दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२५
| दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२५ | |||||
| तारीख | २८ जून – १० जुलै २०२५ | ||||
| संघनायक | क्रेग अर्व्हाइन | केशव महाराज (१ली कसोटी) वियान मल्डर (२री कसोटी) | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | शॉन विल्यम्स (२५७) | वियान मल्डर (५३१) | |||
| सर्वाधिक बळी | तनाका चिवंगा (८) | कॉर्बिन बॉश (१०) कोडी युसूफ (१०) | |||
| मालिकावीर | वियान मल्डर (द) | ||||
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जून आणि जुलै २०२५ मध्ये झिम्बाब्वे क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला.[१][२] या दौऱ्यावर दोन कसोटी सामने खेळविले गेले, त्यानंतर न्यू झीलंडचा समावेश असलेली तिरंगी टी२० मालिकाही होती.[३][४] मार्च २०२५ मध्ये, झिम्बाब्वे क्रिकेटने २०२५ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.[५]
संघ
[संपादन]२० जून रोजी, टेंबा बावुमाला हॅमस्ट्रिंग स्ट्रेनमुळे मालिकेतून बाहेर काढण्यात आले,[८] आणि केशव महाराजला कर्णधार म्हणून निवडण्यात आले.[९] २ जुलै रोजी, केशव महाराजला कंबरेच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर काढण्यात आले आणि त्यांच्या जागी सेनुरन मुथुसामीची निवड करण्यात आली आणि वियान मल्डरला कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. [१०] पहिल्या कसोटीत प्रभावी कामगिरी करणाऱ्या वेगवान गोलंदाजांना पुढील संधी देण्यासाठी संघात आधी समाविष्ट केलेल्या लुंगी न्गिदीलाही वगळण्यात आले.[११]
५ जुलै रोजी, दुखापतीमुळे प्रिन्स मस्वौरेला दुसऱ्या कसोटीतून बाहेर काढण्यात आले, त्याच्या जागी डीयोन मायर्सची निवड करण्यात आली.[ संदर्भ हवा ]
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२८ जून – १ जुलै २०२५
धावफलक |
वि
|
||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- डेवाल्ड ब्रेव्हिस, लुआन-ड्रे प्रिटोरियस आणि कोडी युसूफ (द आ) ह्या सर्वानी कसोटी पदार्पण केले.
- केशव महाराजने (द आ) पहिल्यांदाच कसोटीत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले.[१२]
- लुआन-ड्रे प्रिटोरियसने (द आ) कसोटीत त्यांचे पहिले शतक झळकावले. तसेच तो कसोटी शतक झळकावणारा सर्वात तरुण दक्षिण आफ्रिकी तर १५० धावा करणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला.[१३]
- कॉर्बिन बॉशने (द आ) कसोटीत त्याचे पहिले शतक झळकावले[१४]
- केशव महाराजने (द आ) कसोटीत त्याचा २०० वा बळी घेतला आणि हा टप्पा गाठणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला फिरकी गोलंदाज ठरला.[१५][१६]
- कॉर्बिन बॉशने (द आ) यांनी कसोटीत पहिल्यांदाच पाच बळी घेतले. [१७]
२री कसोटी
[संपादन]६–८ जुलै २०२५
धावफलक |
वि
|
||
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- कुंदाई मतिगीमू (झि), लेसेगो सेनोक्वेन आणि प्रीनेलन सब्रायेन (द आ) ह्या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- वियान मल्डरने (द आ) पहिल्यांदाच कसोटीत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले.[१८]
- वियान मल्डरने (द आ) कसोटीतील पहिले त्रिशतक झळकावले आणि दक्षिण आफ्रिकेकडून कसोटीत सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा हाशिम अमलाचा (३११*) विक्रम मोडला.[१९]
- वियान मल्डरने (द आ) कसोटी कारकिर्दीतील १००० धावा पूर्ण केल्या.[२०]
नोंदी
[संपादन]संदर्भयादी
[संपादन]- ^ "Zimbabwe to host South Africa and New Zealand for Tests and T20I tri-series" [झिम्बाब्वे कसोटी आणि टी२० तिरंगी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे यजमानपद भूषवणार आहे.]. क्रिकबझ्झ. २२ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe to host South Africa and New Zealand in multi-format contest" [झिम्बाब्वे बहु-स्वरूपातील स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे यजमानपद भूषवणार]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २२ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe to host South Africa and New Zealand for Tests and T20Is in bumper summer" [उन्हाळ्यात झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडसोबत कसोटी आणि टी-२० सामन्यांचे आयोजन करणार.]. एसपीएन क्रिकइन्फो. २२ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Men's Future Tours Programme" [पुरुषांचा भविष्यातील दौरा कार्यक्रम] (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 2022-12-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २२ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe to host SA, New Zealand for Tests, T20I tri-series" [झिम्बाब्वे कसोटी, टी२० तिरंगी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे यजमानपद भूषवणार.]. झिम्बाब्वे क्रिकेट. २२ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe name Test squad to face world champions South Africa" [विश्वविजेत्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी झिम्बाब्वेचा संघ जाहीर]. झिम्बाब्वे क्रिकेट. २२ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Proteas Men's Squad Announced For Test Series Against Zimbabwe" [झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघाची घोषणा]. क्रिकेट दक्षिण आफ्रिका. 2025-06-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २२ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bavuma ruled out of Zimbabwe Test Series" [बावुमा झिम्बाब्वे कसोटी मालिकेतून बाहेर]. क्रिकेट दक्षिण आफ्रिका. 2025-06-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २२ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Injured Bavuma out of Zimbabwe Tests, Maharaj named captain" [दुखापतग्रस्त बावुमा झिम्बाब्वे कसोटीतून बाहेर, महाराज कर्णधार]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २२ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Maharaj ruled out of second Zimbabwe Test, Mulder to captain South Africa" [महाराज दुसऱ्या झिम्बाब्वे कसोटीतून बाहेर, दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व मल्डरकडे]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २२ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "New captain for South Africa following Maharaj injury" [महाराजच्या दुखापतीनंतर दक्षिण आफ्रिकेचा नवा कर्णधार]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २२ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Calculating but caring: Keshav Maharaj backed as Test captain for first time" [कॅल्क्युलेटिंग बट केअरिंग: केशव महाराजची कसोटी कर्णधार म्हणून पहिल्यांदाच निवड]. द सिटीझन. २२ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Who is Lhuan Dre Pretorius? Meet 19-yr-old batsman who smashed Test ton on debut for South Africa against Zimbabwe" [लुआन-ड्रे प्रिटोरियस कोण आहे? भेटा झिम्बाब्वेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेसाठी पदार्पणातच शतक ठोकणाऱ्या १९ वर्षीय फलंदाजाला]. द इकॉनॉमिक टाइम्स. २२ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "ZIM vs SA: Corbin Bosch Scores Maiden Test Century" [झिम्बाब्वे वि दक्षिण आफ्रिका: कॉर्बिन बॉशने ठोकले पहिले कसोटी शतक]. रेव्हस्पोर्ट्झ. २२ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Maharaj becomes first South Africa spinner to take 200 Test wickets" [२०० कसोटी विकेट्स घेणारा महाराज दक्षिण आफ्रिकेचा पहिला फिरकी गोलंदाज ठरला.]. डेक्कन हेराल्ड. २२ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Keshav Maharaj Becomes First Proteas Spinner To Bag 200 Test Scalps" [२०० कसोटी विकेट घेणारा, केशव महाराज ठरला पहिला प्रोटीज स्पिनर]. Cricketnmore. २२ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bosch leads South Africa to 328-run win over Zimbabwe" [बॉशमुळे दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर ३२८ धावांनी विजय]. रॉयटर्स. २२ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Wiaan Mulder becomes SA's 18th Test captain since 1992 – FULL list" [१९९२ नंतर वियान मल्डर दक्षिण आफ्रिकेचा १८ वा कसोटी कर्णधार बनला - संपूर्ण यादी]. Club Cricket SA. २२ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Wiaan Mulder becomes second South African to score triple century in Test cricket" [विआन मल्डर कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा दुसरा दक्षिण आफ्रिकी खेळाडू ठरला.]. स्पोर्टस्टार. २२ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Who Is Wiaan Mulder? South Africa Captain Who Did Not Break Brian Lara's Record, Declared His Innings On 367" [कोण आहे वियान मोल्डर? ब्रायन लाराचा विक्रम मोडू न शकलेला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार, ३६७ धावांवर डाव घोषित केला]. Times Now. २२ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.

