दुसित इंटरनॅशनल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दुसित थानी ग्रूप या पानावरून पुनर्निर्देशित)

दुसित थानी ग्रुप तथा दुसित इंटरनॅशनल ही एक आंतरराष्ट्रीय आदरातिथ्य हॉटेल कंपनी आहे. हिचे मुख्य कार्यालय थायलंडची राजधानी बॅंगकॉक येथे आहे. इ.स. १९४८ मध्ये थन्पुईंग चाणूत पियाऔई यांनी ही हॉटेल कंपनी चालू केली. सध्या याचे नेतृत्व त्यांचा मुलगा चंनिन डोंनावणीक करतो आहे.[१]

२०१६ च्या सुमारास या कंपनीच्या २९ मालमत्ता दुसित थांनी हॉटेल्स आणि रेसोर्ट्स, दुसित प्रिन्सेस हॉटेल्स आणि रेसोर्ट्स, दुसित डी२ हॉटेल्स आणि रेसोर्ट्स, दुसित रेसिडेंट सर्विसड अपार्टमेंट्स आणि डेवरणा हॉटेल्स आणि रेसोर्ट्स या नावांनी थायलंड, संयुक्त अरब अमिराती, अमेरिका, चीन, मालदीव, फिलिपिन्स, भारत, इजिप्त, आणि केन्या देशांतून आहेत.

इतिहास[संपादन]

थन्पुइंग चाणूत पियाऔई हिने सन १९४८ मध्ये प्रिन्सेस नावाने बँकॉक येथे पहिले हॉटेल चालू केले. यात फक्त ३० खोल्या होत्या पण फरक इतकाच होता की आधुनिक पद्दतीचे व स्विमिंग पूल असणारे बँकॉक मधील हे पहिले हॉटेल होते. या कंपनीने या हॉटेल बाबतच्या सर्व कल्पना, त्याचे नाव या बाबी राजा रामा VI यांचे कडून घेतलेल्या होत्या. ते विचार पच्छिमेकडील देश आणि थायलंड मधील आधुनिकतेतून साकारलेले होते.[२] सन १९१८ मध्ये त्यांनी लुंपिणी पार्क जवळ सुखसोईनी युक्त असे लहानसे शहर वसविले आणि त्याचे नाव दुसित थांनी ठेवले. त्याचा अर्थ टाऊन इन हेवन (स्वर्गातील शहर) असा होतो. थायी दंतकथेनुसार दुसित म्हणजे सात स्वर्गातील चौथा स्वर्ग. सन १९७० मध्ये दुसित ठाणी बँकॉक हे या कंपनीचे पहिले झेंडा धारी हॉटेल झाले. बँकॉक मधील ५१० खोल्यांचे ५ स्टार हॉटेल अत्युतम आणि गगनाला गवसणी घालणाऱ्या या हॉटेलच्या इमारतीने कंपनीची शान वाढविली आणि ती अनेक वर्षे राहिली.

सन १९८७ मध्ये दुसितने रिसॉर्ट मालमत्ता त्याब्यात घेऊन तिचे नूतनीकरण केले. ती यांची पहिली रिसॉर्ट मालमत्ता झाली. त्याबरोबरच दुसित थांनी पट्टाया आणि त्यानंतर दुसित थांनी लगुणा फुकेत हे फुकेत बीचवर रिसॉर्ट झाले.[३] सन १९८९ मध्ये दुसित थांनी हुया हीन चालू केले. अलीकडे ते दुसित रिसॉर्ट आणि पोलो क्लब म्हणून ओळखले जाते.

सन १९९१ मध्ये राजधाणीचे उत्तरेस रायल प्रिन्सेस चियंग माई आणि दुसित आयलंड रिसॉर्ट चियंग राय चालू केले. सन १९९५ मध्ये हॉटेल निक्को मनीला ताब्यात घेतले आणि त्याचे दुसित हॉटेल निक्को मनिला असे नामकरण केले.[४] सन २००८ मध्ये त्याचे नूतनीकरण केले आणि त्याला दुसित थांनी मनीला संबोधिले.[५]

२००८ ते २०१४ या काळात मिडल ईस्ट,दुबई, यूनायटेड अरब एमिरेटस,भारत,चायना अबु धाबी येथे हॉटेल आणि रिसॉर्ट चालू केली.[६] पुढील काळात ऑस्ट्रेलियाचे क्वीन्सलंड येथे आंतरराष्ट्रीय आधुनिकता देणारे सर्व सुविधांनी युक्त असे हॉटेल बांधकाम सन २०१६ मध्ये चालू केले.[७] त्याचे बांधकाम पूर्ण होण्याचा कार्यकाल सन २०१९ पर्यन्त आहे. याचा खर्च साधारण ५५० मिल्लियन यूएस डॉलर्स आहे यात ५२० निवास ग्रह आहेत. यात आंतरराष्ट्रीय पद्दतीचे टेनिस स्टेडीयम, वाटर पार्क, प्राणी संग्रहालय,मच्छयालय, व्यवसाय केंद्र, बॉल रूम, स्पा, जिमखाना, आत आणि बाहेर रिक्रियेशन क्लब,विवाह समारंभ सुविधा, कृत्रिम बीच या सुखसोयी उपलब्ध होणार आहेत.

या कंपनीने शिक्षण क्षेत्रात ही पाय रोवला आहे. यांची बँकॉक येथे शाळा, महाविध्यालय आहेत.

हॉटेल ब्रण्ड्स[संपादन]

दुसित इंटरनॅशनल हे प्रसिद्ध हॉटेल ग्रुपचे सभासद आहे. यांचे ५ हॉटेल ब्रण्ड्स आहेत त्यात दुसित थांनी हॉटेल्स आणि रेसोर्ट्स, दुसित प्रिन्सेस हॉटेल्स आणि रेसोर्ट्स, दुसित D2 हॉटेल्स आणि रेसोर्ट्स,दुसित रेसिडेंट सर्विसड अपार्टमेंट्स आणि डेवरणा हॉटेल्स आणि रेसोर्ट्स.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "थायलंडच्या पहिल्या आदरातिथ्य महिला".
  2. ^ "थन्पुईंग चाणूत पियाऔई".
  3. ^ "आशियातील एक अग्रगण्य हॉटेल ब्रांड".
  4. ^ "दुसित हॉटेल्सचा इतिहास". Archived from the original on 2016-08-09. 2016-11-10 रोजी पाहिले.
  5. ^ "दुसित इंटरनॅशनल - आशियातील एक अग्रगण्य हॉटेल ब्रांड".
  6. ^ "दुसित देवराना, नवी दिल्ली बद्दल".
  7. ^ "५५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा दुसित थानी ब्रूकवाटर गोल्फ रिसॉर्ट आणि स्पा बाजारात लक्ष वेधुन घेतो".