देऊळगाव बाजार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देऊळगाव बाजार हे गाव चारना नदी (??)वर वसलेले असून ते सिल्लोडपासून २७ कि मी अंतरावर आहे. हे गाव पूर्वी परिसरातील मोठी बाजार पेठ होती. या गावात अनेक देवतांची देवळे असल्यामुळे हे गाव 'देवळे असलेले गाव - देऊळगाव बाजार' म्हणून ओळखले जाऊ लागले. या गावाची लोकसंख्या ७,००० आहे. येथील जमीन फारच सुपीक आहे. लागूनच ७ किमी अंतरावर राज्य रस्ता हा सिल्लोड-कन्नड-पाचोरा रस्ता आहे. ह्या गावात अक्षय तृतीयेला मोठी यात्रा भरते. पंचक्रोशीतील व बाहेरगावी कामधंद्यासाठी गेलेले लोक या दिवशी गावात येतात.

ह्या गावासाठी सिल्लोडहून फक्त सकाळी १०.००ची बस आहे. दुसरी साधने नसल्याने या गावाला फारच मोठी दळणवळण समस्या आहे.