दीप अमावास्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दिव्याची अमावास्या या पानावरून पुनर्निर्देशित)
दीप पूजन

दिव्याची अमावास्या ही आषाढ महिन्यातील अमावास्या म्हणून साजरी केली जाते.[१]

स्वरूप[संपादन]

आषाढ महिन्याच्या अमावास्या तिथीला घरातील, देव घरातील धातूच्या दिव्यांची पूजा केली जाते.[२] यासाठी दिवे स्वच्छ घासून, उजळवले जातात. त्यांची पूजा केली जाते. पुरणाचा नैवेद्य केला जातो.[३] काही कुटुंबात बाजरीच्या पिठाचे किंवा कणकेचे दिवे केले जातात आणि त्यांची पूजा केली जाते.[४]

समाजात विविध ठिकाणी[संपादन]

दीप अमावास्येचे औचित्य साधून कुटुंबात [पूजा केली जाते त्याचप्रमाणे विविध मंदिरे, शाळा अशा ठिकाणी दीप पूजन केले जाते. विद्यार्थी शाळेत दिवे प्रज्वलित करून, प्रार्थना करतात.[५]

समाजातील विविध स्तरात या दिवसाला गटारी अमावास्या म्हणून ओळखले जाते. श्रावण महिन्यात मांसाहार, कांदा , लसूण यांचे सेवन वर्ज्य मानले जात असल्याने मांसाहार करणा-या कुटुंबांमध्ये या दिवशी विशेष करून मांसाहार केला जातो.[६]

आदिवासी जनजातीत[संपादन]

दिव्याची अमावास्या भिल्ल या आदिवासी जमातीत विशेषत्वाने साजरी केली जाते.[७]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Aashadhi Amavasya 2021 दीप अमावास्या : शुभ वेळ आणि महत्व". महाराष्ट्र टाइम्स. 2022-07-23 रोजी पाहिले.
  2. ^ Kārāgirī. Mahārāshṭra Rājya Lokasāhitya Samitīcyā vatīne Mahārāshṭra Śāsanācyā Śikshaṇa Vibhāgātarphe prakāśita. 1992.
  3. ^ "दीप अमावस्या : जाणून घ्या महत्व, माहिती आणि पूजा विधीबद्दल". Loksatta. 2022-07-23 रोजी पाहिले.
  4. ^ Ḍhere, Rāmacandra Cintāmaṇa (1971). Lokasãskr̥tūeī kshitije.
  5. ^ XYZ, Social News (2022-07-29). ": Mumbai: Students celebrate 'Deep Amavasya' #Gallery". Social News XYZ (इंग्रजी भाषेत). 2022-07-30 रोजी पाहिले.
  6. ^ Marathi, TV9 (2022-07-28). "Gatari Amavasya 2022: आज गटारी अमावस्या, गटारी अमावस्येला मांसाहार आणि मद्यपान का करतात?". TV9 Marathi. 2022-07-30 रोजी पाहिले.
  7. ^ Gāre, Govinda (2000). Mahārāshṭrātīla ādivāsī jamātī: sāmājika va sā̃skr̥tika māgovā. Kônṭinenṭala Prakāśana.