त्र्यंबकजी डेंगळे
Appearance
त्र्यंबकजी डेंगळे हे १९व्या शतकातील मराठा सरदार होते. दुसऱ्या बाजीरावाच्या पदरी असलेल्या डेंगळ्यांवर बडोद्याच्या गायकवाडांचे दूत गंगाधरशास्त्री यांची हत्या करवल्याचा आरोप होता. यावरून पेशवाई आणि ब्रिटिशांचे संबंध चिघळले. हे तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्ध सुरू होण्याच्या कारणांतील एक होते.
युद्धानंतर पराभूत पेशवाईतील सरदारांप्रमाणे डेंगळ्यांना तडीपार केले गेले. त्यांनी आपली शेवटची वर्षे बंगालमध्ये घालवली.