दामोदर धर्मानंद कोसंबी
दामोदर धर्मानंद कोसंबी | |
---|---|
जन्म नाव | दामोदर धर्मानंद कोसंबी |
जन्म | ३१ जुलै, इ.स. १९०७ |
मृत्यू |
२९ जून, इ.स. १९६६ पुणे, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | गणितज्ञ, इतिहाससंशोधक |
भाषा |
मराठी(मातृभाषा) इंग्लिश (साहित्य) |
विषय | गणित, इतिहास, अर्थशास्त्र |
वडील | धर्मानंद दामोदर कोसंबी |
दामोदर धर्मानंद कोसंबी (३१ जुलै, इ.स. १९०७ - २९ जून, इ.स. १९६६; पुणे, महाराष्ट्र) हे मराठी गणितज्ञ व इतिहाससंशोधक होते. यांनी साम्यवादी दृष्टिकोनातून भारताचा आर्थिक इतिहास उजेडात आणला [१]. बौद्ध तत्त्वज्ञानाचे व पाली भाषेचे अभ्यासक धर्मानंद दामोदर कोसंबी हे यांचे वडील होत.
योगदान
[संपादन]दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी आपल्या ॲन इंट्राॅडक्शन टु द स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री या ग्रंथात भारताच्या इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, घटनांचे विश्लेषण, मार्क्सवादी दृष्टी, ऐतिहासिक साधने व संशोधन या बाबींची चिकित्सा केली आहे. इतिहास म्हणजे साधन व उत्पादन यांच्या परस्परसंबंधातील एक कालानुक्रमावर आधारित घटना आहे असा त्यांचा ऐतिहासिक दृष्टिकोन होता. भोजराजाचे खगोलशास्त्र, विद्याधराचा सुभाषित रत्नकोश, भर्तृहरीचा शिलालेख आणि अनेक संस्कृत हस्तलिखितांचे त्यांनी संपादन केले. ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र आणि नाणकशास्त्राचे ते व्यासंगी संशोधक होते. सिंधु संस्कृतीची अर्थव्यवस्था, मौर्यांची उत्पत्ती, भारतीय समाजरचना, स्त्री व शूद्रांची स्थिती, भारत-रोमन व्यापार, आर्यांचा विस्तार, मौर्य साम्राज्याची अर्थस्थिती यांविषयी त्यांनी मूलभूत संशोधन मांडले [२].
प्रकाशित साहित्य
[संपादन]पुस्तकाचे शीर्षक | वर्ष (इ.स.) | भाषा | विषय/वर्णन |
---|---|---|---|
मिथ ॲंन्ड रिॲलिटी: स्टडीज इन द फॉर्म्युलेशन ऑफ इंडियन कल्चर | इ.स. १९६२ | इंग्लिश | भारतीय संस्कृती-समाजशास्त्रविषयक ग्रंथ |
द कल्चर अँड सिव्हिलायझेशन ऑफ एंशंट इंडिया | इ.स. १९६५ | इंग्लिश | भारतीय संस्कृती-समाजशास्त्रविषयक ग्रंथ |
एक्झॅस्परेटिंग एसेस : एक्झरसाईज इन द डायलेक्टिकल मेथड | इंग्लिश | ||
स्टॅटिस्टिकल स्टडी ऑफ द ओल्ड इंडियन पंचमार्क्ड कॉईन्स | इंग्लिश | ||
इंडो-युरोपियन पीपल | इंग्लिश | ||
टेक्स्टाईल गुड्स इन इंडिया | इंग्लिश |
दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्यावरील पुस्तके
[संपादन]- उत्तुंग आणि एकाकी संशोधन : दामोदर कोसंबी (आत्मचरित्र, चरित्र, आठवणी . प्रा. सुधीर पानसे)
बाह्य दुवे
[संपादन]- "फ्रंटलाईन: द मेकींग ऑफ ॲन इंडॉलॉजिस्ट" (इंग्रजी भाषेत). 2007-07-18 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2012-01-01 रोजी पाहिले.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "इनसायक्लोपीडिया ऑफ मार्क्सिझम" (इंग्रजी भाषेत). १ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "डी.डी. कोसंबी ब्लॉग" (इंग्रजी भाषेत). १ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
संदर्भसूची
[संपादन]- Kosambi, Meera (2015-06-05). "D D Kosambi: The Scholar and the Man". Economic and Political Weekly (इंग्रजी भाषेत): 7–8.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |