थॉमस हिस्लॉप
Appearance
सर थॉमस हिस्लॉप, पहिला बॅरोनेट (५ जुलै, १७६४ – ३ मे, १८४३) हे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीचे एक वरिष्ठ ब्रिटिश सैन्य अधिकारी होते. यांनी ब्रिटिश वसाहतींमधील लष्करी मोहिमांमध्ये भाग घेतला होता. हिस्लॉपने १७९६ ते १८१० दरम्यान वेस्ट इंडीजमध्ये आणि त्यानंतर भारतात लढाया केल्या. तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धादरम्यान वरिष्ठ सेनापती असलेल्या हिस्लॉपच्या कामगिरीचे कौतुक झाले असले तरी मराठा साम्राज्याच्या सैन्याविरुद्ध त्यांनी अनेक अत्याचार गेले. तलनार येथील ३०० युद्धबंदींना ठार मारल्याबद्दल त्यांच्यावर ब्रिटिश संसदेत टीका झाली. हिस्लॉपने अनेक गुंतवणुकींमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा घालवला. विशेषतः अमेरिकेत अनेक ठिकाणी त्यांनी अशा तोट्यातील गुंतवणूक केली होती.