Jump to content

दाईम्यो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
daimyō; Daimyo; Даймьо; Daimyo; ڈیمیو; daimyo; даймьо; 大名; daimyo; Daimyō; 다이묘; Дайме; daimio; даимјо; daimyō; daimyo; Daimyo; Daimyō; दाईम्यो; Daimyō; daimjo; даимјо; daimiô; daimyo; Daimyô; daimyō; Daimyo; Daimyō; 大名; دایمیۆ; daimyo; داي-ميو; Daimyo; 大名; daimjó; Daimyō; Daimyo; dàimio; Daimyō; Daimyō; دایمیو; 大名; Daimyo; 大名; דאימיו; Daimyo; दाईम्यो; 大名; Daimio; Daimyo; Daimyo; டைமியோ; daimyō; Daimjo; Daimiô; Daimyo; ντάιμγιο; Daimyo; daimjo; Daimyo; Daimyo; Daymyo; ไดเมียว; Daimyō; daimjó; 大名; Daimyo; даймё; даймё; daimyo; Daymyo; Daimjó; daimyo; 大名; soberano feudal en Japón; titre de noblesse japonais; penguasa wilayah feudal yang berkuasa di pramoden Jepun; powerful feudal territorial lord in pre-modern Japan; Herrscher im feudalen Japan; senhor de terras no Japão feudal; ارباب و زمین‌دار بزرگ در دوران پیشامدرن ژاپن; 日本封建时代对一个较大地域领主的称呼; okrajni velikaš v japonski zgodovini; 日本の歴史上の封建領主; велможа во Феудална Јапонија; японський феодал; japansk länsherre under medeltiden; estro de daimiolando en feŭdisma Japanio; tittel på mektig leder i det før-moderne Japan; machtige feodale territoriale heer in het premoderne Japan; signore feudale giapponese; japanilainen lääninherra; Lãnh chúa phong kiến Nhật Bản; 일본의 봉건제에서의 영주; powerful feudal territorial lord in pre-modern Japan; تسمية كبار الزعماء الاقطاعيين في اليابان; japonský titul pro vysoce postaveného šlechtice; крупные феодалы средневековой Японии; элита самураев; Daimyo; Daimyô; Daimio; Daimyou; daimyō; daimyô; daïmio; Daimyo; Daimio; Dáimio; Daimyo; Daimió; Daimyō; Daimio; dàimios; daimyo; daimyō; 諸大名; 大名家; Daimyo; Daimio; Daimyou; Daimyo; Đại danh; daimyo; دای‌میو; دای میو; 戰國大名; 日本大名; Daimjo; Daimis; Daimyō; Daymio; Daymiyo; Daimio; Damyo; Даймио; Дайміо; Даймйо; Daimyō; Daimyo; Dajmio; Daimyou; Daimyōen; Daimyo; daimyō; daimyô; Daimyō; daimio; daimyō; Daimyo; Daimyo; Daimyio; Daymio; Daymo; Daimiyo; Daimyo; Daimyō; daimio; daimyō; Daimyo; دايميو; دائيم-يو; الدايميو; دائي-ميو; Dajmjó; Sengoku daimjó; Дайме; Даймиос
दाईम्यो 
powerful feudal territorial lord in pre-modern Japan
माध्यमे अपभारण करा
प्रकार
  • पद
  • noble title
उपवर्ग
  • lord
  • bushi
  • सैन्याधिकारी
स्थान
  • जपान
भाग
  • shugo daimyo
  • Sengoku daimyo
  • kinsei daimyō
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q61982
जीएनडी ओळखण: 4252219-5
एलसीसीएन ओळखण: sh85035427
बीएनएफ ओळखण: 119671858
एसयूडीओसी ओळखण: 027680835
एनडीएल ओळखण: 00561212
J9U ID: 987007540977705171
विकिडाटावर माहिती संपादित करा

दाईम्यो (大名) हे शक्तिशाली जपानी सत्ताधारी, सरंजामदार होते.[][] ज्यांनी १०व्या शतकापासून ते १९व्या शतकाच्या मध्यभागी मैजी कालखंडापर्यंत जपानवर राज्य केले. त्यांच्या विशाल, वंशपरंपरागत विभागलेल्या भूमीवर ते राज्य करत होते. ते शोगुन आणि नाममात्र सम्राट आणि कुगेच्या अधीन होते. दाइम्यो हा शब्द, दाई (大) म्हणजे "मोठा" आणि मायो म्हणजे मायोडेन (名田), म्हणजे "खाजगी जमीन" या दोन शब्दांपासून बनला आहे.[]

दाईम्योचा इतिहास फार मोठा आणि मनोरंजक आहे. याची सुरुवात मुरोमाची कालावधीतील शुगोपासून होते. ती इडो काळातील सेंगोकु पर्यंत पसरलेली आहे. दाईम्योची पार्श्वभूमीही बरीच वेगळी होती. काही दाईम्यो वंश, विशेषतः मोरी, शिमाझू आणि होसोकावा, इम्पीरियल घराण्याच्या धाकल्या पाती होत्या किंवा कुगेचे वंशज होते, तर इतर दाईम्यो यांना सामुराईच्या श्रेणीतून बढती देण्यात आली, विशेषतः एडो काळात.

दाईम्यो अनेकदा त्यांच्या जमिनीचे रक्षण करण्यासाठी सामुराईला कामावर ठेवत होते. या कामासाठी सामुराईंना ते जमीन किंवा अन्न मोबादला देत असत. त्याकाळी पैसे देणे तुलनेने महाग होते. स.न. १८७१ मध्ये प्रीफेक्चर प्रणालीचा अवलंब करून मेजी पुनर्संचयित झाल्यानंतर दाईम्यो युग संपुष्टात आले.

शुगो-दाइम्यो

[संपादन]
शिबा कुळातील शिबा योशिमासा. शुगो-दाईम्योंपैकी एक.

शुगो दाईम्यो (守護大名?) हा दाईम्यो ही पदवी धारण करणारा पुरुषांचा सर्वात पहिला गट होता. त्यांची सुरुवात मुरोमाची काळात शुगोपसून झाली. शुगो-दाईम्योने केवळ लष्करी आणि पोलीस शक्तीच नव्हे तर प्रांतात आर्थिक शक्ती देखील मिळवली होती. मुरोमाची कालावधीच्या पहिल्या दशकात त्यांनी ही ताकद जमवली होती.

प्रमुख शुगो-दाईम्यो हे शिबा, हाताकेयामा आणि होसोकावा कुळे तसेच यमाना, ओउची, ताकेडा आणि अकामात्सूच्या टोझामा कुळांमधून आले. यातील सर्वांत महान दाईम्योंनी अनेक प्रांतांवर राज्य केले होते.

आशिकागा शोगुनेटला शुगो-दाईम्योला क्योतोमध्ये ठेवण्याची आवश्यकता होती. म्हणून त्यांनी त्यांच्या मूळ प्रांतात त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नातेवाईक किंवा शुगोदाई नावाचे अनुचर नियुक्त केले. कालांतराने यांपैकी काही क्योतो येथे राहायला आले आणि त्यांना प्रांतांमध्ये डेप्युटी म्हणून नेमण्यात आले.

ओनिन युद्ध हा एक मोठा उठाव झाला होता. यात शुगो-दाईम्यो एकमेकांशी लढले. या आणि त्या काळातील इतर युद्धांदरम्यान, कुनी इक्की, किंवा प्रांतीय उठाव झाले. स्थानिक पातळीवरील शक्तिशाली योद्ध्यांनी शुगो-दाईम्योंपासून स्वातंत्र्य घेतले. प्रांतांमध्ये राहणा-या शुगो-दाईम्योच्या प्रतिनिधींनी त्यांची स्थिती मजबूत करण्याची संधी घेतली. पंधराव्या शतकाच्या अखेरीस, जे शुगो-दाईम्यो यशस्वी झाले ते सत्तेवर राहिले. जे लोक त्यांच्या डेप्युटींवर नियंत्रण ठेवण्यात अयशस्वी ठरले होते ते सत्तेतून खाली पडले आणि त्यांच्या जागी सेनगोकु-दाईम्यो या नवीन वर्गाने स्थान घेतले, जो शुगोदाई आणि जिझामुराई यांच्या गटातून निर्माण झाला होता.

सेंगोकू-दाईम्यो

[संपादन]

सेंगोकू दाईम्यो (戦国大名?) या गटात बरेच शुगो-दाईम्यो होते. या गटात सातके, इमागावा, ताकेडा, टोकी, रोक्काकू, ओउची आणि शिमाझू हे मोडतात. तर आसाकुरा, अमागो, नागाओ, मियोशी, चोसोकाबे, हातनो आणि ओडा हे दाईम्योच्या श्रेणीत नवीन होते. हे नवीन दाईम्यो शुगोदाई आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या श्रेणीतून आले. अतिरिक्त सेंगोकू दाईम्यो जसे मोरी, तमुरा, आणि र्युझोजि हे जिझामुराई मधून आले होते. शोगुनेट आणि रोनिन ( लेट होजो, सैतो ), प्रांतीय अधिकारी (किताबताके), आणि कुगे (तोसा इचिजो) यांच्या खालच्या अधिकाऱ्यांनीही सेन्गोकु-दाईम्योला जन्म दिला. 

एडो कालावधी

[संपादन]
कमेई कोरेमि, बकुमत्सु कालावधीतील एक दाईम्यो.

१६०० मधील सेकिगाहाराच्या लढाईने इडो कालावधीची सुरुवात झाली. शोगुन टोकुगावा इयासू यांनी अंदाजे २०० दाईम्योंना एकत्र केले आणि त्यांच्या प्रदेशाची पुनर्रचना केली. यासाठी हान प्रदेशाची संरचना केली होती. ती त्यात होणाऱ्या तांदूळ उत्पादनावर आधारीत होती. १०,००० कोकू (५०,००० बुशेल) किंवा त्याहून अधिक मुल्यांकन केलेल्या हान हेडिंगला दाईम्यो मानले जात असे. इयासूने सत्ताधारी टोकुगावा घराण्याशी असलेल्या त्यांच्या संबंधांनुसार दाईम्योचे वर्गीकरण देखील केले: शिनपान टोकुगावाशी संबंधित होते; फुडाई हे टोकुगावा किंवा युद्धातील मित्रपक्षांचे वारसदार होते; आणि टोझामाने युद्धापूर्वी टोकुगावाशी युती केली नव्हती. 

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. Daimyo. Britanica
  2. Katsuro, Hara (2009). An Introduction to the History of Japan. BiblioBazaar, LLC. p. 291. ISBN 978-1-110-78785-2.
  3. Kodansha Encyclopedia of Japan, entry for "daimyo"

 

बाह्य दुवे

[संपादन]