Jump to content

त्र्वॉ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ट्रोयास
commune of France
अधिकृत नावTroyes संपादन
देशफ्रान्स संपादन
Located in the statistical territorial entityQ108921878, Q3551173 संपादन
पाणीसाठ्याजवळसीन नदी संपादन
भौगोलिक गुणक४८°१७′५६″N ४°४′४१″E संपादन
Office held by head of governmentmayor of Troyes संपादन
सरकारचे प्रमुखFrançois Baroin संपादन
महत्वाची घटनाheat burst संपादन
डाक संकेतांक10000 संपादन
दूरध्वनी क्रमांक+33-3-25-42-33-33 संपादन
Fax number+33-3-25-73-47-43 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.ville-troyes.fr संपादन
Contact page URLhttps://www.ville-troyes.fr/ संपादन
History of topictimeline of Troyes संपादन
List of monumentslist of historic monuments in Troyes संपादन
Category for maps or plansCategory:Maps of Troyes संपादन
Map
त्र्वॉ वेदीचित्र (तपशील) व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय, लंडन

त्र्वॉ (उच्चार भेद:त्रुआ) हे ईशान्य फ्रांसमधील ग्रांद एस्त प्रदेशातील ऑब विभागाचे राजधानी आणि एक कॉम्यिन आहे. हे शहर सेन नदीवरती वसलेले आहे आणि सुमारे १४० किमी (८७ मैल) पॅरिसच्या आग्नेयेला. हे शांपान वाइन प्रदेशात येते आणि ऑर्यां वन प्रादेशिक नैसर्गिक उद्यानाच्या जवळ आहे.

२०२३मध्ये त्र्वॉची लोकसंख्या ६२,०८८ होती हे कॉमिनोते दॅग्लॉमेरास्यों त्र्वॉ शांपान मेत्रॉपॉलचे केंद्र आहे, जिथे अंदाजे एक लाख पंच्यात्तर हजार रहिवासी आहेत.

त्र्वॉचा विकास रोमी काळापासूनच झाला, जेव्हा ते आउगुस्तोबोना त्रिकास्सिउम म्हणून ओळखले जात होते. ते अनेक महामार्गांच्या, विशेषतः विया अग्रिप्पाच्या, केंद्रस्थानी वसलेले होते. या शहराला एक समृद्ध इतिहास आहे, त्रिकास्सेस जमातीपासून ते दुसऱ्या महायुद्धादरम्यान २५ ऑगस्ट १९४४ रोजी शहराच्या मुक्तीपर्यंत, ज्यामध्ये कातालाउनी मैदानांची लढाई, त्र्वॉची परिषद, हेन्री पाचवा आणि फ्रांसची कात्रीन यांचा विवाह, आणि शांपानचे जत्रे, जिथे ख्रिस्ती जगतातून व्यापारी येत असत, यांचा समावेश आहे. त्र्वॉला एक समृद्ध स्थापत्य आणि शहरी वारसा आहे; अनेक वास्तू ऐतिहासिक स्मारके म्हणून संरक्षित आहेत, ज्यात जुन्या शहरात टिकून राहिलेल्या अर्ध्या लाकडी घरांचा (मुख्यतः १६व्या शतकातील) समावेश आहे. त्यांच्या योगदानामुळेच त्र्वॉ 'कला आणि इतिहासाचे शहर' असे घोषित करण्यात आले आहे.

१८ व्या शतकापासून पुढे, १९६० च्या दशकापर्यंत वस्त्र उत्पादन हा त्र्वॉच्या अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख भाग होता. आज, त्र्वॉ हे थेट विक्रीकेंद्र आणि व्यापाराची युरोपीय राजधानी आहे, व तीन ब्रँड केंद्र आहेत.

इतिहास

[संपादन]

त्र्वॉच्या परिसरात सापडलेल्या प्रागैतिहासिक गोष्टींवरून असे सूचित होते की ही वस्ती सुमारे इ.स.पूर्व ६००मध्ये विकसित झाली असावी. शहराच्या जवळ केल्ती दफनभूमीचे ढिगारे सापडले आहेत, आणि शहराच्या हद्दीत केल्ती कलाकृतींचे उत्खननही करण्यात आले आहे.

रोमी काळात आउगुस्तोबोना त्रिकास्सिउम नावाने ओळखले जाणाऱ्या त्र्वॉ जवळ अनेक महामार्ग एकमेकांशी छेदत होते. यांत रेंस-लांग्र आणि पुढे मिलानकडे जाणारा विया अग्रिप्पा महामार्ग होता.[] त्र्वॉपासूनचे इतर रोमी मार्ग पॉइती, ओतों आणि ओर्लेयोंकडे जात होते.

हे त्रिकास्सेस लोकांचे शहर होते, ज्यांना ऑगस्टसने सेनोनेसपासून वेगळे केले होते. सुरुवातीच्या रोमन साम्राज्यातील या गाल्लो-रोमन शहराचे काही विखुरलेले अवशेष सापडले आहेत, परंतु जलवाहिनीच्या खुणांव्यतिरिक्त इतर कोणतेही सार्वजनिक स्मारक आढळले नाही. साम्राज्याच्या उत्तरार्धात या वस्तीचा विस्तार कमी झाला होता. याला त्रिकस्सिउम किंवा त्रिकास्साए असे संबोधले जात असे, जे फ्रांसी त्र्वॉ(Troyes)चे व्युत्पत्ती आहे.

४थ्या शतकापासून, नागरिक ख्रिस्ती झाले होते आणि चर्चने शहराला एका बिशपचे पीठ बनवले होते. या शहराचे बिशप लुपुस (लूप), ज्यांनी दंतकथेनुसार शहराचे अत्तीलापासून रक्षण केले, ही कथा ऐतिहासिक तथ्यांपेक्षा अतिरंजित स्तुतीच जास्त वाटते. संत लुपुसचे शिष्य अवेन्तिनुस(त्र्वॉचे संत अवेन्तिनुस, मृत्यु ५३७) यांनी त्र्वॉमध्ये एक मठाची स्थापना केली.[]

कातालाउनी मैदानांची लढाई, जिला त्र्वॉची लढाई असेही म्हणतात, ती इ.स. ४५१ मध्ये परिसरात झाली. यात रोमी सेनापती फ्लाविउस ॲतिउस आणि विसिगॉथ राजा थेओदोरिक पहिला यांनी अत्तीलाविरुद्ध लढा दिला.

पूर्वीचे प्रमुख चर्च सध्याच्या चर्चेच्या जागेवरच होते. येथेच ८७८ मध्ये तोतऱ्या लुईने पोप जॉन आठव्याकडून पश्चिम फ्रांसियाचे राजमुकुट स्वीकारला. ९व्या शतकाच्या अखेरीस, नॉर्मनकडून शहरावर झालेल्या हल्ल्यांनंतर, शांपानच्या सरदारांनी त्र्वॉला आपली राजधानी म्हणून निवडले. १८व्या शतकाच्या अखेरीस झालेल्या राज्यक्रांतीपर्यंत ते शांपान प्रांताची राजधानी राहिले. संत लुपुसच्या मठाने एक प्रसिद्ध ग्रंथालय आणि लेखनशाळा विकसित केली.

मध्ययुगात, त्र्वॉ एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. सोन्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'ट्रॉय वजन' या मापन पद्धतीचे नाव या शहरावरुनच ठेवण्यात आले, जी येथेच विकसित झाली होती. [] शांपान कापड जत्रे आणि दूरच्या व्यापाराचे पुनरुज्जीवन, तसेच नाणी आणि पतपुरवठ्याचा नवीन विस्तार, हे त्र्वॉच्या मध्ययुगीन अर्थव्यवस्थेचे चालक घटक होते.

१०४० मध्ये शेलोमो यिशाकी, ज्याला 'राशी' नावाने अधिक ओळखले जाते, यांचा जन्म त्र्वॉ येथे झाला. बायबल आणि ताल्मुदचे एक प्रमुख भाष्यकार असलेल्या या रब्बी आणि तत्त्वज्ञांनी शहरात यहूदी विचारांची एक प्रभावशाली संप्रदाय स्थापन केला.

१२८५ मध्ये, जेव्हा चौथा फिलिपने शांपान फ्रांसी राजघराण्याच्या राज्यात विलीन केला, तेव्हा या शहराने आपले अनेक पारंपरिक विशेषाधिकार कायम ठेवले. शंभर वर्षांच्या युद्धादरम्यान इंग्रजांचा मित्र असलेला, बूर्गॉनचे ड्यूक निर्भय जाँ याने १४१७ मध्ये त्र्वॉला फ्रान्सची राजधानी म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न केले. त्याने शार्ल सहावा याची पत्नी, बायर्नची इजाबो हिच्याशी त्र्वॉमध्ये नियंत्रकाच्या कार्यालयांसह एक न्यायालय, परिषद आणि अपीलीय न्यायालय स्थापन करण्याबाबत करार केला.

२१ मे १४२० रोजी, बूर्गॉनच्या लोकांच्या ताब्यात असलेल्या या शहरात त्र्वॉचा तह झाला, ज्यानुसारे हेन्री पाचवा याचा लग्न शार्ल सहावा याची मुलगी वाल्वाची कॅथेरीन हिच्याशी ठरले. तहाच्या अटींनुसार, युवराजा(दोफें)ऐवजी हेन्री पाचवा हा फ्रान्सचा राजा म्हणून शार्लचा उत्तराधिकारी होणार होता. फ्रान्समधील प्लांटाजेनेट वर्चस्वाचा परमोच्च बिंदू १४२९ मध्ये गाठला, जेव्हा युवराज (जो नंतर सातवा शार्ल झाला ) आणि आर्कची जोन यांनी सशस्त्र संघर्षाद्वारे (त्र्वॉचा वेढा) त्र्वॉ शहरावर पुन्हा फ्रांसी नियंत्रण प्रस्थापित केले.

ओतेल द वील

१५२४ च्या महाग्नीने मध्ययुगीन शहराचा बराच भाग नष्ट केला, जरी शहरात विविध भागांना वेगळे करणारे असंख्य कालवे होते.

जानेवारी आणि फेब्रुवारी १८९४ च्या मोहीम दरम्यान, पुलिसांनी तेथे राहणाऱ्या अराजकतावाद्यांना लक्ष्य करून छापे टाकले, परंतु ते फारसे यशस्वी झाले नाहीत. [] [] []

आकर्षणे

[संपादन]
काथेद्राल सां-प्येर-ए-सां-पोल द त्र्वॉ(१५४८) (Cathédrale Saint-Pierre-et-Saint-Paul de Troyes)
  • खूप जुन्या शहरात अनेक अर्ध-लाकडी घरे (मुख्यतः १६ व्या शतकातील) टिकून आहेत.
  • जुन्या शहरातील ओतेल पार्तिक्युल्येर्स (भव्यवाडे)
  • प्लेस अलेक्झांद्र इस्रायलवरील ओतेल द वील हे लुई तेरावा शैलीचे एक शहरी उदाहरण आहे. मुख्य स्वागत कक्ष असलेल्या मध्यवर्ती इमारतीवर, त्याची कंगोरेदार रचना (कॉर्निस) जोडलेल्या कोरिंथियन स्तंभांवरून लयबद्धपणे पुढे आलेली आहे; यांना खाली मजबूत, एकत्रित स्तंभांचा आधार आहे. प्रवेशद्वाराच्या वर असलेला लुई चौदाव्याचा पुतळा, फ्रेंच राज्यक्रांतीच्या दहशतीचे साम्राज्याच्या काळात, १७९३ मध्ये त्याच्या कोनाड्यातून बाहेर काढून फोडण्यात आला; एकोणिसाव्या शतकात त्याच्या जागी सध्याची शिरस्त्राणधारी मिनेर्वा आणि तिचे मूळ प्रतीक बसवण्यात आले. आता "लिबेर्ते, एगालिते, फ्रातेर्निते, ऊ ला मॉर्त" (स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व, किंवा मृत्यू) पाहणे दुर्मिळ झाले आहे. साल दु काँसेय(परिषद कक्ष) मध्ये, त्र्वॉ येथे जन्मलेल्या फ्रान्स्वा झीगार्दाँ यांनी बनवलेले लुई चौदावाचे (१६९०) एक संगमरवरी पदक या विध्वंसातून सुखरूप वाचले. []

संग्रहालये

[संपादन]
  • आधुनिक कला संग्रहालय (Musée d'Art Moderne/मुजे दार्त मोदेर्न)
  • औजारे आणि श्रमिक विचार संग्रहालय (Maison de l'outil et de la pensée ouvrière/मेजाँ द लुती ए द ला पांसे ऊव्रीएर)
  • वोल्वीजां(Vauluisant) संग्रहालय:
    • त्र्वॉ आणि शांपानार्देन ऐतिहासिक संग्रहालय
    • विणकाम किंवा मोजेनिर्मिती संग्रहालय (Musée de la Bonneterie/मुजे द ला बॉनेत्री)
  • ओतेल-द्यो-लकाँत(Hôtel-Dieu-Lecomte) औषधालय
  • सां-लूप संग्रहालय (ललित कला संग्रहालय)
  • दी मार्को संग्रहालय (दरवर्षी १ एप्रिल ते १ ऑक्टोबर पर्यंत खुले असते)

चर्च

[संपादन]
प्रमुखचर्चेचे पश्चिमी दर्शनी भाग

अलीकडील युद्धांचा फटका न बसल्यामुळे, त्र्वॉमध्ये शहराच्या मध्यवर्ती भागाजवळ जुन्या धार्मिक वास्तूंचा दाट वस्ती आहे. त्यांमध्ये खालील इमारतींचा समावेश आहे:

  • सां-प्येर-ए-सां-पोल प्रमुखचर्च(Saint-Pierre-et-Saint-Paul Cathedral)
  • सां-नीझ्ये चर्च, गॉथिक आणि पुनर्जागरण शैलीतील असून, त्यात उल्लेखनीय शिल्पकला आहे. १८४० मध्ये याला 'मॉनिमां हिस्तोरीक' (ऐतिहासिक स्मारक) म्हणून वर्गीकृत करण्यात आले.
  • गॉथिक सां-अर्बेन महामंदिर (१३व्या शतकातील), जिचे छत चकचकीत कौलांनी आच्छादलेले आहे. ही महामंदिर झॅक पांतालेऑं यांनी बांधली होती, जे १२६१ मध्ये 'अर्बन चौथा' या नावाने पोप म्हणून निवडले गेले होते. ही बॅसिलिका त्यांच्या वडिलांच्या कार्यशाळेच्या जागेवर बांधली गेली. १८४० मध्ये या वास्तूला 'मॉनिमां हिस्तोरीक' म्हणून वर्गीकृत करण्यात आले. १९६४ मध्ये याला महामंदिर म्हणून घोषित करण्यात आले.
  • सां-मादलीन चर्च. अतिशय सुरुवातीच्या गॉथिक शैलीतील, ज्याचा पूर्वेकडील भाग सुमारे १५०० मध्ये पुन्हा बांधण्यात आला. १५०८-१७ मधील फ्लॅम्बॉयंट गॉथिक शैलीतील एक अत्यंत कलात्मक दगडी पडदा, जो जां गेल्द यांनी कोरला असून त्यावर संत मार्थाचा पुतळा आहे. उत्कृष्ट पुनर्जागरण रंगीत काचकाम. संत जां जिल्हा. १८४० मध्ये ऐतिहासिक स्मारक म्हणून वर्गीकृत.
  • सां-जां चर्च, पुनर्जागरणकालीन गर्भगृह आणि गिराउदोंने बनवलेले मुख्य वेदीचे मंजुषा. प्रवेशद्वारावर शार्ल नववा यांचे राजचिन्ह आहे. १८४० मध्ये 'मॉनिमां हिस्तोरीक' म्हणून वर्गीकृत.
  • १६व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील गॉथिक संत-निकोलस चर्च, ज्यामध्ये एका भव्य जिन्याने पोहोचता येणारे कॅल्व्हरी चॅपलच्या आकाराचे व्यासपीठ आहे. दक्षिण प्रवेशद्वारावर, फ्रान्स्वा जांती यांनी साकारलेली दावूद आणि यशया यांची दोन शिल्पे आहेत.
  • सोळाव्या शतकातील विस्तृत मूर्तिकाम असलेले संत-पांतालेऑं चर्च.
  • सेंट रेमी चर्च, ज्याचा १४ व्या शतकातील मनोरा ६० मी (१९६.८५ फूट) उंच आहे . त्याच्या दक्षिण बाजूला असलेल्या १७ व्या शतकातील सूर्यघड्याळावर sicut umbra dies nostri super terram ("पृथ्वीवरील आपले दिवस सावलीसारखे जातात") असा लॅटिन शिलालेख आहे.
  • सां-मार्तिन-एस-विन्ये चर्च. यात स्थानिक कुशल काचकामगार लिनार्द गाँत्ये यांनी १७व्या शतकात बनवलेल्या रंगीत काचेच्या खिडक्या आहेत.

सिनेगॉग

[संपादन]
The Rashi Synagogue
राशी सिनेगॉग

त्र्वॉच्या राशी सिनेगॉगमध्ये यहूदी उपासना केली जाते. सध्याची वास्तू १६व्या शतकातील एका जुन्या मठाच्या जागेवर बांधली गेली आणि दुसऱ्या महायुद्धात नष्ट झालेल्या सिनेगॉगची जागा घेतली. [] [] ही वास्तू पुनर्जागरण शैलीत आहे आणि २०व्या शतकात तिची पुनर्बांधणी करण्यात आली. यात १६व्या शतकातील एक अर्ध-लाकडी घर आणि १८व्या शतकातील (लुई पंधरावा शैली) दुसरे घर आहे. [१०] एक सांस्कृतिक केंद्र देखील स्थापन करण्यात आले आहे. [११]

राशीच्या काळातील भावना प्रतिबिंबित करण्यासाठी सिनेगॉगला पुनर्संचयित करण्यासाठी अलीकडे नूतनीकरण करण्यात आले आहेत. फ्रान्सचे मुख्य रब्बी हाइम कोर्सिया यांच्या उपस्थितीत ४ सप्टेंबर २०१६ रोजी उद्घाटन झाले. [१२]

लोकसंख्या

[संपादन]

त्या कम्यूनच्या रहिवाशांना फ्रेंचमध्ये त्र्वॉयाँ(Troyens) म्हणतात.

ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक. ±%
इ.स. १७९३ २६,७५१
इ.स. १८०० २४,०६१ −१०%
इ.स. १८०६ २७,१९६ +१३%
इ.स. १८२१ २५,०७८ −७%
इ.स. १८३१ २३,७४० −५%
इ.स. १८३६ २५,५६३ +७%
इ.स. १८४१ २५,४६९ −०%
इ.स. १८४६ २५,७०२ +०%
इ.स. १८५१ २७,३७६ +६%
इ.स. १८५६ ३३,०७१ +२०%
इ.स. १८६१ ३४,६१३ +४%
इ.स. १८६६ ३५,६७८ +३%
इ.स. १८७२ ३८,११३ +६%
इ.स. १८७६ ४१,२७५ +८%
इ.स. १८८१ ४६,०६७ +११%
इ.स. १८८६ ४६,९७२ +२%
इ.स. १८९१ ५०,३३० +७%
इ.स. १८९६ ५२,९९८ +५%
इ.स. १९०१ ५३,१४६ +०%
इ.स. १९०६ ५३,४४७ +०%
इ.स. १९११ ५५,४८६ +३%
इ.स. १९२१ ५५,२१५ −०%
इ.स. १९२६ ५८,३२१ +५%
इ.स. १९३१ ५८,८०४ +०%
इ.स. १९३६ ५७,९६१ −१%
इ.स. १९४६ ५८,८०५ +१%
इ.स. १९५४ ५८,८१९ +०%
इ.स. १९६२ ६७,४०६ +१४%
इ.स. १९६८ ७४,८९८ +११%
इ.स. १९७५ ७२,१६५ −३%
इ.स. १९८२ ६३,५७९ −११%
इ.स. १९९० ५९,२५५ −६%
इ.स. १९९९ ६०,९५८ +२%
इ.स. २००७ ६१,८२३ +१%
इ.स. २०१२ ६०,००९ −२%
इ.स. २०१७ ६१,६५२ +२%
इ.स. २०२३ ६२,०८८ +०%
Source: EHESS[१३] and INSEE (1968–2023)[१४]

अर्थव्यवस्था

[संपादन]
जुन्या शहरातील घरे

त्र्वॉ हे कपड्यांचा ब्रँड असलेल्या लाकोस्त कंपनीच्या उत्पादन मुख्यालयाचे ठिकाण आहे. तसेच, हे चाकलेट निर्माता पास्कल काफेचेही ठिकाण आहे. [१५]

शिक्षण

[संपादन]

त्र्वॉचे तंत्रज्ञान विद्यापीठ आणि व्यापारिक शाळा ग्रुप इकोले सुपरीयूर द कॉमर्स द त्र्वॉ या शहरात आहेत.

हवामान

[संपादन]
  1. Traces of the Roman paving have been found  मी (९.८४ फूट) below the rue de la Ciré.
  2. Baudoin, Jacques (2006). Grand livre des saints: culte et iconographie en Occident (फ्रेंच भाषेत). Nonette: EDITIONS CREER. p. 112. ISBN 9782848190419. 12 November 2023 रोजी पाहिले. Saint Aventin de Troyes (Aventinus, 4 février) Ermite natif de Bourges, attiré en Champagne par la réputation de saint Loup de Troyes († 479). Il avait installé à Troyes une communauté monastique. En 525, il racheta de l'esclavage Fidole (saint Phal), à qui il confia son monastère, et il se retira en ermite a l'Isle-au-Mont, ou il mourut en 537.
  3. Lloyd, John; Mitchison, John (2010). The Second Book of General Ignorance (First ed.). London: Faber and Faber Ltd. p. 71. ISBN 978-0-571-26965-5.
  4. "Les anarchistes" [The anarchists]. La Dépêche. 3 January 1894. p. 2.
  5. "Deux mille perquisitions". L'Estafette: 2. 2 January 1894.
  6. "Une série générale de perquisitions : résultat négatif des recherches" [A general series of raids: negative results]. L'Éclair. 3 January 1894.
  7. "Hôtel de Ville de Troyes". Aube-Champagne. 25 November 2024 रोजी पाहिले.
  8. "Troyes in France – A Millennial Jewish History". judaicultures.info. February 15, 2012 रोजी पाहिले.
  9. "Making Sense of the Forms of Places of Worship – The Synagogue". crdp-reims.fr. 2010-01-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. October 29, 2011 रोजी पाहिले.
  10. Didier Guy; Patrick Dupré. Troyes en Champagne. Troyes: La Maison du Boulanger. p. 124. ISBN 978-2-913052-21-5.
  11. "Donner sens aux formes des lieux cultuels - La synagogue". crdp-reims.fr. 2010-01-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 October 2011 रोजी पाहिले.
  12. I.F. with R. Doumergue (September 4, 2016). "Troyes: the Restored Synagogue Was Inaugurated". France 3 Region (फ्रेंच भाषेत).
  13. साचा:Cassini-Ehess
  14. Population municipale entre 1968 et 2023, INSEE
  15. chocolatier. "Pascal Caffet, Meilleur Ouvrier de France pâtissier, Champion du monde des métiers du dessert". Pascal-caffet.com. 2011-02-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-16 रोजी पाहिले.
  16. "Normals and records for Troyes-Barberey (10)" (फ्रेंच भाषेत). Meteociel. 6 September 2025 रोजी पाहिले.