Jump to content

दक्षिण शाहबाद लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दक्षिण शाहबाद लोकसभा मतदारसंघ हा भारतातील संसदेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेच्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ होता. सदर मतदारसंघ हा १९५२ ते १९५७ सालापर्यंत अस्तित्वात होता. दक्षिण शाहबाद मतदारसंघ बिहार राज्याचा मतदारसंघ होता. १९५७ सालच्या परिसिमनद्वारे हा मतदारसंघ रद्द करून सासाराम लोकसभा मतदारसंघात विलीन करण्यात आला.

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसिमन आदेश, १९५१ प्रमाणे दक्षिण शाहबाद लोकसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होता :

  • शाहबाद जिल्हा : शाहबाद सदर उप-विभागातील जगदीशपूर, पिरो आणि तरारी ठाणी, भबुआ उप-विभाग (रामगढ ठाणं वगळून) आणि सासाराम उपविभाग

दक्षिण शाहबाद मतदारसंघातून निवडून आलेले खासदार

[संपादन]
वर्ष खासदार पक्ष
बिहार राज्य
१९५२[n १] राम सुभग सिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जगजीवन राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९५७ नंतर मतदारसंघ बरखास्त
१९५७ नंतर पहा: सासाराम लोकसभा मतदारसंघ

निवडणूक निकाल

[संपादन]

१९५२ लोकसभा निवडणूक

[संपादन]
  • सदर निवडणूकीत या मतदारसंघामधून दोन खासदार निवडले गेले. एक खुल्या प्रवर्गातून तर एक आरक्षित प्रवर्गातून.
१९५२ लोकसभा निवडणूक : दक्षिण शाहबाद लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राम सुभग सिंग (अनुसुचित जाती प्रवर्ग) १,१४,९८८ १९.६७% ‌−
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जगजीवन राम (खुला प्रवर्ग‌) १,११,५२४ १९.०७%
समाजवादी पक्ष (भारत) राधा मोहन सिंह ७४,०७४ १२.६७% ‌−
समाजवादी पक्ष (भारत) छट्टु दुसध ६२,६९७ १०.७२% ‌−
अपक्ष शिवपूजन सिंह ४५,०९३ ७.७१% ‌−
अपक्ष दुर्गाप्रसाद पांडे ३७,८६८ ६.४८% ‌−
अपक्ष जगदीश नारायण रे ३६,६०१ ६.२६% ‌−
अखिल भारतीय राम राज्य परिषद पी.आर. ठाकूर ३०,४५९ ५.२१% ‌−
अखिल भारतीय राम राज्य परिषद राजबन्स सहाय २९,०४७ ४.९७% ‌−
अपक्ष बुधन राय वर्मा २३,३२१ ३.९९% ‌−
किसान मजदूर प्रजा पक्ष बद्री नारायण शर्मा १९,०१७ ३.२५% ‌−
नोंदणीकृत मतदार ६,९७,८९६ -
झालेले मतदान ५,८४,६८९ ४१.८९%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने दोन्ही दोन्ही जागा जिंकल्या (नवीन जागा) उलटफेर

नोंदी

[संपादन]
  1. द्विसदस्यीय जागा.