Jump to content

थेरीसा मे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(थेरेसा मे या पानावरून पुनर्निर्देशित)
थेरीसा मे

Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डमची ७६वी पंतप्रधान
कार्यकाळ
१३ जुलै, २०१६ – २४ जुलै, २०१९
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील डेव्हिड कॅमेरॉन
पुढील बोरिस जॉन्सन

हुजूर पक्षाची पक्षाध्यक्ष
कार्यकाळ
११ जुलै २०१६ – २३ जुलै, २०१९
मागील डेव्हिड कॅमेरॉन
पुढील बोरिस जॉन्सन

ब्रिटनची गृह सचिव
कार्यकाळ
१२ मे २०१० – १३ जुलै २०१६
पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन
मागील ॲलन जॉन्सन
पुढील ॲम्बर रूड

विद्यमान
पदग्रहण
१ मे १९९७

जन्म १ ऑक्टोबर, १९५६ (1956-10-01) (वय: ६८)
ईस्टबोर्न, ईस्ट ससेक्स, इंग्लंड
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
राजकीय पक्ष हुजूर पक्ष
निवास १० डाउनिंग स्ट्रीट
गुरुकुल ऑक्सफर्ड विद्यापीठ
धर्म चर्च ऑफ इंग्लंड
सही थेरीसा मेयांची सही

थेरीसा मेरी मे (इंग्लिश: Theresa May; जन्मः १ ऑक्टोबर १९५६) ही युनायटेड किंग्डम देशातील एक राजकारणी, देशाची माजी पंतप्रधानहुजूर पक्षाची पक्षाध्यक्ष आहे. १३ जुलै २०१६ रोजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन ह्याने पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधानपदी मेची निवड करण्यात आली. मार्गारेट थॅचर नंतरची ती ब्रिटनची दुसरीच महिला पंतप्रधान आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठामधून शिक्षण घेणारी मे १९७७ ते १९८३ तसेच १९८५ ते १९९७ दरम्यान बँक ऑफ इंग्लंडमध्ये नोकरीस होती. १९९७ साली ती बर्कशायर काउंटीमधील मेडनहेड ह्या मतदारसंघामधून हाऊस ऑफ कॉमन्सवर निवडून आली. तेव्हापासून सतत संसद सदस्य राहिलेल्या मेने ब्रिटिश सरकारमध्ये अनेक पदे भुषवली. २०१० सालच्या संसद निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे ब्रिटिश संसदेमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या हुजुर पक्षाने लिबरल डेमोक्रॅट्स पक्षाला हाताशी धरून सरकार स्थापन केले व कॅमेरॉन ब्रिटनचा ७५वा पंतप्रधान बनला. कॅमेरॉनच्या मंत्रीमंडळामध्ये मे गृहसचिव ह्या महत्त्वाच्या पदावर होती.

युरोपियन संघामधील ब्रिटनचे सदस्यत्व चालू ठेवावे का ब्रिटनने संघामधून बाहेर पडावे (ब्रेक्झिट) ह्या मोठ्या प्रश्नाचा निकाल लावण्यासाठी २०१५ मध्ये कॅमेरॉनने सार्वत्रिक जनमत घेण्याची घोषणा केली. २३ जून २०१५ रोजी युनायटेड किंग्डममध्ये ह्या प्रश्नावरून जनमत (referendum) घेण्यात आले. ह्या जनमतामध्ये सुमारे ५२ टक्के ब्रिटिश नागरिकांनी ईयूमधून बाहेर पडण्याचा कौल दिला. ह्या जनमताचा प्रतिकूल निकाल लागल्यामुळे कॅमेरॉनची राजकीय अवस्था बिकट झाली व त्याने पंतप्रधानपदाचा राजीनाम देणार असल्याचे घोषित केले. ब्रिटनला ईयूमधून बाहेर काढण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण गुंतणार नसल्याचे त्याने आधीच स्पष्ट केले होते. ११ जुलै २०१६ रोजी मेची हुजूर पक्षाच्या पक्षप्रमुखपदी निवड झाली. १३ जुलै २०१६ रोजी कॅमेरॉनने अधिकृत रित्या पंतप्रधानपद सोडले व मेकडे सत्ता सुपूर्त केली.

मेच्या नेतृत्वाखाली ब्रेक्झिटचे अनेक प्रस्ताव नामंजूर झाल्यावर त्यांनी २४ मे, २०१९ रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. जुलै, २०१९मध्ये नवीन पंतप्रधान निवडला जाईपर्यंत त्या या पदावर तात्पुरत्या स्वरूपात राहतील

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत