दालदी बोली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रत्नागिरी खाडीपट्यात मुस्लीम मच्छिमार लोक 'दालदी बोली' ही मराठी प्रमाणभाषेची बोली बोलतात. ते लोक याला 'दालदी कोकणी बोली' असे संबोधतात. या समाजाचा मुख्य व्यवसाय मच्छिमारी आहे त्यामुळे सागर व मासेमारी याविषयी कित्येक शब्दांचा भरणा त्यांच्या बोलीत आहे. उदा. "भागातचो मासो नि शेपटी कुसो" ही म्हण. याचा अर्थ भागीदारीत नीट लक्ष नसले की नुकसानच पदरी येते.

(Daldi Muslim Women, Ratnagiri)