दिलीप चावरे
Appearance
दिलीप चावरे हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी शेरलाॅक होम्सच्या बऱ्याच कथा मराठीत आणल्या आहेत.
दिलीप चावरे हे टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार आहेत/होते. त्या वृत्तपत्रात सन २००० ते २००५ या काळात त्यांचा दर १५-२० दिवसांनी एक लेख प्रकाशित होत असे.
दिलीप चावरे यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- निर्धारयात्री (मुंबईतल्या ११ जानेवारी २००५ च्या साखळी बाॅम्बस्फोटात जखमी झालेल्या ७० लोकांच्या मुलाखतींचे व त्यांच्यासाठी केलेल्या कार्याचे संकलन, सहसंकलक - डाॅ. मेधा सोमय्या)
- महाराष्ट्राचा लेखाजोखा (पत्रकारिता)
- शेरलॉक होम्सचं पुनरागमन (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सर ऑर्थर काॅनन डायल)
- शेरलॉक होम्सच्या कर्तृत्त्व कथा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सर ऑर्थर काॅनन डायल)
- शेरलॉक होम्सच्या चातुर्य कथा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सर ऑर्थर काॅनन डायल)
- शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सर ऑर्थर काॅनन डायल)
- शेरलॉक होम्सच्या साहस कथा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सर ऑर्थर काॅनन डायल)
- सिद्धहस्त (मसाजिस्ट राम कृष्णराव भोसले यांच्या जीवनकार्यावरील पुस्तक)