Jump to content

दिव्या देशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिव्या देशमुख
२०२५ मध्ये देशमुख
देश भारत भारत
जन्म९ डिसेंबर, २००५ (2005-12-09) (वय: २०)
नागपूर, महाराष्ट्र, भारत
पद ग्रॅंडमास्टर
फिडे गुणांकन "२५०५". (नोव्हेंबर २०२५)
सर्वोच्च गुणांकन २५०५ (नोव्हेंबर २०२५)

दिव्या देशमुख (जन्म: ९ डिसेंबर २००५) ही एक भारतीय बुद्धिबळपटू आहे. तिला २०२५ मध्ये महिला बुद्धीबळ विश्वचषक जिंकल्याबद्दल थेट ग्रँडमास्टर ही पदवी मिळाली व ती २०२६ च्या महिला कॅंडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरली.[] तिने बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये तीन वेळा सुवर्णपदक जिंकले आहे. दिव्याने आशियाई अजिंक्यपद स्पर्धा, जागतिक ज्युनियर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा तसेच जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अनेक सुवर्णपदके जिंकली आहेत.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Levin, Anthony (२०२५-०७-२८). "2025 Women's World Cup Final Tiebreaks: Divya Wins Women's World Cup, Earns Grandmaster Title". Chess.com. २०२५-०७-२८ रोजी पाहिले.
  2. Raghavan, R. Srinivasa (2024-06-20). "Divya Deshmukh, India's new chess star, looks set to checkmate the world". thefederal.com (इंग्रजी भाषेत). 2025-03-18 रोजी पाहिले.

सुरुवातीचे जीवन

[संपादन]

दिव्याचा जन्म नागपूर येथे एका मराठी कुटुंबात झाला. तिचे आई-वडील जितेंद्र देशमुख आणि नम्रता देशमुख हे डॉक्टर आहेत. तिने तिचे सुरुवातीचे शिक्षण भवन्स भगवानदास पुरोहित विद्या मंदिर येथून घेतले.[]

कारकीर्द

[संपादन]

२०२१ मध्ये दिव्या देशमुख भारताची २१ वी महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनली. तिने २०२२ ची महिला भारतीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. तिने २०२२ च्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये वैयक्तिक कांस्यपदकही जिंकले. ती सुवर्णपदक विजेत्या FIDE ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड २०२० संघाचाही भाग होती. डिसेंबर २०२४ रोजी, ती भारतातील दुसऱ्या क्रमांकाची महिला बुद्धिबळपटू आहे.

२०२३ मध्ये, अल्माटी येथे तिने आशियाई महिला बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकले. त्यानंतर तिने टाटा स्टील इंडिया बुद्धिबळ स्पर्धेत सर्वांत शेवटचे सीडिंग असूनही महिलांच्या रॅपिड विभागात तिने पहिले स्थान पटकावले. या स्पर्धेत तिने हरिका द्रोणवल्ली, वंतिका अग्रवाल, कोनेरू हम्पी, सविता श्री बी, इरिना क्रश आणि निनो बत्सियाश्विली यांना पराभूत केले, महिला विश्वविजेत्या जू वेंजुन आणि ॲना उशेनिना यांच्याविरुद्ध बरोबरी साधली आणि पोलिना शुवालोवा हिच्याकडून तिचा एकमेव पराभव झाला.

मे २०२४ मध्ये, देशमुख शारजा चॅलेंजर्स स्पर्धेत विजेती ठरली, एक मोठी ओपन टूर्नामेंट जिंकल्याने तिला पुढच्या वर्षी शारजा मास्टर्समध्ये स्थान मिळाले. जूनमध्ये, ती २०२४ ची FIDE वर्ल्ड 20 वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेची विजेती बनली. २००१ मध्ये कोनेरू हम्पी, २००८ मध्ये हरिका द्रोणवल्ली आणि २००९ मध्ये सौम्या स्वामीनाथन यांच्यानंतर ती जागतिक ज्युनियर मुलींचे विजेतेपद जिंकणारी चौथी भारतीय ठरली. अंतिम फेरीत विजयाची आवश्यकता असताना, तिने पाच तासांच्या दीर्घ लढतीत बल्गेरियाच्या तिसऱ्या मानांकित बेलोस्लावा क्रॅस्टेवाला पराभूत करून संभाव्य ११ पैकी १० गुण मिळवले आणि सुवर्णपदक जिंकले. सप्टेंबर २०२४ मध्ये, तिने २०२४ मध्ये झालेल्या ४५ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये सांघिक सुवर्ण तसेच वैयक्तिक सुवर्णपदके जिंकली.

वर्ल्ड कप

[संपादन]

कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख ह्यांच्यातील वर्ल्ड कप महिला बुद्धीबळ स्पर्धा जॉर्जिया येथे चालू आहे. दोघींमध्ये पहिला व दुसरा डाव बरोबरीत सुटला. आजच्या तिसऱ्या डावात दिव्या देशमुख ही विजेती ठरली आहे आणि वर्ल्ड कप तिच्या नावावर झाला आहे.[] आतापर्यंत तिने

  1. महिला ग्रँडमास्टर
  2. वर्ल्ड कप विजेतेपद

जिंकलेले आहे आणि ती आणखी विक्रम नोंद करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. Shekhawat, Meemansa. "Meet Divya Deshmukh, grandmaster who helped India clinch gold medal at Budapest Chess Olympiad at age of..." DNA India (इंग्रजी भाषेत). 2025-03-18 रोजी पाहिले.
  2. महाराष्ट्र टाईम्स,२८जुलै २०२५
  3. महाराष्ट्र टाईम्स,२९जुलै २०२५