Jump to content

दिल एक मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिल एक मंदिर
चलचित्र
प्रकाशन तारीख1963 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी संपादन
दिग्दर्शकसी.व्ही. श्रीधर संपादन
प्रमुख कलाकारराजेंद्र कुमार, मीनाकुमारी, राज कुमार संपादन
चित्रीकरण दिग्दर्शकA. Vincent संपादन
संगीतकारशंकर-जयकिशन संपादन

दिल एक मंदिर हा १९६३ चा भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे जो सी.व्ही. श्रीधर दिग्दर्शित आणि राज बलदेव राज यांनी लिहिलेला आहे. या चित्रपटात राजेंद्र कुमार, मीना कुमारी, राज कुमार आणि मेहमूद यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत शंकर-जयकिशन यांचे आहे. या चित्रपटातील सर्व गाणी हिट झाली आणि लोकांना आवडली. हा चित्रपट खूप हिट झाला आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या यादीत पाचव्या क्रमांकावर होता.[१] हा चित्रपट श्रीधर यांच्या तमिळ चित्रपट नेंजिल ओर आलयम (१९६२) चा रिमेक आहे,[२] आणि १९६७ मध्ये पाकिस्तानमध्ये इन्सानियत या नावाने रिमेक करण्यात आला होता.

चित्रपटाचे संगीत शंकर-जयकिशन यांनी दिले होते व मोहम्मद रफी, लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूर सारख्या गायकांनी गाणी गायली.

# गीत गायक गीतकार कालावधी
१ "दिल एक मंदिर है" मोहम्मद रफी, सुमन कल्याणपूर हसरत जयपुरी ०४:२५
२ "तुम सब को छोड कर" मोहम्मद रफी ०४:०७
३ "हम तेरे प्यार में" लता मंगेशकर ०४:४७
४ "रुक जा रात" शैलेंद्र ०४:१३
५ "याद ना जाये बीते दिनों की" मोहम्मद रफी ०४:२३
६ "ओ मेरी लाडली" सुमन कल्याणपूर ०४:१९
७ "पालनहारे राम है" (भजन) एस. जानकी ०२:१७

पुरस्कार

[संपादन]

११ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, राज कुमार यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आणि अर्जुन देव रश्क यांना सर्वोत्कृष्ट संवाद पुरस्कार मिळाला.[२] कुट्टी पद्मिनी यांना पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राजेंद्र कुमार आणि मीना कुमारी यांच्यासह त्यांच्या निवासस्थानी ओळख दिली.

पुरस्कार श्रेणी नामांकित व्यक्ती निकाल
११ वे फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता राज कुमार विजयी
सर्वोत्तम संवाद अर्जुन देव रश्क विजयी
सर्वोत्कृष्ट चित्रपट सी.व्ही. श्रीधर नामांकन
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नामांकन
सर्वोत्तम कथा नामांकन
सर्वोत्कृष्ट अभिनेता राजेंद्र कुमार नामांकन
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मीना कुमारी नामांकन
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक शंकर-जयकिशन नामांकन

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Box Office 1963". बॉक्स ऑफिस इंडिया. 22 September 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. 1 2 Mahaan, Deepak (29 January 2010). "Dil Ek Mandir (1963)". द हिंदू. 29 September 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 April 2014 रोजी पाहिले.