दिदी कॉन्ट्रॅक्टर
German-American architect | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | इ.स. १९२९ मिनीयापोलिस | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जुलै ५, इ.स. २०२१ Sidhbari | ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
अपत्य |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
![]() |
डेलिया नारायण उर्फ दिदी कॉन्ट्रॅक्टर (जन्म नाव:डेलिया किंझिंगर) (१९२९ - ५ जुलै, २०२१) ह्या एक अमेरिकन कलाकार आणि बांधकाम व्यावसायिक होत्या. कॉन्ट्रॅक्टर ह्या एक स्वयंशिक्षित वास्तुविशारद असून, भारतातील स्थानिक, पारंपरिक पद्धतीने बांधकाम करण्यात त्या पारंगत आणि प्रसिद्ध होत्या.[१][२][३][४] याकरिता कॉन्ट्रॅक्टर कच्च्या मातीच्या विटा, बांबू आणि दगडाचा वापर बांधकाम साहित्य म्हणून करत असत. भारतातील महिलांसाठीचा मानाचा आणि सर्वोच्च नागरी पुरस्कार, नारी शक्ती पुरस्काराने कॉन्ट्रॅक्टर यांना सन्मानित करण्यात आले.[२]

जीवन
[संपादन]दिदी उर्फ डेलिया किंझिंगरचा जन्म मिनीयापोलिस येथे झाला होता. दिदीचे आई वडील अभिव्यक्तीवादी चित्रकार एडमंड किंझिंगर आणि ॲलिस फिश किंझिंगर हे असून दोघेही बौहॉस चळवळीशी संबंधित होते. दिदीचे वडील जर्मन होते, तर आई अमेरिकन होती.[३] कॉन्ट्रॅक्टरच्पा पालकांचे १९२७ मध्ये जर्मनीमध्ये लग्न झाले आणि नंतर ते मिनियापोलिसला गेले. यानंतर हे जोडपे १९३३ साली पॅरिस, (फ्रान्स) ला गेले. १९३५ मध्ये ते टेक्सासमधील वेको येथे गेले. कॉन्ट्रॅक्टरचे वडील हे याकाळात प्रथम सहाय्यक प्राध्यापक, नंतर प्राध्यापक आणि शेवटी बेलर विद्यापीठाच्या कला विभागाचे प्रमुख होते.[५]
कॉन्ट्रॅक्टरचे बालपण न्यू मेक्सिको आणि टेक्सासमध्ये गेले. बालवयातच कॉन्ट्रॅक्टरने थिएटरमध्ये काम करण्यासाठी शाळेतून एक वर्षाची सुट्टी घेतली होते. त्यांना प्रथम वडीलांनी आणि 'हान्स हॉफमन' यांनी न्यू यॉर्कमध्ये कला शिकवली. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टरने कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठात कला शिकली.[३] याच काळात त्यांची भेट नारायण कॉन्ट्रॅक्टरशी झाली. लग्नानंतर हे जोडपे १९५० च्या दशकात नाशिकला आणि १९६० च्या दशकात मुंबईत स्थलांतरित झाले. या जोडप्याला एकूण चार मुले झाली. पतीपासून विभक्त झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर १९७० च्या दशकात हिमाचल प्रदेशातील कांगडा खोऱ्यात नोरा रिचर्ड्सने स्थापन केलेल्या कलाकारांच्या गावातील आंद्रेट्टा येथे राहायला गेल्या.[६][७]
कॉन्ट्रॅक्टरची मोठी मुलगी, माया नारायण ह्या एक निवृत्त क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ आहेत. कॉन्ट्रॅक्टरची सर्वात धाकटी मुलगी लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ किरीन नारायण या आहेत. किरीन नारायण यांनी दिदी कॉन्ट्रॅक्टर आणि कुटुंबाबद्दल आपल्या माय फॅमिली अँड अदर सेंट्स या आत्मचरित्रात वर्णन केले आहे. कॉन्ट्रॅक्टरचा मुलगा देवेंद्र कॉन्ट्रॅक्टर यांनी वास्तुविशारद म्हणून प्रशिक्षण घेतले असून ते न्यू मेक्सिकोमधील सांता फे येथे प्रॅक्टिस करतात.[८]
५ जुलै २०२१ रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी सिद्धबारी येथील घरी दिदी कॉन्ट्रॅक्टरचे निधन झाले.[९]
इमारती
[संपादन]
कॉन्ट्रॅक्टर ह्या वास्तुकलेत स्वयंशिक्षित होत्या. लहानपणी त्यांनी ऐकलेल्या फ्रँक लॉईड राइट यांच्या भाषणाने त्यांना प्रेरणा मिळाली. त्या अशा इमारती बनवत असे, ज्या नैसर्गिक स्थानिक साहित्यापासून बनवल्या जातात. यात प्रामुख्याने चिखल, बांबू, दगड आणि काही प्रमाणात देवदार लाकूड देखील असते. या वास्तूत जिन्यांचा वापर कलात्मक दृष्ट्या केला जात असे. अशा वास्तू ह्या धर्मशाळेच्या आसपासच्या परिसरात आढळतात आणि त्यात १५ हून अधिक घरे आणि तीन संस्थांचा समावेश आहे, ज्यामध्ये सिद्धबारी येथील निष्ठा ग्रामीण आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण केंद्र, पालमपूर येथील संभावना सार्वजनिक धोरण आणि राजकारण संस्था आणि बीर येथील धर्मालय संस्था यांचा समावेश आहे.[१][६]
सन्मान आणि पुरस्कार
[संपादन]कॉन्ट्रॅक्टरच्या जीवनावर अर्थ क्रुसेडर (२०१६), आणि दीदी कॉन्ट्रॅक्टर: मॅरींग द अर्थ टू द बिल्डिंग (२०१७) या दोन चित्रपटची कथा बेतलेली आहे. तसेच २०१७ मध्ये वुमेन्स आर्टिस्ट, आर्किटेक्चर अँड डिझायनर्स (WADe) आशिया जीवनगौरव पुरस्कार देखील त्यांना देण्यात आला होता.[३][१०]
२०१९ मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी कॉन्ट्रॅक्टर यांना भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला.[२][७]
संदर्भ
[संपादन]- ^ a b Rao, Parikshit (September 13, 2017), "Meet the octogenarian architect who speaks the language of mud and clay", Architectural Digest
- ^ a b c "Didi Contractor Receives India's Highest Civilian Honor for Women", Earthville, March 21, 2019
- ^ a b c d Giaracuni, Steffi (2017), Didi Contractor: Marrying the Earth to the Building
- ^ Varghese, Shiny (January 14, 2018), "Unto the Earth: Didi Contractor's oeuvre is a story of rare beauty", The Indian Express
- ^ "Edmund Daniel Kinzinger Paintings | Vintage Texas Paintings", Charles Morin's Vintage Texas Gallery
- ^ a b "Didi Contractor: A Self-Taught Architect Who Builds In Mud, Bamboo & Stone", World Architecture, May 11, 2018
- ^ a b Pandit, Ambika (March 8, 2019), "From masons, barbers to creators of forests and sustainable homes, nari shakti takes charge", Times of India
- ^ administrator (2020-08-05). "Architecture for the Senses". Trend Magazine (इंग्रजी भाषेत). 2023-03-17 रोजी पाहिले.
- ^ Varghese, Shiny (July 6, 2021), "Didi Contractor, champion of low-waste buildings, is no more", The Indian Express
- ^ Farida, Syeda (March 22, 2018), "This Self-Taught Octogenarian Has Been Creating Sustainable Homes for 30 Years!", The Better India
बाह्य दुवे
[संपादन]- Narayan, Kirin: My Family & Other Saints (excerpts) press.uchicago.edu
- Singh, Joginder: Didi Contractor / Ideas and Concerns