दिल्ली कॅपिटल्स (मप्रीली)
| लीग | महिला प्रीमियर लीग | ||
|---|---|---|---|
| कर्मचारी | |||
| कर्णधार | जेमिमा रॉड्रिग्ज | ||
| प्रशिक्षक | जोनाथन बॅटी | ||
| मालक |
| ||
| संघ माहिती | |||
| शहर | नवी दिल्ली, दिल्ली, भारत | ||
| रंग |
निळा आणि लाल | ||
| स्थापना | २०२३ | ||
| घरचे मैदान | अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली | ||
| इतिहास | |||
| मप्रीली विजय | 0 | ||
| अधिकृत संकेतस्थळ | delhicapitals.in | ||
| |||
दिल्ली कॅपिटल्स हा एक भारतीय व्यावसायिक महिला क्रिकेट संघ आहे, जो महिला प्रीमियर लीगमध्ये स्पर्धा करतो आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्ली, दिल्ली येथे आहे. या संघाची मालकी संयुक्तपणे जीएमआर समूह आणि जेएसडब्ल्यू समूह यांच्याकडे आहे, जे कॅपिटल्सच्या पुरुष संघाचेही मालक आहेत. या संघाचे प्रशिक्षक जोनाथन बॅटी आहेत आणि कर्णधार मेग लॅनिंग आहे.[१][२] या संघाने तिन्ही डब्ल्यूपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली होती, परंतु त्यांना दोन वेळा मुंबई इंडियन्सकडून (२०२३, २०२५) टर एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून (२०२४) त्यांचा पराभव झाला.[३]
इतिहास
[संपादन]ऑक्टोबर २०२२ मध्ये, बीसीसीआयने मार्च २०२३ मध्ये पाच संघांची महिला फ्रँचायझी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा आपला मानस जाहीर केला.[४]जानेवारी २०२३ मध्ये या स्पर्धेला 'महिला प्रीमियर लीग' असे नाव देण्यात आले आणि त्याच महिन्यात एका बंद निविदा प्रक्रियेद्वारे गुंतवणूकदारांनी फ्रँचायझींचे हक्क विकत घेतले.[५] भारतीय प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे मालक असलेल्या जीएमआर समूह आणि जेएसडब्ल्यू समूहाने एका फ्रँचायझीचे हक्क विकत घेतले.[५]
फेब्रुवारी २०२३ मध्ये, जोनाथन बॅटी यांची संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषणा करण्यात आली.[१] डब्ल्यूपीएलसाठी पहिला खेळाडू लिलाव १३ फेब्रुवारी २०२३ रोजी झाला, ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात १८ खेळाडूंना सामील केले.[६] पहिल्याच स्पर्धेत, दिल्ली कॅपिटल्सने गटात अव्वल स्थान पटकावून, आठपैकी सहा सामने जिंकून थेट अंतिम फेरीत प्रवेश केला.[७] तथापि, अंतिम सामन्यात त्यांना मुंबई इंडियन्सकडून सात गडी राखून पराभव पत्करावा लागला.[३] त्यानंतर २०२४ मध्ये सुद्धा दिल्ली कॅपिटल्सने गटात अव्वल स्थान पटकावून, आठपैकी सहा सामने जिंकून थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. परंतु पुन्हा अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने त्यांचा आठ गडी राखून पराभव केला.[८]
२०२५ महिला प्रीमियर लीगमध्ये सुद्धा दिल्ली कॅपिटल्सने लीग टप्प्यात पाच विजयांसाहित पहिले स्थान मिळवले परंतु पुन्हा एकदा अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने त्यांना अवघ्या ८ धावांनी मात दिली आणि दिल्लीला चषकापासून वंचित राहावे लागले.[९]
हंगामानुसार कामगिरी
[संपादन]| वर्ष | लीग स्थान | अंतिम स्थान | सर्वाधिक धावा | सर्वाधिक बळी |
|---|---|---|---|---|
| २०२३ | १/५ | उपविजेते | मेग लॅनिंग (३४५) | जेस जोनासन (१३) |
| २०२४ | १/५ | उपविजेते | मेग लॅनिंग (३३१) | मेरिझॅन कॅप (११) |
| २०२५ | १/५ | उपविजेते | मेग लॅनिंग (२७६) | शिखा पांडे (१०) |
| २०२६ | ||||
| एकूण | उपविजेते x २ | मेग लॅनिंग (९५२) | जेस जोनासन (३३) | |
कर्णधारांची कामगिरी
[संपादन]| खेळाडू | कालावधी | सामने | विजय | पराभव | सर्वोत्तम निकाल |
|---|---|---|---|---|---|
| २०२३-२०२५ | २७ | १७ | १० | उपविजेते (२०२३, २०२४, २०२५) |
सहाय्यक कर्मचारी
[संपादन]| हुद्दा | नाव |
|---|---|
| मुख्य प्रशिक्षक | जोनाथन बॅटी |
| सहाय्यक प्रशिक्षक | हेमलता काला |
| क्षेत्ररक्षण प्रशिक्षक | मिलाप मेवाडा |
स्त्रोत : अधिकृत संकेतस्थळ[१०]
किट उत्पादक आणि प्रायोजक
[संपादन]| वर्ष | किट उत्पादक | मुख्य शर्ट प्रायोजक | बॅक प्रायोजक |
|---|---|---|---|
| २०२३ | व्रोग्न | जेएसडब्ल्यू पेंट्स | स्पोर्ट्सबझ्झ११ |
| २०२४ | पुमा | डीपी वर्ल्ड | जेएसडब्ल्यू पेंट्स |
| २०२५ |
संदर्भ
[संपादन]- ^ a b "Jonathan Batty appointed Delhi Capitals head coach for WPL". लोकमत टाइम्स. १३ फेब्रुवारी २०२३. ५ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ^ "Meg Lanning named Delhi Capitals captain at WPL" [डब्ल्यूपीएलमध्ये मेग लॅनिंगची दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार म्हणून नियुक्ती]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ^ a b "Mumbai Indians become the first WPL champions thanks to Sciver-Brunt and Wong" [सायव्हर-ब्रंट आणि वाँग यांच्यामुळे मुंबई इंडियन्स ठरले डब्ल्यूपीएलचे पहिले विजेते]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ मार्च २०२३. ४ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ^ "Inaugural Women's IPL likely to be played from March 3 to 26" [पहिला महिला आयपीएल ३ ते २६ मार्च दरम्यान खेळला जाण्याची शक्यता]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ डिसेंबर २०२२. ५ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ^ a b "Owners of Mumbai Indians, Delhi Capitals, RCB win bids to own Women's Premier League teams" [मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबीच्या मालकांनी महिला प्रीमियर लीग संघांचे मालकी हक्क मिळवण्यासाठीच्या बोली जिंकल्या]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २५ जानेवारी २०२३. ५ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ^ "Bid-by-bid updates - 2023 WPL auction". ईएसपीएन क्रिकइन्फो. १३ फेब्रुवारी २०२३. ५ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ^ "Women's Premier League 2022/23 - Table" [महिला प्रीमियर लीग २०२२/२३ - गुणतालिका]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ५ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ^ "RCB wins its first title across leagues as Smriti Mandhana's side beats DC in WPL 2024" [स्मृती मंधानाच्या संघाने डब्ल्यूपीएल २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सला हरवून आरसीबीने सर्व लीगमध्ये आपले पहिले विजेतेपद पटकावले]. स्पोर्टस्टार. १७ मार्च २०२४. ५ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ^ "A Harmanpreet masterpiece blows Delhi Capitals away" [हरमनप्रीतच्या अप्रतिम खेळीने दिल्ली कॅपिटल्स पराभूत]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ मार्च २०२५. ५ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
- ^ "Delhi Capitals announce Coaching Staff Ahead of Women's Premier League 2023" [दिल्ली कॅपिटल्सची महिला प्रीमियर लीग २०२३ पूर्वी आपल्या कोचिंग स्टाफची घोषणा]. दिल्ली कॅपिटल्स. ११ फेब्रुवारी २०२३. ५ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
