Jump to content

दुर्गादेवी मंदिर (मुरुड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दगडी दीपमाळा

दुर्गादेवी मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रांतातील, दापोली तालुक्यातील मुरुड या गावी असलेले मंदिर आहे. हे मंदिर समुद्रकिनारी असल्याने पर्यटन स्थळ म्हणूनही ते प्रसिद्ध पावलेले आहे.[]

ऐतिहासिक महत्व

[संपादन]

या मंदिराचे अंतर्गत स्थापत्य लाकडी खांब आणि तुळया यांनी सुशोभित केले आहे. विविध कुटुंबीयांची कुलदेवता म्हणून दुर्गादेवी प्रसिद्ध आहे. समुद्री चाचे यांचे भय असल्याने तत्कालीन ग्रामस्थानी या देवीची स्थापना केल्याचे सांगितले जाते. ही गावाची संरक्षक देवता मानली गेली आहे. इसवी सनाच्या सोळाव्या शतकात गंगाधर भट यांनी या गावाची स्थापना केल्याचे मानले जाते. दुर्गादेवीची वार्षिक उत्सव परंपरा प्रसिद्ध असून त्यासाठी भाविक येथे उपस्थित राहतात आणि उत्सवात सहभाग घेतात. पेशवाईतील मातब्बर चिमाजीआप्पा यांनी या मंदिराला पोर्तुगीज घंटा भेट दिली आहेत. मंदिरात पहावयास मिळते. शिमगा उत्सवातही या मंदिराला भाविक भेट देतात.[]

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. जाधव, सोनाली (2022-01-15). "Anjarle : आंजर्लेचे निसर्ग सौंदर्य विलोभनीय; कड्यावरच्या गणपतीमुळे गावाची ओळख सर्वदूर". Pudhari News. 2025-02-08 रोजी पाहिले.
  2. देवधर, रजनी (2024-08-11). "मुरुडचे दुर्गादेवीचे विलोभनीय मंदिर (Murud: Beautiful Temple of Goddess Durga) | थिंक महाराष्ट्र" (इंग्रजी भाषेत). 2025-04-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-02-08 रोजी पाहिले.