दीपशिखा नागपाल
Indian actress | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | ऑगस्ट २, इ.स. १९७०, जानेवारी २७, इ.स. १९७७ मुंबई | ||||
|---|---|---|---|---|---|
| नागरिकत्व | |||||
| व्यवसाय |
| ||||
| अपत्य |
| ||||
| वैवाहिक जोडीदार |
| ||||
| |||||
दीपशिखा नागपाल, ज्यांना दीपशिखा म्हणूनही ओळखले जाते, ही एक भारतीय अभिनेत्री आणि चित्रपट दिग्दर्शक आहे जी प्रामुख्याने हिंदी भाषेतील चित्रपट आणि हिंदी टेलिव्हिजन निर्मितीमध्ये काम करते. तिने कोयला, बादशाह, दिल्लगी आणि पार्टनर यासह अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१४ मध्ये ती कलर्स टीव्हीच्या रिॲलिटी शो बिग बॉस सीझन ८ मध्ये स्पर्धक होती.
कोयला या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर तिला हिंदी चित्रपटसृष्टीत खूप प्रसिद्धी मिळाली. ती सतीश कौशिक यांच्यासोबत धूम धडाका या हिंदी चित्रपटातही दिसली. तिने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. दिग्दर्शक म्हणून तिचा पहिला चित्रपट ये दूरियां हा २०११ मध्ये प्रदर्शित झाला.[१]
वैयक्तिक जीवन
[संपादन]दीपशिखाचा जन्म २० ऑगस्ट १९७० रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला.[२] दीपशिकाने अभिनेता जीत उपेंद्रशी १९९७ मध्ये लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत (वेदिका आणि विवान).[३] जीत यांनी अनेक हिंदी, मल्याळम, गुजराती चित्रपटांमध्ये छोटे पात्र रंगवले आहे. परंतु दहा वर्षांनी २००७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.[४][५] जानेवारी २०१२ मध्ये, तिने इंदूर येथील केशव अरोराशी लग्न केले, जो तिच्या दिग्दर्शनात पदार्पणात ये दूरियां या चित्रपटात तिचा सह-अभिनेता होता. तिची मोठी बहीण, आरती नागपाल देखील एक अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहे.[६][७][८]
कारकिर्द
[संपादन]दीपशिखाने १९९४ मध्ये गॅग्स्टर चित्रपटापासून अभिनयाची सुरुवात केली. तिने अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या, जसे की करण अर्जुन (१९९५), पोलिस स्टेशन (१९९७), कोयला (१९९७), बरसात की रात (१९९८), सिर्फ तूम (१९९९), जानम समझा करो (१९९९), बादशाह (१९९९), दिल्लगी (१९९९), अग्नीपुत्र (२०००), रिश्ते (२००२), प्यार में ट्विस्ट (२००५), कॉर्पोरेट (२००६), पार्टनर (२००७), इत्यादी. २००६ चा मोहित्यांची रेणूका आणि २००९ चा तुक्या तुकविला नाग्या नाचविला या मराठी चित्रपटांमध्ये देखिल तिने अभिनय केला आहे.
तिने अनेक दुरदर्शन मालिकांमध्ये पण काम केले जसे की शक्तिमान (१९९८), सुराग - द क्ल्यु (१९९९-२००२), विष्णू पुराण (२०००), सोनपरी (२०००-०४), किटी पार्टी (२००२-०४), श्श्श्श...कोई है (२००२), शरारत (२००३), सीआयडी (२००६), बा बहू और बेबी (२००५-०९), होंगे जुदा ना हम (२०१२-१३), बाल वीर (२०१३), मधुबाला - एक इश्क एक जूनून (२०१४), जांबाज सिंदबाद (२०१६), अधूरी कहानी हमारी (२०१६), एक था राजा एक थी रानी (२०१६), पेशवा बाजीराव (२०१७), रंजू की बेटियां (२०२१), ना उम्र की सीमा हो (२०२२-२३).
तिने डांसिंग क्वीन (२००८), नच बलिये (२०१३) आणि बिग बॉस सीझन ८ (२०१४) मध्ये पण भाग घेतला होता.[९]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Deepshikha Nagpal is ready to change perceptions!". The Times of India. 25 August 2011. 26 September 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 September 2011 रोजी पाहिले.
- ↑ "Deepshikha Nagpal - Movies, Biography, News, Age & Photos". BookMyShow (इंग्रजी भाषेत). 2025-05-27 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ↑ "Mother's Day 2021: 'My feelings took a backseat, and my kids became priority', says single mom Deepshikha Nagpal" (इंग्रजी भाषेत). 8 May 2021. 20 July 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 July 2022 रोजी पाहिले.
- ↑ "When reel into turns real for Deepshikha Nagpal". Daily News and Analysis.
- ↑ "Dipsshikha broke down on the sets..." The Times of India. 21 May 2008. 16 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 April 2013 रोजी पाहिले.
- ↑ "Deepshikha is all set to tie the knot with Keshav Arora". Mid-Day.
- ↑ "Don't want to talk about it: Deepshikha Nagpal on husband Kaishav Arora threatening to kill her and kids". 26 April 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ↑ "TV actress Deepshikha Nagpal restrains husband from entering home". 24 April 2015.
- ↑ "Bigg Boss 8 eviction: Deepshikha Nagpal out!". Daily News and Analysis. 12 October 2014 रोजी पाहिले.
- Uses of Wikidata Infobox
- मृत बाह्य दुवे असणारे लेख from February 2026
- कायमचे मृत बाह्य दुवे असणारे लेख
- इ.स. १९७० मधील जन्म
- २१व्या शतकातील भारतीय अभिनेत्री
- महाराष्ट्रातील व्यवसायिक महिला
- हिंदी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक
- हिंदी चित्रपट निर्माते
- भारतीय पटकथा लेखिका
- हिंदी दूरचित्रवाहिनी अभिनेत्री
- मराठी चित्रपट अभिनेत्री
- हिंदी चित्रपट अभिनेत्री
- भारतीय चित्रपट अभिनेत्री
- भारतीय चित्रपट दिग्दर्शिका