Jump to content

दहा लाखाहून जास्त लोकसंख्या असलेली भारतातील शहरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारत हा दक्षिण आशियातील एक देश आहे. भौगोलिक क्षेत्रानुसार हा सातवा क्रमांकाचा देश आहे.१.२ अब्ज लोकसंख्या असलेला हा लोकसंख्येप्रमाणे दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्या आहे. भारतामध्ये अठ्ठावीस राज्ये आणि नऊ केंद्रशासित प्रदेश आहेत.[] येथे जगातील १७.५% लोकसंख्या राहते .[]

ब्रिटिश भारतातील पहिली लोकसंख्या जनगणना १८७२ मध्ये झाली. १९५१ पासून दर दहा वर्षांनी भारतात जनगणना केली जाते.[] भारताच्या जनगणना गृह मंत्रालयांतर्गत भारताचे कुलसचिव (???) व जनगणना आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत केली जाते आणि हे काम केंद्र सरकार करीत असलेल्या सर्वात मोठ्या प्रशासकीय कामांपैकी एक आहे.[]

नवीनतम उपलब्ध आकडेवारी ही २०११ च्या खानेसुमारीवर आधारित आहे.[] भारतात ६,४१,००० गावे आहेत आणि एकूण लोकसंख्येपैकी ७२.२ टक्के लोकसंख्या या ग्रामीण भागात आहे. त्यापैकी १,४५,००० खेड्यांमध्ये प्रत्येकी ५०० ते ९९९ लोक राहतात; १,३०,०००  खेड्यांची लोकसंख्या दर खेड्यामागे १००० ते १९९९ च्या दरम्यान आहे; आणि १,२८,००० खेड्यांची लोकसंख्या प्रत्येकी २०० ते ४९९ आहे. ३,९६१ गावे अशी आहेत की ज्यांची लोकसंख्या गावी १०,००० व्यक्ती किंवा त्यांहून अधिक आहे [] भारताची २७.८ टक्के शहरी लोकसंख्या ५,१०० पेक्षा जास्त शहरांमध्ये आणि ३८०पेक्षा जास्त समपिण्डित(???) शहरांमध्ये राहते.[] १९९१-२००१ च्या दशकात लोकांनी ग्रामीण भागांतून मुख्य शहरांत स्थलांतर केल्याने शहरी लोकसंख्या झपाट्याने वाढली.[][] १९९१ ते २००१ या काळात शहरी भागात राहणाऱ्या भारतीयांची संख्या ३१.२% वाढली आहे. [] तरीही, २००१ मध्ये, ७०% पेक्षा जास्त लोक ग्रामीण भागांत राहात होते. [१०] [११] २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात दहा लाखाहून जास्त लोकसंख्या असलेली ४६ शहरे आहेत आणि मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथे १ कोटीहून अधिक लोक राहतात.

२०११ पर्यंत दशलक्ष किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेले भारतात ५३ संपिण्डित(???) शहरे आहेत ज्यात २००१ मध्ये ३५ होते. (असंबद्ध वाक्य!) भारताच्या शहरी लोकसंख्येपैकी सुमारे ४३ टक्के लोक या शहरांमध्ये राहतात.[१२][१३][१४]

सज्जा

[संपादन]

यादी

[संपादन]
क्र. शहर[a] राज्य/प्रदेश लोकसंख्या (२०११)[१६] लोकसंख्या (२००१) लोकसंख्या (१९९१)
मुंबई महाराष्ट्र १,८३,९४,९१२ १,६४,३४,३८६ १,२५,९६,२४३
दिल्ली दिल्ली १,६३,४९,८३१ १,२८,७७,४७० ८४,१९,०८४
कोलकाता पश्चिम बंगाल १,४०,५७,९९१ १,३२,०५,६९७ १,१०,२१,९१८
चेन्नई तमिळनाडू ८६,५३,५२१ ६५,६०,२४२ ५४,२१,९८५
बंगळूर कर्नाटक ८५,२०,४३५ ५७,०१,४४६ ४१,३०,२८८
हैदराबाद तेलंगणा ७६,७७,०१८ ५७,४२,०३६ ४३,४४,४३७
अहमदाबाद गुजरात ६३,५७,६९३ ४५,२५,०१३ ३३,१२,२१६
पुणे महाराष्ट्र ५०,५७,७०९ ३७,६०,६३६ २४,९३,९८७
सुरत गुजरात ४५,९१,२४६ २८,११,६१४ १५,१८,९५०
१० जयपूर राजस्थान ३०,४६,१६३ २३,२२,५७५ १५,१८,२३५
११ कानपूर उत्तर प्रदेश २९,२०,४९६ २७,१५,५५५ ,,०२९,८८९
१२ लखनौ उत्तर प्रदेश २९,०२,९२० २२,४५,५०९ १६,६९,२०४
१३ नागपूर महाराष्ट्र २४,९७,८७० २१,२९,५०० १६,६४,००६
१४ गाझियाबाद उत्तर प्रदेश २३,७५,८२० ९,६८,२५६ ५,११,७५९
१५ इंदूर मध्य प्रदेश २१,७०,२९५ १५,०६,०६२ ११,०९,०५६
१६ कोइंबतूर तमिळनाडू २१,३६,९१६ १४,६१,१३९ ११,००,७४६
१७ कोचीन केरळ २१,१९,७२४ १३,५५,९७२ ११,४०,६०५
१८ पाटणा बिहार २०,४९,१५६ १६,९७,९७६ १०,९९,६४७
१९ कोळिकोड केरळ २०,२८,३९९ ८,८०,२४७ ८,०१,१९०
२० भोपाळ मध्य प्रदेश १८,८६,१०० १४,५८,४१६ १०,६२,७७१
२१ तृशुर केरळ १८,६१,२६९ ३,३०,१२२ २,७५,०५३
२२ वडोदरा गुजरात १८,२२,२२१ १४,९१,०४५ ११,२६,८२४
२३ आग्रा उत्तर प्रदेश १७,६०,२८५ १३,३१,३३९ ९,४८,०६३
२४ विशाखापट्टणम आंध्र प्रदेश १७,२८,१२८ १३,४५,९३८ १०,५७,११८
२५ मलप्पुरम केरळ १६,९९,०६० १,७०,४०९ १,४२,२०४
२६ तिरुवनंतपुरम केरळ १६,७९,७५४ ८,८९,६३५ ८,२६,२२५
२७ कण्णुर केरळ १६,४०,९८६ ४,९८,२०७ ४,६३,९६२
२८ लुधियाना पंजाब १६,१८,८७९ १३,९८,४६७ १०,४२,७४०
२९ नाशिक महाराष्ट्र १५,६१,८०९ ११,५२,३२६ ७,२५,३४१
३० विजयवाडा आंध्र प्रदेश १४,७६,९३१ १०,३९,५१८ ८,४५,७५६
३१ मदुराई तमिळनाडू १४,६५,६२५ १२,०३,०९५ १०,८५,९१४
३२ वाराणसी उत्तर प्रदेश १४,३२,२८० १२,०३,९६१ १०,३०,८६३
३३ मेरठ उत्तर प्रदेश १४,२०,९०२ ११,६१,७१६ ८,४९,७९९
३४ फरीदाबाद हरियाणा १४,१४,०५० १०,५५,९३८ ६,१७,७१७
३५ राजकोट गुजरात १३,९०,६४० १०,०३,०१५ ६,५४,४९०
३६ जमशेदपूर झारखंड १३,३९,४३८ ११,०४,७१३ ८,२९,१७१
३७ श्रीनगर जम्मू आणि काश्मीर १२,६४,२०२ ९,८८,२१०
३८ जबलपूर मध्य प्रदेश १२,६८,८४८ १०,९८,००० ८,८८,९१६
३९ आसनसोल पश्चिम बंगाल १२,४३,४१४ १०,६७,३६९ ७,६३,९३९
४० वसई-विरार महाराष्ट्र १२,२२,३९०
४१ अलाहाबाद उत्तर प्रदेश १२,१२,३९५ १०,४२,२२९ ८,४४,५४६
४२ धनबाद झारखंड ११,९६,२१४ १०,६५,३२७ ८,१५,००५
४३ औरंगाबाद महाराष्ट्र ११,९३,१६७ ८,९२,४८३ ५,९२,७०९
४४ अमृतसर पंजाब प्रदेश ११,८३,५४९ १०,०३,९१९ ७,०८,८३५
४५ जोधपूर राजस्थान ११,३८,३०० ८,६०,८१८ ६,६६,२७९
४६ रांची झारखंड ११,२६,७४१ ८,६३,४९५ ६,१४,७९५
४७ रायपूर छत्तीसगढ ११,२३,५५८ ७,००,११३ ४,६२,६९४
४८ कोल्लम केरळ ११,१०,६६८ ३,८०,०९१ ३,६२,५७२
४९ ग्वाल्हेर मध्य प्रदेश ११,०२,८८४ ८,६५,५४८ ७,१७,७८०
५० भिलाई छत्तीसगढ १०,६४,२२२ ९,२७,८६४ ६,८५,४७४
५१ चंदिगढ चंदिगढ १०,२६,४५९ ८,०८,५१५ ५,७५,८२९
५२ तिरुचिरापल्ली तमिळनाडू १०,२२,५१८ ८,६६,३५४ ७,११,८६२
५३ कोटा राजस्थान १०,०१,६९४ ७,०३,१५० ५,३७,३७१

हेदेखील पहा

[संपादन]

नोट्स

[संपादन]
  1. ^ The population figures of cities in Kerala are inflated as the definition of urban agglomeration was revised in the 2011 census. The population of urban agglomerations in Kerala is not comparable with other cities in the country.[१५]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "States and union territories". Government of India (2001). Census of India. 27 January 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 January 2011 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Area and population". Government of India (2001). Census of India. 13 November 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 October 2008 रोजी पाहिले.
  3. ^ "Census Organisation of India". Government of India (2001). Census of India. 1 December 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 January 2012 रोजी पाहिले.
  4. ^ "Brief history of census". Government of India (2001). Census of India. 13 November 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 January 2012 रोजी पाहिले.
  5. ^ "Census 2011 Provisional Population Totals" (PDF). The Hindu. Chennai, India. 3 नोव्हेंबर 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF).
  6. ^ "Urban Agglomerations (UAs) & towns". Government of India (2001). Census of India. 13 November 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 December 2008 रोजी पाहिले.
  7. ^ Shinde, Swati (13 September 2008). "Migration rate to city will dip". Times of India. 11 January 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 December 2008 रोजी पाहिले.
  8. ^ "Develop towns to stop migration to urban areas: economist". Chennai, India: Hindu. 3 December 2005. 5 November 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 December 2008 रोजी पाहिले.
  9. ^ Garg 2005.
  10. ^ Dyson & Visaria 2005.
  11. ^ Ratna 2007.
  12. ^ "Urban Agglomerations/Cities having population 1 lakh and above" (PDF). Censusindia. The Registrar General & Census Commissioner, India. 13 November 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 18 October 2011 रोजी पाहिले.
  13. ^ "How India's cities have grown and shrunk over the last 116 years". 6 May 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  14. ^ Rukmini Shrinivasan; Hemali Chhapia. "Delhi topples Mumbai as maximum city". The Times of India. India: Bennett, Coleman & Co. Ltd. 17 December 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 February 2012 रोजी पाहिले.
  15. ^ "INDIA STATS : Million plus cities in India as per Census 2011". Press Information Bureau, Mumbai. National Informatics Centre (NIC). 30 June 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 February 2012 रोजी पाहिले.
  16. ^ "India: Major Agglomerations". citypopulation.de. 17 December 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 December 2014 रोजी पाहिले.

साचा:दहा लाखाहून जास्त लोकसंख्या असलेली भारतातील शहरे