दत्त पुराण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दत्त संप्रदायामध्ये प्रातःस्मरणीय परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती स्वामींचे नांव अत्यंत आदराने घेतले जाते. त्या वासुदेवानन्दसरस्वती स्वामींनी रचलेले दत्त पुराण हे एक आधुनिक पुराण आहे.

सनातन वैदिक धर्माचे मूळ म्हणजे वेद होय. वैदिक धर्मातून अनेक हिंदूंमधले अनेक पंथ, संप्रदाय, उपासना प्रकार निर्माण झाले हे सर्वविदित आहे. हे सर्व पंथ, संंप्रदाय आपली नाळ वेदांशी जोडलेली आहे असे प्रतिपादित करतात. दत्त संंप्रदायाच्या संबंधात प्रतिपादनाचे हे कार्य श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराजांनी केले आहे. कोणताही हिंदू संंप्रदाय हा सामान्यतः वेद-स्मृती-आगम-पुराण-संंप्रदाय किंवा पंथ या क्रमाने युक्त असतो. दत्त संंप्रदायाच्या बाबतीत बोलावयाचे झाल्यास वेदांमध्ये दत्तसूक्त आढळत नाही. कारण वेदांंमध्ये असलेल्या सूक्तांंमध्ये दत्त या देवतेचा उल्लेखच नाही. वैदिक काळात उदयाला अलेली ही देवता नसल्याने दत्त आगमही नाही. मग हा संंप्रदाय वेदप्रणीत अथवा वेदमूलक व्हावा यासाठी स्वामींनी दत्तपुराणाची रचना केली.. कारण –
वेदाः प्रतिष्ठिताः सर्वे पुराणे नात्र संशयः |
यन्न दृष्टं हि वेदेषु तत्सर्वं लक्ष्यते स्मृतौ |
उभयोर्यन्न दृष्टं हि तत्पुराणै: प्रणीयते || २/१२/१८(??)
नारदपुराण असेही सांगते की जे वेद आणि स्मृतींमध्ये दृग्गोचर होत नाही, ते पुराणांमध्ये दिसते; त्याचे प्रतिपादन पुराणे करतात. यावरून श्रुती, स्मृती यांच्या बरोबरीचे अथवा यांच्यासह पुराणे मिळून धर्माची रचना किंवा त्याचे प्रतिपादन केले जाते. पूजेच्या वेळी केला जाणारा संकल्पही याची पुष्टी करतो.V श्रुतीस्मृतीपुराणोक्तफलप्राप्त्यर्थम् ... असे धर्मविधींंच्या प्रारंंभीही संंकल्पात म्हटले जाते.V कदाचित् याच कारणामुळे स्वामींनी दत्त संंप्रदायाला वेदमूलकत्व देण्यासाठी खास दत्तपुराण ग्रंथाची रचना केली. या एका रचनेमुळे दत्तसंंप्रदाय वेदप्रणीत झाला आणि म्हणून धर्मही झाला असे मानले जाते.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]