Jump to content

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२५–२६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा २०२५–२६
पाकिस्तान
दक्षिण आफ्रिका
तारीख १२ ऑक्टोबर – ८ नोव्हेंबर २०२५
संघनायक शान मसूद (कसोटी)
शाहीन आफ्रिदी(आं.ए.दि.)
सलमान अली आगा (आं.टी२०)
एडन मार्करम (कसोटी)
मॅथ्यू ब्रीट्झके (आं.ए.दि.)
डोनोव्हन फरेरा (आं.टी२०)
कसोटी मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा सलमान अली आगा (१७०)
शान मसूद (१७०)
टोनी डी झॉर्झी (१७५)
सर्वाधिक बळी नौमन अली (१४) सायमन हार्मर (१३)
मालिकावीर सेनुरन मुथुसामी (द)
एकदिवसीय मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा सैम अयुब (१६९) क्विंटन डी कॉक (२३९)
सर्वाधिक बळी अबरार अहमद (७) नांद्रे बर्गर (५)
मालिकावीर क्विंटन डी कॉक (द)
२०-२० मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा सैम अयुब (१०८) रीझा हेंड्रिक्स (९४)
सर्वाधिक बळी फहीम अशरफ (६) कॉर्बिन बॉश (७)
मालिकावीर फहीम अशरफ (पा)

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ सध्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२५ दरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करत आहे.[][] या दौऱ्यावर दोन कसोटी, तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांचा समावेश आहे.[][]

कसोटी मालिका २०२५-२०२७ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग होती.[] सप्टेंबर २०२५ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) दौऱ्याच्या वेळापत्रकाची पुष्टी केली.[]

दोन्ही संघांसाठी ही मालिका २०२५-२०२७ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमधील पहिलीच मालिका होती. पहिल्या कसोटीमध्ये ९३ धावांनी पराभव स्वीकारल्यानंतर, केशव महाराजच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला आणि कसोटी मालिका १–१ अशा बरोबरीत सुटली.

पहिल्या कसोटीदरम्यान पाकिस्तानच्या आसिफ आफ्रिदीने कसोटी पदार्पण केले. पाकिस्तानसाठी कसोटी पदार्पण करणारा तो तिसरा सर्वात वयस्कर खेळाडू होता. त्याने पदार्पणातच बळींचे पंचक घेतले.

टी२० मालिकेमध्ये पहिल्या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानने उर्वरित दोन सामन्यांमध्ये सहज विजय मिळवत मालिका २–१ ने खिशात टाकली. डोनोव्हन फरेराची दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार म्हणून पहिलीच आंतरराष्ट्रीय टी२० मालिका होती.

एकदिवसीय मालिकेमध्ये दोन सामन्यामध्ये १-१ अशा बरोबरीनंतर, शेवटच्या निर्णायक सामना अगदी एकतर्फी झाला. पाकिस्तानने सामन्यात ७ गडी राखून सहज विजय मिळवला आणि मालिका २-१ अशी जिंकली. मॅथ्यू ब्रीट्झकेची दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार म्हणून ही पहिलीच एकदिवसीय मालिका होती.

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
कसोटी[] आं.ए.दि.[] आं.टी२०[] कसोटी[१०] आं.ए.दि.[११] आं.टी२०[१२]

९ ऑक्टोबर रोजी, क्वेना मफाकाला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे दौऱ्यातून वगळण्यात आले आणि त्यांच्या जागी टी२० संघात ओटनील बार्टमन आणि एकदिवसीय संघात लिझाद विल्यम्स यांना स्थान देण्यात आले.[१३][१४] २३ ऑक्टोबर रोजी, डेव्हिड मिलर (हॅमस्ट्रिंग स्ट्रेन) आणि जेराल्ड कोएत्झी (पेक्टोरल स्नायू दुखापत) यांना एकदिवसीय आणि टी२० संघातून बाहेर काढण्यात आले आणि त्यांच्या जागी टोनी डी झॉर्झी आणि मॅथ्यू ब्रीट्झकेला टी२० मध्ये आणि ओटनील बार्टमनला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले.[१५] डोनोव्हन फरेराला टी२० मालिकेसाठी कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले.[१६] ४ नोव्हेंबर रोजी खांद्याच्या स्नायूला दुखापत झाल्यामुळे डेवाल्ड ब्रेव्हिसला एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आले.[१७]

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
१२–१५ ऑक्टोबर २०२५
धावफलक
वि
३७८ (११०.४ षटके)
सलमान अली आगा ९३ (१४५)
सेनुरन मुथुसामी ६/११७ (३२षटके)
२६९ (८४ षटके)
टोनी डी झॉर्झी १०४ (१७१)
नौमन अली ६/११२ (३५ षटके)
१६७ (४६.१ षटके)
बाबर आझम ४२ (७२)
सेनुरन मुथुसामी ५/५७ (१७ षटके)
१८३ (६०.५ षटके)
डेवाल्ड ब्रेव्हिस ५४ (५४)
शाहीन आफ्रिदी ४/३३ (८.५ षटके)
पाकिस्तान ९३ धावांनी विजयी
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
पंच: क्रिस ब्राउन (न्यू) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: नौमन अली (पा)
  • पाकिस्तान नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • सेनुरन मुथुसामी (द आ) कसोटी कारकिर्दीतील पहिल्यांदाच डावात पाच बळी तर सामन्यात दहा बळी घेतले.[१८][१९]
  • एडन मार्करमने (द आ) कसोटी कारकिर्दीतील ३,००० धावा पूर्ण केल्या.[२०][२१]
  • विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: पाकिस्तान १२, दक्षिण आफ्रिका ०.

२री कसोटी

[संपादन]
२०–२३ ऑक्टोबर २०२५
धावफलक
वि
३३३ (११३.४ षटके)
शान मसूद ८७ (१७६)
केशव महाराज ७/१०२(४२.४ षटके)
४०४ (११९.३ षटके)
सेनुरन मुथुसामी ८९* (१५५)
आसिफ आफ्रिदी ६/७९ (३४.३ षटके)
१३८ (४९.३ षटके)
बाबर आझम ५० (८७)
सायमन हार्मर ६/५० (२० षटके)
७३/२ (१२.३ षटके)
एडन मार्करम ४२ (४५)
नौमन अली २/४० (६ षटके)
दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
पंच: क्रिस ब्राउन (न्यू) आणि शारफुदौला (बां)
सामनावीर: केशव महाराज (द)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ३८ वर्षे आणि २९९ दिवसांचा आसिफ आफ्रिदी, मिरान बक्ष (४७ वर्षे २८४ दिवस) आणि अमीर इलाही (४४ वर्षे आणि ४५ दिवस) नंतर पाकिस्तानसाठी कसोटी पदार्पण करणारा तिसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला,[२२] आणि कसोटीत त्याने पहिल्यांदाच पाच बळी घेतले, पदार्पणातच असा विक्रम करणारा तो सर्वात वयस्कर गोलंदाज ठरला.[२३]
  • सायमन हार्मरने (द आ) कसोटीत पहिल्यांदाच पाच बळी घेतले.[२४]
  • विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: दक्षिण आफ्रिका १२, पाकिस्तान ०.

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

[संपादन]

१ला आं.टी२० सामना

[संपादन]
२८ ऑक्टोबर २०२५
२०:०० (रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१९४/९ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३९ (१८.१ षटके)
सैम अयुब ३७ (२८)
कॉर्बिन बॉश ४/१४ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका ५५ धावांनी विजयी
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
पंच: राशिद रियाझ (पा) आणि आसिफ याकूब (पा)
सामनावीर: जॉर्ज लिंडे, (द)

२रा आं.टी२० सामना

[संपादन]
३१ ऑक्टोबर २०२५
२०:०० (रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
११० (१९.२ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
११२/१ (१३.१ षटके)
डेवाल्ड ब्रेव्हिस २५ (१६)
फहीम अशरफ ४/२३ (३.२ षटके)
सैम अयुब ७१* (३८)
कॉर्बिन बॉश १/१७ (२ षटके)
पाकिस्तान ९ गडी राखून विजयी
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
पंच: राशिद रियाझ (पा) आणि आसिफ याकूब (पा)
सामनावीर: सलमान मिर्झा (पा)

३रा आं.टी२० सामना

[संपादन]
१ नोव्हेंबर २०२५
२०:०० (रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१३९/९ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१४०/६ (१९ षटके)
बाबर आझम ६८ (४७)
कॉर्बिन बॉश २/२४ (४ षटके)
पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
पंच: राशिद रियाझ (पा) आणि फैसल अफ्रिदी (पा)
सामनावीर: बाबर आझम (Pak)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • उस्मान तारिकने (पा) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला आं.ए.दि. सामना

[संपादन]
४ नोव्हेंबर २०२५
१४:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२६३ (४९.१ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२६४/८ (४९.४ षटके)
क्विंटन डी कॉक ६३ (७१)
नसीम शाह ३/४० (९.१ षटके)
सलमान अली आगा ६२ (७१)
कॉर्बिन बॉश २/३२ (६.४ षटके)
पाकिस्तान २ गडी राखून विजयी
इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद
पंच: शारफुदौला (बां) आणि आसिफ याकूब (पा)
सामनावीर: सलमान अली आगा (पा)

२रा आं.ए.दि. सामना

[संपादन]
६ नोव्हेंबर २०२५
१४:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२६९/९ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२७०/२ (४०.१ षटके)
सलमान अली आगा ६९ (१०६)
नांद्रे बर्गर ४/४६ (१० षटके)
क्विंटन डी कॉक १२३* (११९)
फहीम अशरफ १/४० (६ षटके)
दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी
इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद
पंच: अहसान रझा (पा) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: क्विंटन डी कॉक (द)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलदांजीचा निर्णय घेतला

३रा आं.ए.दि. सामना

[संपादन]
८ नोव्हेंबर २०२५
१४:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१४३ (३७.५ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१४४/३ (२५.१ षटके)
क्विंटन डी कॉक ५३ (७०)
अबरार अहमद ४/२७ (१० षटके)
सैम अयुब ७७ (७०)
नांद्रे बर्गर १/२९ (५ षटके)
पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद
पंच: फैसल अफ्रिदी (पा) आणि शारफुदौला (बां)
सामनावीर: अबरार अहमद (पा)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • रुबिन हर्मनने (द) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • क्विंटन डी कॉकने (द) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकीर्दीतील ७,००० धावा पूर्ण केल्या.[२७][२८]
  • बाबर आझम (पा) ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५,००० धावा पूर्ण केल्या.[२९]

नोंदी

[संपादन]
  1. ^ फक्त दुसऱ्या कसोटीसाठी संघात समावेश.

संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ "Pakistan to host South Africa for WTC27, white-ball series" [विश्व कसोटी अजिंक्यपद २०२७, व्हाईट-बॉल मालिकेसाठी पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद भूषवणार]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  2. ^ "SA to open WTC 2025-27 campaign against Pakistan at Gadaffi Stadium in October" [दक्षिण आफ्रिका ऑक्टोबरमध्ये गद्दाफी स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद २०२५-२७ मोहिमेची सुरुवात करणार]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  3. ^ "Men's Future Tours Program" [पुरुषांचे भविष्यातील दौरे कार्यक्रम] (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 2022-12-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  4. ^ "South Africa's defence of WTC mace begins at Lahore" [दक्षिण आफ्रिकेचा विश्व कसोटी अजिंक्यपद गदा बचाव लाहोरमध्ये सुरू]. क्रिकबझ्झ. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  5. ^ "Pakistan to host South Africa for ICC World Test Championship 2025-27" [२०२५-२७ च्या आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद भूषवणार.]. द नेशन (पाकिस्तान)]]. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  6. ^ "Pakistan to host South Africa for ICC World Test Championship 2025-27 from 12 October" [१२ ऑक्टोबरपासून आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२७ साठी पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद भूषवणार.]. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  7. ^ "18-member squad announced for South Africa Test series" [दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेसाठी १८ सदस्यीय संघाची घोषणा]. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  8. ^ "Pakistan squads announced for white-ball series" [पांढऱ्या चेंडूच्या मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा]. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  9. ^ "Key players return as Pakistan name strong white-ball squads" [प्रमुख खेळाडूंचे पुनरागमन, पाकिस्तानचा पांढऱ्या चेंडूचा मजबूत संघ जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  10. ^ "Proteas Men's Squads Announced For Pakistan Tour And Namibia T20I" [पाकिस्तान दौरा आणि नामिबिया टी२० साठी प्रोटीज पुरुष संघाची घोषणा]. क्रिकेट दक्षिण आफ्रिका. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  11. ^ "Bavuma out of Pakistan Tests; De Kock reverses ODI retirement" [बावुमा पाकिस्तान कसोटीतून बाहेर; डी कॉक एकदिवसीय निवृत्ती मागे घेतो]. क्रिकबझ्झ. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  12. ^ "Proteas star reverses retirement, returns for Pakistan tour" [प्रोटीज स्टार खेळाडू निवृत्ती मागे घेत पाकिस्तान दौऱ्यासाठी परतला]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  13. ^ "Maphaka ruled out of Namibia T20I and Pakistan ODIs with hamstring injury" [स्नायूंच्या दुखापतीमुळे माफाका नामिबिया टी-२० आणि पाकिस्तान एकदिवसीय सामन्यांमधून बाहेर]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  14. ^ "Maphaka ruled out despite initial 'clean scan'" [सुरुवातीच्या 'क्लीन स्कॅन'नंतरही माफाका बाहेर]. क्रिकबझ्झ. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  15. ^ "Miller, Coetzee ruled out of Pakistan series" [मिलर, कोएत्झी पाकिस्तान मालिकेतून बाहेर]. क्रिकबझ्झ. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  16. ^ "Miller ruled out of Pakistan T20Is; Coetzee to miss white-ball leg" [मिलर पाकिस्तान टी२० मालिकेतून बाहेर; कोएत्झी व्हाईट-बॉल मालिकेला मुकणार]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  17. ^ "Injured Dewald Brevis ruled out of ODI series against Pakistan" [दुखापतग्रस्त डेवाल्ड ब्रेव्हिस पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  18. ^ "Senuran Muthusamy makes Pakistan batters dance to his tune with maiden five-wicket haul in 1st Test" [पहिल्या कसोटीत पाच बळी घेऊन सेनुरन मुथुसामीने पाकिस्तानी फलंदाजांना त्याच्या तालावर नाचायला लावले.]. इंडिया टीव्ही. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  19. ^ "PAK vs SA, 1st Test: Spinners run riot as match approaches tense conclusion" [पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिली कसोटी: सामना संपण्याच्या जवळ येताच फिरकीपटूंनी जोरदार धावा काढल्या.]. स्पोर्टस्टार. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  20. ^ "Aiden Markram achieves major landmark in Test cricket" [एडन मार्करामने कसोटी क्रिकेटमध्ये गाठला एक महत्त्वाचा टप्पा]. जिओ सुपर. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  21. ^ "Aiden Markram achieves major milestone in first Pakistan Test" [पहिल्या पाकिस्तान कसोटीत एडन मार्करमने गाठला मोठा टप्पा]. ए स्पोर्ट्स. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  22. ^ "38 Years And 299 Days! Asif Afridi Becomes 3rd Oldest Cricketer To Make Test Debut For Pakistan" [३८ वर्षे आणि २९९ दिवस! आसिफ आफ्रिदी पाकिस्तानसाठी कसोटी पदार्पण करणारा तिसरा सर्वात वयस्कर क्रिकेटपटू ठरला.]. News18. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  23. ^ "PAK vs SA: Asif Afridi , 38, becomes oldest to take 5-wicket haul on Test debut" [पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका: ३८ वर्षीय आसिफ आफ्रिदी ठरला पदार्पणात ५ बळी घेणारा सर्वात वयस्कर खेळाडू]. इंडिया टुडे. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  24. ^ "1,000 first-class wickets: South Africa spinner joins Proteas greats after maiden Test five-for" [१,००० प्रथम श्रेणी बळी: पहिल्या कसोटी सामन्यात पाच बळी घेत दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज प्रोटीयाच्या महान खेळाडूंमध्ये सामील]. विस्डेन. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  25. ^ "Babar Azam becomes T20I's all-time leading run-scorer as Pakistan crush South Africa" [दक्षिण आफ्रिका पाकिस्तानकडून पराभूत, बाबर आझम बनला टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज]. दुनिया न्यूज. २ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  26. ^ "Babar 68, Shaheen three-for headline Pakistan's 2-1 series win" [बाबरच्या ६८ धावा आणि शाहीनचे ३ बळी. पाकिस्तानचा २-१ मालिका विजय]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  27. ^ "Quinton de Kock enters elite list of fastest to 7,000 ODI runs" [सर्वात जलद ७००० एकदिवसीय धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत क्विंटन डी कॉकचा समावेश]. वन क्रिकेट. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  28. ^ "Quinton de Kock becomes 5th SA player to complete 7,000 runs in ODIs" [क्विंटन डी कॉक एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७००० धावा पूर्ण करणारा दक्षिण आफ्रिकेचा पाचवा खेळाडू बनला.]. द ट्रीब्यून (इंडिया). १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  29. ^ "Babar Azam completes 15,000 international runs" [बाबर आझमने पूर्ण केल्या १५,००० आंतरराष्ट्रीय धावा]. बिझनेस रेकॉर्डर. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]