दर्शना गुप्ता
दर्शना गुप्ता | |
---|---|
![]() | |
मृत्यू |
२६ मे, २०२३ फरीदाबाद |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पुरस्कार | नारी शक्ती पुरस्कार |
दर्शना गुप्ता ह्या एक भारतीय महिला होत्या ज्या सामूहिक विवाह आयोजित करण्यासाठी ओळखली जात असे. बनारसी दास गुप्ता फाउंडेशनच्या त्या सचिव होत्या. २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केले. गुप्ताने , ५०० जोडप्यांचे सामूहिक लग्न आयोजित केले होते. ही ती जोडपी होती ज्यांना पारंपारिक खर्चिक लग्न आणि हुंडा परवडत नसल्यामुळे विवाह करणे कठीण झाले होते. २६ मे २०२३ रोजी दर्शना गुप्ता फरीदाबाद येथील राहत्या घरी निधन झाले.[१]
जीवन
[संपादन]दर्शना यांचे बनारसी दास गुप्ता यांचा मुलगा अजय गुप्ता यांच्याशी लग्न झाले होते.[२] बनारसी दास गुप्ता यांचे २००७ मध्ये वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. ते काहीकाळ हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री होते.[३]
त्या वर्षी बनारसी दास गुप्ता फाउंडेशनची स्थापना अजय आणि दर्शना गुप्ता यांनी केली.[४][५] ही फाउंडेशन फरिदाबादमध्ये एक नोंदणीकृत विना अनुदानित संस्था असून या संस्थेचे अध्यक्ष अजय गुप्ता तर सचिव दर्शना गुप्ता हे होते.[६]

हे फाउंडेशन गरीब लोकांच्या लग्नाच्या समस्येवर काम करते. सर्वसामान्य माणूस पारंपारिकपणे महागड्या पद्धतीने आणि हुंड्याच्या देवाणघेवाणीने हतबल होत असतो. या परंपरांमुळे अनेक लोक जोडीदाराची इच्छा असूनही लग्न करू शकत नाहीत. या फाउंडेशनने अशा लोकांची शेकडो लग्ने आयोजित केली आहेत. पंचकुलामध्ये २५० जणांची सुरुवातीची तुकडी इतकी यशस्वी झाली की प्रादेशिक सरकारने प्रत्येक जोडप्याला $११,००० अनुदान देण्याचा निर्णय घेतला.[५]
गुप्ता ह्या अखिल भारतीय वैश्य महासंघाचे कार्यकारी सदस्य देखील होत्या.[७]
२०१९ मध्ये गुप्ता यांना तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.[८] हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय महिला दिनी प्रदान करण्यात आला. गुप्ता यांचे कौतुक करताना भारताचे तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "सामाजिक प्रेरणा" असे संबोधले.[९] गुप्ता यांनी जात, धर्म किंवा इतर कोणताही भेद न पाळता वंचितांसाठी ३,५०० हून अधिक विवाह आयोजित केल्याचे प्रशस्तिपत्रात नमूद केले आहे. थाटामाटात खर्चिक लग्न न केल्याने वाचवलेले पैसे म्हणजे त्या महिलांच्या शिक्षणासाठी किंवा व्यावसायिक प्रशिक्षणासाठीची सोय होय. कदाचित अशा महिला अविवाहित राहिल्यामुळे "सामाजिक बळी" देखील बनल्या असत्या.[५]
संदर्भ
[संपादन]- ^ "काॅलेज प्रबंधक समिति की अध्यक्ष दर्शना गुप्ता का निधन". दैनिक ट्रिब्यून. २७ मे २०२४. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Darshana Gupta 'Nari Shakti' from Bhiwani Haryana - YouTube". www.youtube.com. 2021-01-06 रोजी पाहिले.
- ^ "The Tribune, Chandigarh, India - Haryana". www.tribuneindia.com. 2021-01-06 रोजी पाहिले.
- ^ Staff (2007-08-20). "Aggarwal Samaj forms Sh Banarsi Dass Gupta Foundation". www.oneindia.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-06 रोजी पाहिले.
- ^ a b c "Citation for award by Ministry of WMD". Ministry of Women (Indian Government). 8 March 2019. 6 January 2021 रोजी पाहिले.
- ^ "BANARSI DASS GUPTA FOUNDATION NGO in Faridabad Haryana Address Contact details". Indian NGO list directory Database (इंग्रजी भाषेत). 2021-01-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-06 रोजी पाहिले.
- ^ "International Vaish Federation (IVF) | Home". www.vaishivf.com. 2021-01-06 रोजी पाहिले.
- ^ "Nari Shakti Puraskar - Gallery". narishaktipuraskar.wcd.gov.in. 2021-01-06 रोजी पाहिले.
- ^ "राष्ट्रीय नारी शक्ति पुरस्कार विजेता दर्शना गुप्ता की स्मृति में विशेष कार्यक्रम दिल्ली में आयोजित". prajatantranews.co.in. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]