Jump to content

दिग्विजय नारायण सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिग्विजय नारायण सिंह

कार्यकाळ
२३ मार्च १९७७  १८ जानेवारी १९८०
मागील नवीन मतदारसंघ
पुढील किशोरी सिन्हा
मतदारसंघ वैशाली
कार्यकाळ
१५ मार्च १९७१  २३ मार्च १९७७
मागील वाल्मिकी चौधरी
पुढील रामविलास पासवान
मतदारसंघ हाजीपूर
कार्यकाळ
२ एप्रिल १९६२  १५ मार्च १९७१
मागील अशोक मेहता
पुढील नवल किशोर सिन्हा
मतदारसंघ मुझफ्फरपूर
कार्यकाळ
५ एप्रिल १९५७  २ एप्रिल १९६२
मागील नवीन मतदारसंघ
पुढील शशीरंजन प्रसाद साह
मतदारसंघ पपरी
कार्यकाळ
१७ एप्रिल १९५२  ५ एप्रिल १९५७
मागील नवीन मतदारसंघ
पुढील मतदारसंघ विसर्जित
मतदारसंघ उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर

जन्म २१ नोव्हेंबर १९२४
धरहरा, मुझफ्फरपूर जिल्हा, बिहार प्रांत, ब्रिटिश भारत
(आत्ता धरहरा, मुझफ्फरपूर जिल्हा, बिहार, भारत)
मृत्यू २ ऑगस्ट १९९१ (वय: ६७)
पाटणा, बिहार, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, जनता पक्ष, भारतीय लोक दल
पत्नी जनकनंदिनी देवी
नाते श्यामनंदन प्रसाद किशोर सिन्हा
व्यवसाय राजकारणी, समाजसेवक
धर्म हिंदू

दिग्विजय नारायण सिंह (२१ नोव्हेंबर १९२४ — २ ऑगस्ट १९९१) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी होते. दिग्विजय हे भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेचे ६ वेळा सदस्य राहिले आहेत. ते सर्वप्रथम १९५१-५२ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून तत्कालिन बिहार राज्याच्या उत्तर-पूर्व मुझफ्फरपूर मतदारसंघातून १ल्या लोकसभेचे सदस्य होते. तसेच सदस्य १९५७ च्या लोकसभा निवडणूकीत बिहार राज्याच्याच पपरी मतदारसंघातून २ऱ्या, १९६२ आणि १९६७ च्या लोकसभा निवडणूकीत बिहार राज्याच्याच मुझफ्फरपूर मतदारसंघातून ३ऱ्या४थ्या, १९७१ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (संघटन) पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून बिहार राज्याच्या हाजीपूर मतदारसंघातून ५व्या व अखेरीस १९७७ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय लोक दल पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून बिहार राज्याच्या वैशाली मतदारसंघातून ६व्या लोकसभेसे सदस्य होते.