दुर्गादास राठोड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दुर्गादास राठोड (१३ ऑगस्ट १६३८ - २२ नोव्हेंबर १७१८) हे एक शूर हिंदू योद्धे होते, ज्यांनी मुघल शासक औरंगजेबाचा युद्धात दारुण पराभव केला होता. यांना १७ व्या शतकात राजा जसवंत सिंग यांच्या मृत्यूनंतर मारवाडमधील राठोड राजवंश सांभाळण्याचे श्रेय दिले जाते.

वीर शिरोमणि दुर्गादासजी राठोड
वीर शिरोमणि दुर्गादासजी राठोड

जीवन[संपादन]

दुर्गादास हे मारवाडचे शासक महाराजा जसवंत सिंग यांचे मंत्री असकरन राठोड यांचे पुत्र होते.

हिंदूंवर आक्रमण[संपादन]

दुर्गादास राठोड यांनी राजा जसवंत सिंग यांना वचन दिले होते की ते मारवाडसाठी कायम लढतील आणि हिंदू राज्य राखण्यासाठी वाट्टेल ते करतील. राजा जसवंत सिंग यांचा मृत्यू १६७८ मध्ये अफगाणिस्तानमध्ये झाला आणि मृत्यूच्या वेळी उत्तराधिकारी घोषित करण्यात आले नाही. संधीचा फायदा घेऊन औरंगजेबाने मारवाडमध्ये आपला हस्तक्षेप प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. यामुळे हिंदूंचा छळ करून नाश करण्याची मुघल रणनीती तयार झाली आणि खूप रक्तपात होऊनही मुघल सैन्य यशस्वी होऊ शकले नाही. शूर हिंदू सैन्य कडवेपणाने झुंजत राहिले. जसवंत सिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन राण्यांनी एका एका मुलास जन्म दिला. त्यापैकी एक जन्मानंतर लगेचच मरण पावला आणि दुसरा अजित सिंग यांच्या रूपाने गादीवर आला. फेब्रुवारी १६७९ पर्यंत ही बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचली पण त्याने मुलाला कायदेशीर वारस म्हणून स्वीकारण्यास नकार दिला.

लूट आणि विनाश[संपादन]

यानंतर औरंगजेबाने मारवाडवर जिझिया करही लावला. औरंगजेबाने मारवाडचा अक्षम कठपुतळी शासक इंदर सिंग याला थेट मुघलांच्या अधीन करून घेतले. औरंगजेबाच्या सैन्याने हा प्रदेश ताब्यात घेतला आणि या काळात हिंदूंची कत्तल झाली, येथील सर्व प्राचीन शहरे लुटली गेली; मंदिरे पाडण्यात आली. या काळात औरंगजेबाने पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश घडवून आणला. काळात मारवाड मध्ये जबरदस्तीने हिंदूंचे धर्मांतर करून मुस्लिम लोकसंख्या वाढवली गेली. औरंगजेबाने नवीन भूभाग जिंकताना आणि बंडखोरी करताना, त्यांच्या हिंदू शक्तीचे प्रतीकांवर हल्ला मंदिरे नष्ट करून हिंदू राजकीय नेत्यांना शिक्षा करून मंदिरांची विटंबना आणि हिंदू मूर्ती भंजन करण्याचे आदेश दिले. इ.स.१६६९ मध्ये त्याने आपल्या प्रांतातील सर्व राज्यपालांना "काफिरांच्या शाळा आणि मंदिरे स्वेच्छेने नष्ट करण्याचे आदेश" जारी केले आणि त्यांना मूर्तिपूजकांच्या शिकवणी आणि प्रथा पूर्णपणे थांबवण्याची सक्त आज्ञा देण्यात आली.[१] अशा प्रकारे औरंगजेबाने हिंदूंचा धार्मिक छळ केला.

मोगलांची हकालपट्टी आणि मंदिरांची उभारणी[संपादन]

१७०२ मध्ये औरंगजेबाने दुर्गादासजींना अटक किंवा ठार मारण्याचा आदेश दिला. पण दुर्गादासांचा प्रभाव इतका होता की हे अटक किंवा ठार करणे शक्य झाले नाही. भयंकर प्रतिकूलतेशी लढत, त्याने कधीही स्वतःच्या फायद्याचा विचार न करता आपल्या राष्ट्राच्या विजयाचे ध्येय ठेवले. १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जोधपूर ताब्यात घेण्यासाठी दुर्गादासांनी गोंधळाचा फायदा घेतला आणि अखेरीस मुघल सैन्याची हकालपट्टी केली. अजितसिंग यांना जोधपूरचा महाराजा घोषित करण्यात आले आणि त्यांनी मुस्लिमांनी उद्ध्वस्त केलेली सर्व मंदिरे पुन्हा बांधली.

शेवट[संपादन]

वीर दुर्गादास यांनी आपले कर्तव्य यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आणि जसवंत सिंग यांना दिलेले वचन पूर्ण केले. जोधपूर सोडून ते सदरी , उदयपूर , रामपुरा, भानपुरा येथे काही काळ राहिले आणि नंतर महाकाल उज्जैन येथे गेले. २२ नोव्हेंबर १७१८ रोजी उज्जैन येथे क्षिप्रा नदीच्या काठावर, दुर्गादास यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले, लाल दगडातील त्यांची छत्री आजही चक्रतीर्थ, उज्जैन येथे उभी आहे, हे सर्व हिंदूंचे तीर्थस्थान आहे.

वीर शिरोमणि दुर्गादासजी राठोड छत्री, उज्जैन.
वीर शिरोमणि दुर्गादासजी राठोड छत्री, उज्जैन.

स्मरण[संपादन]

  • भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने २५ ऑगस्ट २००३ रोजी त्यांच्या सन्मानार्थ विविध नाणी वितरीत केली.
  • ऑक्टोबर २०१७ मध्ये जोधपूर येथे दुर्गादासांच्या जीवनाचे वर्णन करणाऱ्या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.
  1. ^ Savale, Dr Dipa; Mahadik, Dr Ghanasham; Gavhane, Dr Kishorkumar (2015-06-07). मुघलकालीन भारताचा इतिहास (इ.स. १५२६ ते १७०७) / Mukhalkalin Bhartacha Itihas. Educational Publishers & Distributors. ISBN 978-93-80876-74-0.