Jump to content

दीपिका कुंडजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दीपिका कुंडाजी या पानावरून पुनर्निर्देशित)
दीपिका कुंडजी
जन्म c. 1963
शिक्षण archaeology


दीपिका कुंडजी (जन्म: १९६३) या एक भारतीय शेतकरी आहेत ज्यांनी आपल्या अनोख्या शेती पद्धतींमुळे देशभरात प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार भारतात महिलांना दिल्या जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

जीवन

[संपादन]

दीपिका कुंडजी यांचा जन्म १९६३ मध्ये कर्नाटक राज्यात झाला. त्यांचे बालपण आणि शिक्षणही कर्नाटकातच झाले. त्या पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणून प्रशिक्षित आहेत.[]त्यांनी पॉंडिचेरीजवळील ऑरोव्हिल येथे "पेबल गार्डन" नावाची शेती विकसित केली आहे. ही बाग कोरड्या आणि नापीक जमिनीवर उभारली गेली आहे.[] त्या रासायनिक खते किंवा कंपोस्टचा वापर न करता जमिनीचे पुनरुज्जन करतात. त्यांच्या संशोधनानुसार, वनस्पती आपले बहुतेक अन्न हवेतून घेतात आणि मातीपासून फक्त थोडेसे पोषण मिळवतात. ज्या वनस्पती नष्ट होतात, त्या मरताना नैसर्गिक खत तयार करतात आणि त्यांच्या जागी नव्या वनस्पती उगवतात. १९९४ पासून त्या आपले पती बर्नार्ड डेक्लेरक यांच्यासोबत या कामात सहभागी आहेत. त्यांच्या ९ एकरच्या पेबल बागेत ते बाहेरच्या मजुरांचा वापर करत नाहीत. त्यांच्या मालकीची ७ एकर जमीन ही अशी आहे जी फ्रेंच आणि ब्रिटिश वसाहतवाद्यांनी जंगलतोड करून उद्ध्वस्त केली होती. कुंडजी यांचा असा विश्वास आहे की जर शेतकऱ्यांना त्यांची जमीन सुधारण्याची योग्य पद्धत कळली, तर भारतातील ९३ दशलक्ष हेक्टर जमीन पुन्हा उत्पादनक्षम आणि टिकाऊ बनवता येईल.[]

बियाण्यांचे महत्त्व

[संपादन]

२००९ मध्ये कुंडजी यांनी बियाण्यांच्या संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या मते, ऑरोव्हिलमधील शेतकऱ्यांनी स्थानिक बियाण्यांचे जतन करणे गरजेचे आहे. त्यांनी ८० ते ९० वेगवेगळ्या प्रकारच्या बियाण्यांचा वापर करून नापीक जमिनीचे हळूहळू रूपांतर केले आहे. परंतु पूर्ण यशासाठी त्यांना सुमारे ३,००० प्रकारच्या बियाण्यांचे संकलन आणि वितरण करावे लागेल. त्या अशा कठीण जातींच्या बियाण्यांचे जतन करतात ज्या जमिनीला पुन्हा हिरवेगार बनवू शकतात. हवामान बदल ही नवीन गोष्ट नाही, असं त्या म्हणतात. मानव गेल्या १०,००० वर्षांपासून शेती करत आहे आणि आपल्याला उपलब्ध असलेल्या पिकांच्या विविधतेचा उपयोग करून घ्यायला हवा, असं त्यांचं मत आहे.[] []

पुरस्कार

[संपादन]

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात कुंडजी यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार त्यांना मिळेल याची त्यांना अपेक्षा नव्हती.[] मार्चच्या सुरुवातीला एका अधिकाऱ्याने फोनवर पुरस्काराची माहिती दिल्यानंतर त्या मागील रात्री नवी दिल्लीला पोहोचल्या. तो फोन आला तेव्हा त्या आपल्या भावासोबत आणि आईसोबत काम करत होत्या, ज्यांना त्यांच्या मदतीची गरज होती.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "For Farmers Fearing Drought, Auroville Offers Some Lessons". The New York Times. 30 मे 2013. 4 मार्च 2025 रोजी पाहिले.
  2. ^ Ministry of Women & Child Development Govt of India (19 March 2018). "Deepika Kundaji - Nari Shakti Awardee 2017". You Tube - Ministry of Women & Child Development Govt of India. 16 May 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "Holding the Cosmos in Our Hands". National Geographic Society Newsroom (इंग्रजी भाषेत). 2017-05-25. 2020-05-16 रोजी पाहिले.
  4. ^ "Sowing seeds of consciousness - Presentations from the South Asia Conference on "Outstanding Organic Agriculture Techniques", Bangalore organised by OFAI (2009)". India WaterPortal. 2009. 2017-05-16 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 May 2020 रोजी पाहिले.
  5. ^ Chandrasekaran, Anupama (2013-05-30). "For Farmers Fearing Drought, Auroville Offers Some Lessons". India Ink (इंग्रजी भाषेत). 2020-05-16 रोजी पाहिले.Chandrasekaran, Anupama (30 May 2013). "For Farmers Fearing Drought, Auroville Offers Some Lessons". India Ink. Retrieved 16 May 2020.
  6. ^ a b "Nari Shakti of 30 women to be honoured at Rashtrapati Bhavan". The New Indian Express. 8 March 2018. 2023-04-18 रोजी पाहिले.