दिनेश कोतुळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.


दिनेश सुरेश कोतुळकर हे तळेगाव दाभाडे येथील चावीमेकर आहेत. ते फक्त सातवी पास आहेत, पण तळेगाव रेल्वे स्टेशननजीक त्यांचा एक किल्ल्या बनवण्याचा मोठा व्यवसाय चालतो.

कधी काळी छंद म्हणून चाव्या तयार करण्याच्या कौशल्याला, संगणकाच्या माध्यमातून आधुनिक आणि व्यावसायिक रूप देऊन त्यांनी या विषयात मास्टरी मिळवली आहे.

लहानपणी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर, ते घरातील पारंपरिक आइस्क्रीम विक्रीच्या व्यवसायाची जबाबदारी पेलत होते. लहान वयातच दिनेशने छंद म्हणून चाव्या तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले.

एकदा अडचणीत सापडलेल्या एका महिलेला दुकान बंद झाल्याचे कारण सांगून एका चावीवाल्याने वेठीस धरलेले दिनेशने पाहिले. चावीचे कसलेही ज्ञान नसताना कुलूप तोडून दिनेशने त्या महिलेला मदत केली. याच घटनेने व्यथित झालेल्या दिनेशने चावी बनवण्याचे तंत्र आत्मसात करण्याचा चंग बांधला आणि थोड्याच काळात दिनेश कोतुळकर यांनी चाव्या तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले.

संगणकाचे ज्ञान[संपादन]

प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर चाव्या बनविण्याची कला विकसित केल्यानंतर, झपाट्याने बदलणार्‍या लॉकिंग-सिस्टिमची कुलूपे उघडण्यासाठी दिनेशनी संगणकीय तंत्रज्ञानाची जोड घेण्याचे ठरविले. "कॉम्प्युटराइज्ड डिजिटल की‘च्या जमान्यात संगणक चालविता येणे नितांत आवश्‍यक असल्याने त्यांनी संगणकाची पुरेपूर माहिती घेतली. संगणकीय पुस्तकांचे वाचन, निरीक्षण करत ते हळूहळू संगणक हाताळायला शिकले.

स्मार्ट फोनचा उपयोग[संपादन]

स्मार्टफोन बाजारात आल्यावर स्मार्टफोनलाच संगणक समजून दिनेशनी अनेक प्रयोग सुरू केले. सर्फिंग, गुगल सर्च करत कॉम्पुटराईज्ड कार कीशी निगडित इलेक्‍ट्रॉनिक सर्किट्स व की कंपन्यांचे प्रोफाईल, कुलपांचे डिझाइन, की कोडिंग सिस्टिम आदींची माहिती ते प्राप्त करत गेले.

यंत्रसामग्री[संपादन]

दिनेश कोतुळकर यांनी चावी बनविण्यासाठी लागणारी महाग उपकरणे -स्कॅनिंग मशिन, पासवर्ड मॅचिंग, कॉम्पुटराईज्ड कटिंग मशिन आदी सुमारे आठ लाख रुपयांची यंत्रसामग्री धाडस करून परदेशातून ऑनलाईन खरेदी केली.

डिजिटल कार की-मेकर[संपादन]

कधी काळी छंद म्हणून चाव्या तयार करण्याच्या कौशल्याला, संगणकाच्या माध्यमातून आधुनिक आणि व्यावसायिक रूप देऊन तळेगाव दाभाडे येथील दिनेश सुरेश कोतुळकर हे आता ‘डिजिटल कार की मेकर‘ म्हणून प्रख्यात झाले आहेत. दिनेशला या कामासाठी भारतभरातून बोलावणी येत असतात.

ग्राहकसेवा[संपादन]

सीबीआय, सीआयडीसह पोलिसांनादेखील अनेक प्रसंगी तपासकामासाठी तिजोरी, कपाटे, बंद घराची कुलपे उघडण्याकामी दिनेश विनाशुल्क मदत करतात. कारच्या चाव्यांमध्ये पारंगत असल्याने चांगली कमाई होते. त्यासाठी वेळ पडली तर दुसर्‍या राज्यातही जावे लागते. दिनेशचे कसब आणि कुशलता पाहून नामांकित कार कंपन्यांच्या वितरकांनीही त्यांची मदत घेतली आहे. गरजू लोक तर दिनेशना विमान तिकीट देण्यापासून ते आलिशान हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्थादेखील करून देतात. गरजूंना मदत करण्यासाठी दिनेश कुठलीही अडवणूक न करता विनाविलंब पोचतात.. बहुतांशी लोक त्याला डीएसके नावाने ओळखतात. या व्यवसायातून आर्थिक प्रगतीचे चढते आलेख लिहिणारे दिनेश कोतुळकर आता लाखांचे पतंजली आरोग्य केंद्र सुरू करण्याच्या तयारीत आहेत.