक्षा! Deool Band 2 ची तारीख लक्षात ठेवा". 2026-04-03. 2026-04-04 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2026-06-01 रोजी पाहिले.
- ↑ "Deool Band 2 Movie Review: This one's for the devotees of Swami Samarth". timesofindia.indiatimes.com.
- ↑ Bhingarde, Santosh (2026-05-23). "Movie Review : देऊळ बंद 2 - भक्ती आणि श्रद्धेचा उत्तम संगम". Marathi News Esakal. 2026-05-23 रोजी पाहिले.
- ↑ "देऊळ बंद २". Maharashtra Times. 2026-05-23 रोजी पाहिले.
- ↑ "Deool Band 2 review | शेतकऱ्यांच्या जीवनावर सडेतोड भाष्य 'देऊळबंद -२'". Pudhari News.
- ↑ Ahire, Sameer. "Deool Band 2 Review: Powerful Subject & Sloppy Execution, No Match For The Predecessor". www.movietalkies.com (इंग्रजी भाषेत). 2026-06-01 रोजी पाहिले.
- ↑ Seta, Fenil; Hungama, Bollywood (2026-05-20). "EXCLUSIVE: Marathi film Deool Band 2 set for a HUGE start; sells 25,000 + tickets; popular series has a UNIQUE connection with Drishyam franchise". Bollywood Hungama (इंग्रजी भाषेत). 2026-06-01 रोजी पाहिले.
- ↑ "शुक्रवारऐवजी गुरुवारीच ब्रह्ममुहूर्तावर देऊळबंद 2 रिलीज, सकाळी साडेपाच वाजताही तिकीट बारीवर गर्दी, पहिल्याच दिवशी उत्तम कमाई". Maharashtra Times. 2026-05-23 रोजी पाहिले.
- ↑ Kadam, Shruti Vilas (2026-05-22). "Deool Band 2 Collection: बॉक्स ऑफिसवर दुमदुमला स्वामी समर्थांचा जयघोष; 'देऊळ बंद २'ची पहिल्याच दिवशी जोरदार कमाई". Saam TV. 2026-06-01 रोजी पाहिले.
- ↑ More, Shalmesh (2026-05-22). "Deool Band 2 Box Office Collection Day 1: Registers Marathi Cinema's 6th Biggest Opening, Career-Best Start For Pravin Tarde". Koimoi (इंग्रजी भाषेत). 2026-06-01 रोजी पाहिले.
- ↑ वेमूल, स्वाती (2026-05-25). "Deool Band 2: अवघ्या 4 दिवसांत 'देऊळ बंद 2'चा बजेट वसूल; आतापर्यंत किती कमावला नफा?". TV9 Marathi. 2026-06-01 रोजी पाहिले.
- ↑ "Deool Band 2 वर प्रेक्षकांच्या प्रेमाचा वर्षाव, तरी पाचव्या दिवशी कमाईत घट; प्रवीण तरडेंच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?". Maharashtra Times. 2026-06-01 रोजी पाहिले.
- ↑ "Deool Band 2 Box Office Collections: Pravin Tarde's devotional drama records 2nd BIGGEST opening weekend, smashes Rs 18.50 crore in 3 days". PINKVILLA (इंग्रजी भाषेत). 2026-05-25. 2026-06-01 रोजी पाहिले.
- ↑ "Marathi Deool Band 2 And Malayalam Drishyam 3 Score". Box Office India. 2026-05-25 रोजी पाहिले.
- ↑ गुप्ता, मोनिका (2026-05-25). "बड़ी फिल्मों के बीच इस मराठी मूवी ने 4 दिन में ही वसूला बजट, बॉक्स ऑफिस पर बरसाए पैसे". ABP News (हिंदी भाषेत). 2026-06-01 रोजी पाहिले.
- ↑ Raut, Rahul (2026-05-25). "Box Office: Marathi Film 'Deool Band 2' Scores Big Weekend". Variety India (इंग्रजी भाषेत). 2026-05-29 रोजी पाहिले.
- 1 2 3 "बॉक्स ऑफिसवर 'स्वामीं'चा डंका, 'देऊळ बंद २' ठरला 2026 मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा". Maharashtra Times. 2026-06-14 रोजी पाहिले.
- ↑ Ahire, Sameer. "Deool Band 2 Box Office: Pravin Tarde's Sequel Hits 20 Crore in 6 Days; Set To Become His Highest Grosser Today –". www.movietalkies.com (इंग्रजी भाषेत). 2026-06-01 रोजी पाहिले.
- ↑ "Deool Band 2 Box Office Collections: Pravin Tarde's film collects Rs 3.50 crore on 2nd Friday, set for HUGE spike ahead". PINKVILLA (इंग्रजी भाषेत). 2026-05-30. 2026-06-01 रोजी पाहिले.
- ↑ "'देऊळ बंद २'च्या कलेक्शनमध्ये १० व्या दिवशी मोठी वाढ! मध्यरात्रीचा शो हाऊसफुल्ल, एकूण कलेक्शन ऐकून थक्क व्हाल..." Loksatta. 2026-05-31. 2026-05-31 रोजी पाहिले.
- ↑ team, abp majha web (2026-05-30). "'देऊळ बंद 2' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; रितेश देशमुखच्या फिल्मला कमाईत मागं टाकलं; आत्तापर्यंतची". ABP Majha. 2026-06-01 रोजी पाहिले.
- ↑ Kulkarni, Apurva (2026-05-31). "देऊळ बंद 2 ने रितेश देशमुखच्या सिनेमाला टाकलं मागं, 10 व्या दिवशी कोट्यवधीची कमाई, मध्यरात्रीचे शो सुद्धा हाऊसफुल्ल". Sakal. 2026-06-01 रोजी पाहिले.
- ↑ "ऐतिहासिक! 'देऊळ बंद २' सिनेमाने गाठला ५० कोटींचा टप्पा, अवघ्या ११ दिवसांत...; प्रवीण तरडेंनी स्वत: सांगितले कलेक्शनचे आकडे". Loksatta. 2026-06-01. 2026-06-01 रोजी पाहिले.
- ↑ Ahire, Sameer. "Deool Band 2 Creates History! Scores Biggest Second Weekend in Marathi Cinema, Surpassing Baipan Bhari Deva –". www.movietalkies.com (इंग्रजी भाषेत). 2026-06-01 रोजी पाहिले.
- ↑ Raut, Rahul (2026-06-01). "Box Office Weekend Winners: 'Deool Band 2' Goes Bigger In 2nd Weekend, 'Drishyam 3' and 'Karuppu' Stay on Top, 'Obsession' Opens Strong in India". Variety India (इंग्रजी भाषेत). 2026-06-01 रोजी पाहिले.
- ↑ Ahire, Sameer. "Deool Band 2 Creates History! Scores Biggest Second Weekend in Marathi Cinema, Surpassing Baipan Bhari Deva –". Movie Talkies (इंग्रजी भाषेत). 2026-06-01 रोजी पाहिले.