दिशाकाक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इसवी सनाच्या पहिल्या शतकात जेव्हा समुद्रातून व्यापारी प्रवास करीत असत. तेव्हा त्यांच्या सोबत चार ते पाच कावळे असत . ते कावळे जेव्हा समुद्रकिनारा जवळ येईल त्यावेळेस हे कावळे त्या दिशेने जात असत.हे कावळे एकप्रकारे व्यापाऱ्यांना दिशा दाखवण्याचे काम करत असत. या दिशा दाखवणाऱ्या कावळ्यांना दिशाकाक असे म्हणतात.

             इतिहास काळात या कावळ्यांनी व्यापाऱ्यांनची बहुमूल्य मदत केली. भारताचा जेव्हा रोमशी व्यापार चालत होता तेव्हा या कावळ्यांची त्या व्यापारामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका होती. यांच्यामुळे व्यापाऱ्यांची समुद्रात भटकंती होत नसे. जहाज योग्य त्या दिशेने जात असे. दीपगृहे निर्माण झाल्यापासून ही पद्धत बंद पडली.[१]
  1. ^ Tom., Inglis, (2013). Directional Drilling. Springer Netherlands. ISBN 978-94-017-1270-5. OCLC 1066200093.CS1 maint: extra punctuation (link)