त्रिभांतर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Copyright-problem paste.svg***मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा अशी दाखवावी***

दोन खस्थ ज्योतींच्या भोगांमध्ये [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] जेव्हा ९०° चा फरक असतो तेव्हा त्या फरकास त्रिभांतर असे म्हणतात. सामान्यतः सूर्य आणि चंद्र किंवा कोणताही ग्रह यांच्या संदर्भात ही संज्ञा वापरतात. शुद्ध किंवा वद्य अष्टमीस सूर्य–चंद्रामध्ये त्रिभांतर असते व तेव्हा सूर्यप्रकाशाने अर्धे चंद्रबिंब उजळलेले दिसते. बुध आणि शुक्र हे अंतर्ग्रह असल्याने त्यांचे सूर्याशी कधीही त्रिभांतर होणे शक्य नाही. बहिर्ग्रह सूर्यापासून त्रिभांतरी असताना त्यांच्या प्रकाशित भागाचा अधिकात अधिक क्षय झालेला असतो. हा क्षय इतका कमी असतो की, नुसत्या डोळ्यांनी हा फरक किंवा क्षय जाणवात नाही. त्याचे दूरदर्शकातूनच निरीक्षण करावे लागते.


गोखले, मो. ना.

      • मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा अशी दाखवावी***
  • ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले