Jump to content

दिव्य प्रेम (लोककथा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खाल्डियन (Chaldean) म्हणजे म्हणजे प्राचीन मेसोपोटेमियन संस्कृती आणि इराकमधील आधुनिक कॅथोलिक समुदाय. या लोकांमध्ये दिव्य प्रेमासंबंधी एक कथा प्रचलित आहे. मानवामध्ये दिव्य प्रेमाचा वर्षाव करू पाहणाऱ्या एका महान जिवाची ही कथा आहे.

कथेचा आशय

[संपादन]

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. अरेबियाच्या वाळवंटी प्रदेशामध्ये एक दिव्य जीव जन्माला आला. या पृथ्वीतलावर लोकांमध्ये ईश्वरी प्रेमभावना जागृत करावी,  या हेतूने त्याने जन्म घेतला होता. पण लोकांना त्याच्या पाठीमागची उदात्त भावना समजू शकली नाही, लोकांचा गैरसमज   झाला, त्यांनी त्याच्यावर संशय घेतला. लोकांनी त्याच्यावर अनैतिकतेचे आरोप केले. सरतेशेवटी, या सर्वांपासून दूर जाऊन, शांतपणे दुसरीकडे कोठेतरी आपले इच्छित कार्य  करत,  मृत्यू स्वीकारावा असे त्याच्या मनाने घेतले. तरीही लोकांनी त्याचा पिच्छा पुरविला, शेवटी त्याला तेथून पळ काढावा लागला.  

अचानकपणे, त्या विस्तीर्ण वाळवंटामध्ये त्याला एक छोटेसे डाळिंबाचे झाड दिसले. त्या झाडाच्या फांद्यांच्या छायेमध्ये अखेरचा विसावा घ्यावा म्हणून तो तेथे विसावला. थेंबाथेंबाने त्याचे रक्त त्या मातीमध्ये मिसळत गेले, ती भूमी सुपीक होत गेली. काही दिवसांतच ते झाड आश्चर्यकारकरित्या मोठे झाले. ते उंच, मोठे, घनदाट झाले. ते इतके विशाल झाले की, येणारेजाणारे प्रवासी त्याच्या छायेत सुखाने विसावू लागले. ते झाड लालकेशरी,  भरगच्च पाकळ्या असणाऱ्या सुंदर फुलांनी बहरून गेले. लोकांना समजले देखील नाही की, ज्याच्या मागे ते हात धुऊन लागले होते तोच येथे कायमचा विसावला आहे.  या नाही तर त्या रूपात, त्या दिव्य जिवाने आपले ईश्वरीय प्रेम  लोकांमध्ये प्रसृत करण्याचे कार्य चालूच ठेवले.  

कालांतराने डाळिंबाची फुलं ‘दिव्य प्रेम’ या नावाने ओळखली  जाऊ लागली. [१]

तात्पर्य

[संपादन]

आपली उदात्त भूमिका लोकांना समजली नाही म्हणून महान व्यक्ती आपले कार्य करणे थांबावत नाहीत.

संदर्भ

[संपादन]

     

  1. ↑ The Mother (1980). Words of the Mother - III. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 15. Pondicherry: Sri Aurobindo Ashram. ISBN 81-7058-670-4.