त्रेव्हिसो
त्रेव्हिसो हे इटलीच्या व्हेनेतो प्रदेशातील एक शहर आहे. हे त्रेव्हिसो प्रांताचे प्रशासकीय केन्द्र असून २०२३ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ८५,१८८ इतकी आहे.[१]
कपडे विक्रेते बेनेत्तोन, उपकरण निर्माता डि'लोंघी आणि सायकल निर्माता पिनारेलो यांची मुख्यालये आहेत.
प्रोसेको प्रकारचे मद्य येथे पहिल्यांदा निर्माण केले गेले. [२] [३] आणि लोकप्रिय इटालियन मिष्टान्न तिरामिसु बनवण्याची सुरुवात येथून झाल्याचे मानले जाते. [४]

वाहतूक
[संपादन]रेल्वे वाहतूक
[संपादन]त्रेव्हिसो चेंत्राले रेल्वे स्थानकावरून रोम, मिलान, व्हेनिस, पादोव्हा , त्रिएस्ते येथे जाण्यासाठी त्रेनितालिया ही कंपनी रेल्वे सेवा पुरवते. येथून व्हिएन्ना, क्लागेनफुर्ट, व्हिलाख येथे जाणाऱ्या ऑस्ट्रियन गाड्या देखील आहेत.
हवाई वाहतूक
[संपादन]त्रेव्हिसो विमानतळ शहराच्या पश्चिम भागात सुमारे ५ किलोमीटर आणि व्हेनिसपासून अंदाजे ३१ किलोमीटर अंतरावर आहे. हा एक लहान विमानतळ असून प्रामुख्याने किफायतशीर विमान कंपन्यांद्वारे वापरला जातो. रायनएर येथील प्रमुख विमानकंपनी आहे. विमानतळावर २,४२० मीटर लांबीचा एकच डांबरी धावपट्टी आहे आणि तो समुद्रसपाटीपासून १८ मीटर उंचीवर आहे. येथील टर्मिनल २००७ मध्ये उघडण्यात आले. याला इटालियन शिल्पकार अँतोनियो कानोव्हा यांचे नाव दिलेले आहे.
स्थानिक वाहतूक
[संपादन]एमओएम ही शहरातील प्रमुख वाहतूक कंपनी आहे आणि त्रेव्हिसो प्रांतात शहरी आणि उपनगरीय सेवा पुरवते.
संदर्भ
[संपादन]- ^ "Data at Istat website". 23 April 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 May 2011 रोजी पाहिले.
- ^ Kafka, Barbara (21 December 1988). "Radicchio: Tasty but So Misunderstood". The New York Times. 24 October 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 May 2017 रोजी पाहिले.
The radicchio that Italians eat most often is Treviso.
- ^ Pavan, Camillo (2013). Sull'origine del radicchio rosso di Treviso: La leggenda di Van den Borre e la scoperta di Tiziano Tempesta. Treviso. p. 6.
- ^ online, Redazione. "Crisi, chiude il ristorante dove nacque la prima ricetta del "Tiramisù"". Corriere del Veneto (इटालियन भाषेत). 21 September 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 September 2018 रोजी पाहिले.