त्रिपुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Copyright-problem paste.svg
या लेखातील किंवा विभागातील मजकूर http://satsangdhara.net/bhp/bhp07-10.htm येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.त्रिपुरदहनाची कथा -

युधिष्ठिरा, पूर्वी एकदा मोठ्या मायावी मयासुराने रुद्रदेवांच्या कीर्तीला कलंक लावला, तेव्हा याच भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा त्यांच्या यशाचे रक्षण आणि विस्तार केला होता. (४८-५१)

राजाने विचारले – नारदमुने, मयदानवाने कोणत्या कार्यामध्ये जगदीश्वर रुद्रदेवांचे यश नष्ट केले होते आणि भगवान श्रीकृष्णांनी कोणत्या प्रकारे त्यांच्या यशाचे रक्षण केले ? (५२)

नारद म्हणाले – याच भगवान श्रीकृष्णांकडून शक्ती प्राप्त करून घेऊन एकदा देवांनी युद्धामध्ये असुरांना जिंकले होते. त्यावेळी असुर, मायावी असुरांचे परम गुरु मय दानवाला शरण गेले. शक्तिशाली मयासुराने सोने, चांदी आणि लोखंड यांची तीन नगरे निर्माण केली. ती इतकी विलक्षण होती की त्यांचे येणे-जाणे समजून येत नसे. त्यात अपरिमित युद्धसामग्री भरलेली होती. (५३-५४)

युधिष्ठिरा, दैत्यसेनापतींच्या मनात तिन्ही लोक आणि त्यांचे लोकपती यांचेविषयी पूर्वीचा वैरभाव होताच. आता त्याची आठवण येऊन त्या तीन विमानांच्या द्वारा त्यात लपून बसून ते सर्वांचा नाश करू लागले. तेव्हा लोकपालांसह सर्व प्रजा भगवान शंकरांना शरण गेली आणि त्यांना प्रार्थना केली की, प्रभो, त्रिपुरात राहणार्‍या असुरांनी आमचा नाश करण्याचे ठरविले आहे. आम्ही आपले आहोत. म्हणून देवाधिदेवा, आमचे रक्षण करा. (५५-५६)

त्यांची प्रार्थना ऐकून भगवान शंकर करुणेने देवांना म्हणाले – “भिऊ नका !” नंतर त्यांनी धनुष्याला बाण लावून तिन्ही नगरांवर सोडला. त्यांच्या त्या बाणापासून सूर्यमंडलातून निघणार्‍या किरणांप्रमाणे इतर अनेक बाण बाहेर पडले. त्यातून आगीचे जणू काही लोळ येत होते. त्यामुळे ती नगरे दिसेनाशी झाली. त्या बाणांच्या केवळ स्पर्शाने नगरातील सर्वजण निष्प्राण होऊन पडले. महायोगी मयाने दैत्यांना उचलून आणले आणि अमृताच्या विहीरीत टाकले. त्या सिद्ध अमृत-रसाचा स्पर्श होताच असुरांचे शरीर अत्यंत तेजस्वी आणि वज्राप्रमाणे सुदृढ झाले. ढगांना इतस्ततः करणार्‍या विजेच्या लोळाप्रमाणे ते उठून उभे राहिले. (५७-६०)

श्रीविष्णूंनी जेव्हा पाहिले की, आपला संकल्प सिद्धीस न गेल्यामुळे महादेव विषण्ण झाले आहेत, तेव्हा त्या असुरांवर विजय मिळविण्यासाठी त्यांनी एक युक्ती केली. हेच भगवान विष्णू त्यावेळी गाय झाले आणि ब्रह्मदेव वासरू झाले. मध्यान्हसमयी दोघेही त्या तिन्ही नगरात गेले आणि त्या सिद्धरसाच्या विहीरीतील सर्व अमृत त्यांनी पिऊन टाकले. त्या विहिरींचे रक्षक जरी या दोघांना पाहात होते, तरी भगवंतांच्या मायेने मोहित झाल्यामुळे त्यांना ते रोखू शकले नाहीत. महामायावी मयासुराला ही गोष्ट समजली, तेव्हा ती दैवगती आहे, याचे स्मरण होऊन त्याला कोणत्याही प्रकारचा शोक झाला नाही. शोक करणार्‍या अमृत-रक्षकांना तो म्हणाला, “देव, असुर, मनुष्य किंवा कोणताही प्राणी, स्वतःसाठी, दुसर्‍यासाठी किंवा दोघांसाठीही जे प्रारब्धाचे विधान असेल, ते बदलू शकत नाही.” यानंतर भगवान श्रीविष्णूंनी आपल्या शक्तींच्या द्वारा शंकरांच्या युद्धाची सामग्री तयार केली. त्यांनी धर्मापासून रथ, ज्ञानापासून सारथी, वैराग्यापासून ध्वज, ऐश्वर्यापासून घोडे, तपश्चर्येपासून धनुष्य, विद्येपासून कवच, क्रियेपासून बाण आणि आपल्या इतर अनेक शक्तींपासून पुष्कळ अन्य वस्तू निर्माण केल्या. या सामग्रीने सज्ज होऊन भगवान शंकर रथावर आरूढ झाले आणि त्यांनी धनुष्य-बाण धारण केले. अभिजित मुहूर्तावर भगवान शंकरांनी धनुष्यावर बाण चढविला आणि ती तिन्ही दुर्भेद्य पुरे भस्मसात करून टाकली. युधिष्ठिरा, त्याचवेळी स्वर्गात दुंदुभी वाजू लागल्या. शेकडो विमानांची गर्दी झाली. देव, पितर आणि सिद्धेश्वर आनंदाने जयजयकार करीत पुष्पवर्षाव करू लागले. अप्सरा नाचू आणि गाऊ लागल्या. युधिष्ठिरा, अशा प्रकारे त्या तिन्ही पुरांना जाळून भगवान शंकर त्रिपुरारी झाले आणि ब्रह्मादिकांनी केलेली स्तुती ऐकत आपल्या धामाकडे निघून गेले. आत्मस्वरूप जगद्रुरू भगवान श्रीकृष्ण आपल्या मायेने अशा प्रकारे ज्या मनुष्यासारख्या लीला करतात, त्याच अनेक लोकपावन लीलांचे ऋषी गायन करतात. आता मी तुला आणखी काय सांगू ते सांग. (६१-७१)

संदर्भ

स्कंध-सातवा-अध्याय दहावा समाप्त 

॥ हरिः ॐ तत्सत् ॥

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले